Cars Colors: कार खरेदी करताना सर्वात आधी विचार केला जातो तो रंगांचा. कोणत्या कलरची कार घ्यायची यावर खूप चर्चा होते आणि मग कुठेतरी एक रंग फायनल केला जातो. घरात कोणाला तरी आवडतो म्हणून हाच रंग घ्यायचा असे काहींचे नियोजन असते. कार खरेदी करतांना दिसण्यापेक्षा तिचे इंजिन, मायलेज आणि रंग (Engine, Mileage and Color) याबाबत जास्त गोंधळलेले असतात. मग शेवटी बहुतेक लोक केवळ पांढऱ्या किंवा हलक्या सिल्व्हर रंगाच्या कार खरेदी करण्यास प्राधान्य देतात. यामागे काय कारण आहे? कारच्या रंगामुळे काही फरक पडतो का? ते जाणून घेऊया.
कोणता रंग सर्वात सुरक्षित आहे? (Which color is the safest?)
नवीन कार खरेदी करताना ग्राहकाच्या मनात अनेक गोष्टी येत असतात. गाडीची स्ट्रक्चर, सेफ्टी टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने कसे फीचर्स दिले आहेत. पण यात सगळ्यात मजा असते ती गाडीचा रंग ठरवण्यात. कारचा रंग तुमच्या मनाला दिलासा देणारा असला की, तुम्ही तो खरेदी करता. पण तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही खरेदी करत असलेल्या कारच्या रंगामुळे अपघात होण्याची शक्यता असते. तज्ञांनी केलेल्या रिसर्चनुसार काळ्या रंगाच्या कारच्या तुलनेत पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये अपघात होण्याची शक्यता 12 टक्के कमी असते. पांढऱ्यानंतर क्रीम किंवा पिवळ्या रंगाच्या कार अधिक सुरक्षित मानल्या जातात. जरी काही अभ्यास सुरक्षिततेच्या प्रमाणात पांढर्या रंगाच्या कारपेक्षा पिवळा रंग मानतात.
काय सांगतो मागील महिन्यातील World of Statistics अहवाल ….. (World of Statistics report)
मागील महिन्यात World of Statistics कडून एक अहवाल सादर करण्यात आला होता. त्यामध्ये काळ्या रंगाच्या गाड्या सर्वात धोकादायक असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय इतर अनेक रंगही कारसाठी कमी सुरक्षित मानले गेले आहेत.