Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

10 Most Expensive NFT's : तुम्हाला माहितीये जगातील 10 सर्वांत महागड्या NFT’s कोणत्या आहेत?

10 most expensive NFT's

NFT-Non-Fungible Token, म्हणजे नॉन-फंगीबल टोकन. हे बिटकॉईन किंवा इतर क्रिप्टोकरन्सीप्रमाणेच एक टोकन आहे. NFT हे युनिक टोकन (Unique Token) आहे. इंटरनेट मायाजालावरील ही डिजिटल मालमत्ता असून ती व्हॅल्यू निर्माण करते.

NFT म्हणजे नॉन-फंगीबल टोकन. हे बिटकॉईन किंवा इतर क्रिप्टोकरन्सीप्रमाणेच एक टोकन आहे. NFT (Non-Fungible Token) हे युनिक टोकन (Unique Token) आहे. इंटरनेट मायाजालावरील ही डिजिटल मालमत्ता असून ती व्हॅल्यू निर्माण करते. बिटकॉईन्सची जशी देवाणघेवाण करता येते, तशी NFT ची देवाणघेवाण करता येत नाही. कारण हे युनिक आर्ट पीस आहे. याचे प्रत्येक टोकन हे युनिक आहे. या डिजिटल टोकनला ओनरशिपचे व्हॅलिड सर्टिफिकेट मिळते. तो त्याला एक प्रकारचा कॉपीराईटचा अधिकार देते. 2014 मध्ये जेव्हा NFT ची सुरुवात झाली; तेव्हापासून त्याला खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच अनेक NFT ची किंमत लाखो करोडो रुपये आहे. चला तर मग जाणून घेऊयात जगातल्या सर्वात महागड्या NFT’s कोणत्या आहेत. आपण उतरत्या क्रमाने टॉप 10 NFT’S पाहणार आहोत.

10. CryptoPunk #3100 : किंमत 7.57 मिलियन डॉलर्स

CryptoPunk #3100
Image Source : www.cryptopunks.app

10 व्या क्रमांकावर 11 मार्चमध्ये 7.6 मिलियन डॉलर्सला विकली गेलेली क्रिप्टोपंक #3100  (CryptoPunk) ही NFT आहे. ही NFT क्रिप्टोपंक कलेक्शनमधल्या Alien नावाच्या 9 NFT मधील एक आहे. ही NFT युनिक तर आहेच; परंतु ही दुर्मिळदेखील मानली जाते. 10,000 पैकी फक्त 450 NFT मध्ये व्हाईट आणि ब्लू हेडबॅण्ड्स (Headbands) आहेत, ज्यामुळे त्यांचे मूल्य अजूनच वाढते.  

9. CryptoPunk #5577 : किंमत 7.7 मिलियन डॉलर्स

CryptoPunk #5577
Image Source : www.cryptopunks.app

नवव्या क्रमांकावर 7.7 मिलियन डॉलर्सची क्रिप्टो पंक #5577 ही NFT आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये कंपाऊंड फायनान्सचे (Compound Finance) संस्थापक रॉबर्ट लेशनेर (Robert Leshner) यांनी ही NFT विकत घेतली. काऊबॉय हॅट (Cowboy Hat) असलेली ही NFT युनिक आहे. 

8. CryptoPunk #4156 : किंमत 10.26 मिलियन डॉलर्स

CryptoPunk #4156
Image Source : www.cryptopunks.app

क्रिप्टोपंक #4156 ही NFT यादीतील आठवी सर्वात महागडी NFT आहे; तसेच ही NFT जगातील सर्वात नावाजलेली NFT आहे. बीपल (Beeple) या नामांकित डिजिटल आर्टिस्टची ही NFT डिसेंबर 2021 मध्ये 10.26 मिलियन डॉलर्सला विकली गेली. त्याच्या आधीच्या मालकाने ही NFT फक्त 1.25 मिलियन डॉलर्सला घेतली होती व ती 9 महिन्यात 10 पटीने त्यांनी विकली.

7. TPunk #3442 : किंमत 10.50 मिलियन डॉलर्स

TPunk #3442
Image Source : www.twitter.com

TPunk #3442 ही NFT जरी फेमस नसली तरी ऑगस्ट 2021 मध्ये ट्रॉन (Tron)चे सह-संस्थापक जस्टिन सन (Justin Sun) यांनी ही NFT 10.50 मिलियन डॉलर्सला विकत घेतली होती. जोकरसारखेच फीचर्स या NFT मध्ये पाहायला मिळतात. जस्टीन यांनी या NFTचे लावलेले मूल्य योग्य नाही, असे अनेकांचे म्हणणे आहे.

6. CryptoPunk #7523 : किंमत 11.75 मिलियन डॉलर्स

CryptoPunk #7523
Image Source : www.cryptopunks.app

CryptoPunk #7523 ही क्रिप्टोपंक कलेक्शनमधील एक महत्त्वाची आणि दुर्मिळ NFT आहे. लार्व लॅब्स (Larv Labs) द्वारे तयार करण्यात आलेल्या या NFTचे खास फिचर म्हणजे त्यातील कोविड-19चा मास्क. Covid Pandemic ला ट्रीबूट देणारी ही NFT शालोम मेकेन्झी (Shalom Mackenzie) DraftKings चे सर्वात मोठे शेअरहोल्डर यांना खूप आवडली होती. त्यांनी ही NFT 11.8 मिलियन डॉलर्सला ती विकत घेतली. या NFTचे आणखी काही फेचेर्स देखील आहेत.

5. CryptoPunk #5822 : किंमत 23.7 मिलियन डॉलर्स

CryptoPunk #5822
Image Source : https://cryptopunks.app/cryptopunks/details/5822

CryptoPunk #5822 ही क्रिप्टोपंक NFT मधील सर्वात महागडी आणि आपल्या यादीतील पाचवी NFT आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये चैन (Chain) कंपनीचे कसो दीपक थापलियाल (Deepak Thapliyal) यांनी ही NFT 23.7 मिलियन डॉलर्सला विकत घेतली होती. Alien Collection मधील सर्वात दुर्मिळ NFT म्हणून CryptoPunk #5822 मानली जाते.

4. HUMAN ONE : किंमत 28.9 मिलियन डॉलर्स

HUMAN ONE
Image Source : www.cryptopunks.app

बीपल (Beeple) यांनी तयार केलेले ह्यूमन वन (HUMAN ONE) हे एक रिअल आर्टवर्क आहे; जे 3D स्वरूपात आहे. यामध्ये 4 स्क्रीन्स आहेत; ज्यामुळे ही NFT 3D मध्ये दिसते. या NFTमध्ये वेगवेगळ्यावेळी वेगवेगळी ठिकाणे एक्सप्लोर करणाऱ्या अंतराळवीराची अनंत फिल्म दाखवली आहे. ह्यूमन वन या NFT द्वारे बीपल यांनी डिजिटल आर्ट आणि टेकनॉलॉजी यांचा अत्यंत सुंदर मेळ घडवून आणला आहे. ही NFT सतत बदलत असते व बीपल यांना याचा अॅकॅस्सेस आहे, ज्याद्वारे ते यात सतत अपडेट्स करत असतात. नोव्हेंबर 2021 मध्ये या NFTला 28 मिलियन डॉलर्सची शेवटची मागणी आली होती.

3. Clock : किंमत 52.7 मिलियन डॉलर्स

Clock
Image Source : www.cryptonews.com

2019 च्या वादग्रस्त अटकेनंतर ज्युलियन असांजच्या (Julian Assange) बचावासाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने या NFTची निर्मिती केली होती. असांज याला अमेरिकन सरकारविरोधात हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली तुरूंगात टाकण्यात आले आहे. क्लॉक या NFT मध्ये असांज याला अटक केल्यापासून ते आतापर्यंतची वेळ दर्शवली जाते. फेब्रुवारी 2022 मध्ये AssangeDAO, या नावाच्या एका संस्थेने 52.7 मिलियन डॉलर्सला ही NFT विकत घेतली होती.

2. The First 5000 Days : किंमत 69.3 मिलियन डॉलर्स

First 5000 Days
Image Source : www.en.wikipedia.org

The First 5000 Days ही आतापर्यंतची दुसरी सर्वात महागडी NFT आहे. बीपल (Beeple) यांनी तयार केलेल्या या NFTला पहिली बोली फक्त 100 डॉलर्सची आली होती. काही तासातच या NFTने 1 मिलियन डॉलर्सची बोली पार केली आणि 21 फेब्रुवारी 2021 मध्ये बीपल यांनी 69 मिलियन डॉलर्सची बोली यासाठी लावली. मेटाकोव्हन (Metakoven) Metapurseचे संस्थापक आणि CEO यांनी ही बोली लावली होती.

1. The Merge : किंमत 91.8 मिलियन डॉलर्स

The Merge
Image Source : www.barrons.com

द मर्ज हे एक व्हर्चुअल आर्टवर्क आहे; जे PAK यांनी तयार केले होते. डिसेंबर 2021 मध्ये ही NFT 91.8 मिलियन डॉलर्सला विकली गेली होती. द मर्जमध्ये 3 मोठे सफेद वस्तुमान आहेत व त्यामागे काळा पृष्ठभाग आहे. या NFT मध्ये सिक्युरिटी सिस्टिम देखील बसवण्यात आली आहे. द मर्ज ही NFT 3,12,686 भागांमध्ये विभागलेली आहे. जे इन्व्हेस्टर हे वस्तुमान गोळा करत जातील त्यांचे मूल्य देखील वाढेल, असा कॉन्सेप्ट यामध्ये वापरला आहे.