Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

जाणून घ्या क्रिप्टोकरन्सी (Crypto Currency) आणि एनएफटी (NFT) काय आहे?

जाणून घ्या क्रिप्टोकरन्सी (Crypto Currency) आणि एनएफटी (NFT) काय आहे?

Image Source : www.vivanicemk.live/www.linkedin.com

क्रिप्टोकरन्सी असलेली बिटकॉईन ही एक डिजिटल मालमत्ता आहे; तर एनएफटी ही अद्वितीय डिजिटल मालमत्ता आहे.

इंटरनेट आणि डिजिटलायझेशनच्या युगात नवनवीन प्रयोग आणि तंत्र विकसित होत आहेत. सध्याचा डिजिटल पेमेंट आणि डिजिटल करन्सीची मोठी चर्चा सुरू आहे. त्यात NFT म्हणजेच नॉन-फंगीबल टोकन आणि क्रिप्टोकरन्सीबद्दल खूपच उत्सुकता असल्याचे दिसून येत आहे. एनएफटीच्या (NFT) माध्यमातून गेम्स, पेंटिंग्ज, अल्बम, मीम्स, म्युझिक इत्यादी विकले जाते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोक या गोष्टींना हात लावू शकत नाही. त्या फक्त डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. तर बिटकॉईन्सची देवाणघेवाण केली जाऊ शकते. कारण त्यांची किंमत समान असते. पण एनएफटीच्या बाबतीत असे नाही. एनएफटीचे प्रत्येक टोकन हे अद्वितीय (युनीक) असते. दोन एनएफटींची देवाणघेवाण करता येत नाहीत. बिटकॉईन ही एक डिजिटल मालमत्ता आहे; तर एनएफटी ही अद्वितीय डिजिटल मालमत्ता आहे, असे म्हणता येईल.

नॉन-फंगीबल टोकन (NFT) म्हणजे काय?

NFT म्हणजे नॉन-फंगीबल टोकन. हे बिटकॉईन किंवा इतर क्रिप्टोकरन्सीप्रमाणेच एक टोकन आहे. NFT हे युनिक टोकन आहे. इंटरनेट मायाजालावरील ही डिजिटल मालमत्ता असून ती व्हॅल्यू निर्माण करते.

फंगीबल आणि नॉन-फंगीबल यांच्यातील फरक

फंगीबल म्हणजे जे आपापसात बदलता येऊ शकते किंवा ज्याची विभागणी केली जाऊ शकते असे. उदाहरणाद्वारे सांगयाचे झाले तर, 100 रूपयांची एक नोट ही वापरली जाऊ शकते किंवा तीच नोट दहाच्या 10 नोटांमध्ये किंवा 50 च्या 2 नोटांमध्ये विभागली जाऊ शकते. पण नॉन-फंगीबलमध्ये आपापसात बदल करता येत नाही किंवा ज्याची विभागणी करता येणार नाही.

क्रिप्टोकरन्सी (Crypto Currency) म्हणजे काय?

क्रिप्टोकरन्सी हे संगणकाच्या अल्गोरिदमवर तयार केलेले चलन आहे. ते कोणत्याही एका प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली नाही. हे एक डिजिटल चलन असून याच्यासाठी क्रिप्टोग्राफी वापरली जाते. साधारणपणे कोणत्याही वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा सेवा खरेदी करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.

एनएफटी आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये काय वेगळेपण आहे?

एनएफटी आणि क्रिप्टो चलनात फरक आहे. एनएफटी ही एक युनीक डिजिटल मालमत्ता आहे; तर क्रिप्टो हे डिजिटल करन्सी (चलन) आहे. करन्सीचा वापर पेमेंटशी संबंधित गोष्टींसाठी केला जातो, तर एनएफटीद्वारे एखाद्या उत्पादनाची मालकी मिळवून देता येते.