संपूर्ण जग वेगाने डिजिटलायझेशनने वाटचाल करत आहे. या डिजिटल दुनियेत अनेक गोष्टींचा सतत मारा होत असतो. सध्या बिटकॉईन, क्रिप्टाकॉईन्स बरोबरच NFT नावाची चर्चा जोरात सुरू आहे. NFT हे एक नॉन-फंगीबल टोकन आहे. याला क्रिप्टोग्राफिक टोकन असेही म्हटले जाते. डिजिटलायझेनशनच्या काळात NFT बद्दल माहिती आवश्यक आहे. हे फक्त एक टोकनच नाही तर यातून तुमची कमाई सुद्धा होऊ शकते आणि ठरवले तर गुंतवणूक करण्याचा एक पर्याय ही ठरू शकतो.
NFT म्हणजे काय?
NFT म्हणजे नॉन-फंगीबल टोकन. हे बिटकॉईन किंवा इतर क्रिप्टोकरन्सीप्रमाणेच एक टोकन आहे. NFT हे युनिक टोकन आहे. इंटरनेट मायाजालावरील ही डिजिटल मालमत्ता असून ती व्हॅल्यू निर्माण करते.
बिटकॉईन्सची जशी देवाणघेवाण करता येते, तशी NFT ची देवाणघेवाण करता येत नाही. कारण हे युनिक आर्ट पीस आहे. याचे प्रत्येक टोकन हे युनिक आहे. या डिजिटल टोकनला ओनरशिपचे व्हॅलिड सर्टिफिकेट मिळते. तो त्याला एक प्रकारचा कॉपीराईटचा अधिकार देते.
NFT काम कसे करते?
NFT ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीच्या मदतीने काम करते. NFT मध्ये टोकन बनविण्याकरिता इथेरियम ब्लॉकचेनचा उपयोग केला जातो. इथेरियम हे एक क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्म आहे. नॉन-फंजिबल टोकन डिजिटल मालमत्ता किंवा एकमेकांपासून वेगळे न करता येणाऱ्या डिजिटल वस्तूंची विक्री आणि खरेदी करण्यासाठी वापरले जाते.
NFT हे कला क्षेत्राला डिजिटल माध्यमाद्वारे नवीन मुलामा देण्याचे काम करत आहे. जेव्हा आपण एखादे आर्ट, डिजिटल जगात निर्माण करतो. ते आर्ट जर लोकांना आकर्षित करत असेल तर त्याला NFT म्हणून घोषित केले जाते. याची तुलना आपण बिटकॉईनशी करू शकतो. क्रिप्टोकरन्सीप्रमाणे NFT टोकनच्या स्वरूपात आपण आर्ट खरेदी करू शकतो. पण हे टोकन आपल्याला दिसत नाही. ते न पाहता ही आपण त्याची खरेदी आणि विक्री करू शकतो. या डिजिटल टोकनला वैध प्रमाणपत्र असते. खरेदी केलेल्या व्यक्तीला त्याच्या मालकीचे प्रमाणपत्र मिळते. हे प्रमाणपत्र मालकाला कॉपीराइटचा अधिकार सुद्धा देतात.
NFT साठी रजिस्टर कसे करतात?
NFT आपण ऑनलाईन वेबसाईटद्वारे खरेदी करू शकतो. मात्र याची खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे असलेले पैसे हे इथेरियम मध्येच असायला पाहिजेत. इथेरियमद्वारेच तुम्ही NFT ची खरेदी करू शकता. NFT टोकन खरेदी-विक्री करणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आहेत. इंटरनेटवर याची खरेदी-विक्री करणाऱ्या वेबसाईटची यादी तुम्हाला मिळू शकते.