Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Best Super Saver Plan: बेस्टच्या 'Chalo App' आणि 'Chalo Card'मधून मिळणारे हे सेव्हर प्लॅन तुम्हाला माहित आहेत का?

Best Bus Super Saver Plan

Best Super Saver Plan: बेस्ट प्रशासनाने मुंबईकरांसाठी सुखकर, आरामदायी आणि कमीत कमी पैशांतून चांगला प्रवास घडवून आणण्याबरोबरच, प्रवाशांचा फायदा होईल असा सुपर सेव्हर प्लॅन (Chalo Card Super Saver Plan) आणला आहे.

Chalo Card Super Saver Plan: बेस्ट प्रशासनाकडून मुंबईकरांसाठी कमीतकमी तिकिटदरामध्ये चांगला प्रवास घडवून आणला जात आहे. त्याचबरोबर आता बेस्टने नियमित प्रवाशांसाठी सुपर सेव्हर प्लॅन आणले आहेत. या सुपर सेव्हर प्लॅनने बेस्टने नियमित प्रवास करणाऱ्या ग्राहकांची किमान 20 ते कमाल 34 टक्क्यांची बचत होणार आहे.

जे ग्राहक दररोज तिकिट काढून बसने प्रवास करतात. अशा प्रवाशांसाठी बेस्टने चलो अ‍ॅप आणि चलो कार्डच्या माध्यमातून सेव्हिंग प्लॅन्स आणले आहेत. जसे की, एका प्लॅनद्वारे प्रवाशांना 7 दिवसांत 15 वेळा बसमधून प्रवास करता येणार आहे आणि यासाठी नियमित तिकिटाच्या दरानुसार ग्राहकाला 90 रुपयांऐवजी चलो अ‍ॅप किंवा चलो कार्डच्या माध्यमातून फक्त 59 रुपये भरावे लागतील. म्हणजे या 7 दिवसांच्या तिकिटातून ग्राहकाचे 31 रुपये वाचणार आहेत.

Best Super Saver Plan
या चार्टमधील ऑफर ही किमान 6 रुपयांच्या तिकिटावर लागू आहे. 

तसेच  28 दिवसात 60 वेळा बसने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना तिकिटदरानुसार 360 रुपये भरावे लागतात. पण यासाठी प्रवाशांनी चलो अ‍ॅप आणि चलो कार्डचा वापर केला तर प्रवाशांना 360 रुपयांऐवजी फक्त 219 रुपये भरावे लागतील. या स्कीममधून प्रवाशांचे एकूण 141 रुपये सेव्ह होणार आहेत.

जे प्रवासी दररोज बेस्ट बसने प्रवास करतात. ते तिकिटासाठी चलो अ‍ॅप (Chalo App) किंवा चलो कार्डचा (Chalo Card) वापर करू शकतात आणि यामुळे प्रवाशांना सुट्टे पैसे बाळगण्याची किंवा पैसेसुद्धा बाळगण्याची गरज पडणार नाही.

चलो स्मार्ट कार्ड वापरा आणि पैशांची बचत करा 

बेस्टने 'चलो कार्ड' आणि 'चलो ॲप'च्या माध्यमातून प्रवाशांसाठी डिजिटल सेवा उपलब्ध करून दिली. चलो कार्डमध्ये प्रवाशी ठराविक रक्कम भरून बेस्टच्या कोणत्याही बसने प्रवास करू शकतात. यासाठी प्रवाशांना रोख पैसे किंवा नेमके सुट्टे पैसे सोबत ठेवण्याची गरज नाही. या सुविधेबरोबरच बेस्ट प्रशासनाने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सुपर सेव्हर प्लॅन देखील आणला आहे. जो एसी आणि नॉन-एसी अशा दोन्ही बससाठी लागू असणार आहे. या सुपर सेव्हर प्लॅनमधून ग्राहकांचे किमान 3 रुपयांपासून ते जास्तीत जास्त 600 रुपयांची बचत होऊ शकते.

सुपर सेव्हर प्लॅनचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना BEST Chalo Card आणि BEST Chalo App चा वापर करणे बंधनकारक आहे. या प्लॅनबरोबरच प्रवाशी 13 रुपये, 19 रुपये आणि 25 रुपयांच्या तिकिटांवरही डिस्काऊंट मिळवू शकतात.

चलो ॲपच्या माध्यमातून प्रवासी तिकिटांसोबत बसचा लाईव्ह ट्रॅकसुद्धा ठेवू शकणार आहेत. या ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना बसचे लोकेशन कळण्यास मदत होते. अशाप्रकारे बेस्ट प्रशासन प्रवाशांना अत्याधुनिक सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे.