• 04 Oct, 2023 12:36

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

राष्ट्रपतींचे मासिक वेतन, या राष्ट्रप्रमुखांचे वार्षिक पॅकेज वाचून व्हाल थक्क!

DRAWPADI MURMU

भारताचे सर्वोच्च संविधानिक पद भूषवणाऱ्या द्रौपदी मुर्मू या आतापर्यंतच्या हे पद भूषविलेल्यांपैकी सर्वांत कमी वयाच्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. देशाचे प्रथम नागरिक म्हणून पदावर असताना राष्ट्रपती यांना दरमहा किती वेतन मिळते? त्यांना काय-काय लाभ मिळतात याची माहिती जाणून घेऊ.

नुकत्याच भारताच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून श्रीमती द्रौपदी मुर्मू (India's New President Draupadi Murmu) यांनी शपथ घेतली. देशाचे सर्वोच्च संविधानिक पद भूषवणाऱ्या मुर्मू या आतापर्यंत हे पद भूषविलेल्यांपैकी सर्वांत कमी वयाच्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. देशाचे प्रथम नागरिक म्हणून पदावर असताना राष्ट्रपती यांना दरमहा किती वेतन मिळते? त्यांना काय-काय लाभ मिळतात याची माहिती जाणून घेऊ. (Monthly Salary of Draupadi Murmu)

भारताच्या महामहिम राष्ट्रपती यांना दरमहा पाच लाख रुपयांचे वेतन अदा केले जाते. राष्ट्रपती भवन (Presidential House) हे राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे. याशिवाय आरोग्यविषयक व इतर सोयीसुविधा केंद्र सरकारकडून राष्ट्रपतींना पुरवल्या जातात. 

केंद्र सरकारने 2017 मध्ये राष्ट्रपतींच्या वेतनात मोठी वाढ केली होती. राष्ट्रपतींचे वेतन 1.5 लाख रुपयांवरुन थेट 5 लाख रुपये इतके वाढवण्यात आले होते. याशिवाय राष्ट्रपतींचा कार्यकाळ पूर्ण झाला त्यांना दरमहा तब्बल 2.5 लाख रुपयांचे पेन्शन दिले जाते. यात किमान 2.5 लाख किंवा त्यांच्या वेतनाच्या 50 टक्के रक्कम निवृत्ती वेतन आणि इतर लाभ दिले जातात. याचबरोबर माजी राष्ट्रपतींना कार्यालयीन खर्चासाठी दरवर्षी 1 लाख रुपये दिले जातात. माजी राष्ट्रपतींना वर्षाकाठी 12 वेळा विमान, रेल्वे किंवा जहाजाच्या उच्च श्रेणीतून निशुल्क प्रवास करण्याची सुविधा दिली जाते. 

नवनियुक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी

  • भारताच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून निवड
  • वयाच्या 64 व्या वर्षी राष्ट्रपतीपदी विराजमान 
  • आतापर्यंत सर्वात कमी वय असलेल्या राष्ट्रपती 
  • द्रौपदी मुर्मू यांचा ओडिसामधील मयूरभंज जिल्ह्यात 1958 मध्ये जन्म 
  • 1979 मध्ये भुवनेश्वरमधील रमादेवी कॉलेजमधून 'बीए'ची पदवी उत्तीर्ण
  • 1997 मध्ये भाजपमध्ये प्रवेश, त्याच वर्षी नगरसेविका म्हणून निवड
  • 2000 व 2009 मध्ये आमदार म्हणून विजयी. 
  • 2002 व 2004 ओडिसा सरकारमध्ये दोनदा मंत्रीपद भूषवले
  • 2015 ते 2021 या कालावधीत झारखंडच्या राज्यपाल म्हणून कार्यरत

Worlds Highest Salaried Top 5 President
 
हे झालं भारताच्या राष्ट्रपतींच्या वेतन आणि इतर लाभांबाबत, आता जगभरात सर्वाधिक वेतन घेणाऱ्या राष्ट्रप्रमुखांविषयी माहिती घेऊ (Highest Paid President in the world 2022). जागतिक पातळीवर विचार केला तर सिंगापूरच्या प्रमुखांना इतर राष्ट्रप्रमुखांच्या तुलनेत सर्वाधिक वर्षिक 1,610,000 डॉलर (भारतीय चलनात 12.84 कोटी रूपये)  वेतन आहे. आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष वार्षिक वेतनाच्या दृष्टीने चौथ्या स्थानी आहेत. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे वार्षिक सॅलरी पॅकेज तब्बल 4,00,000 डॉलर (भारतीय चलनात 3.19 कोटी रूपये) आहे.