Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

तुम्हाला माहित आहे का राष्ट्रपतींना किती पगार मिळतो ?

gov bhagat sing koshyari

राष्ट्रपतींची निवड ही संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांमार्फत (Members of Parliament) केली जाते. राष्ट्रपतींचं वेतन आणि भत्तेही संसदेद्वारे ठरवले जातात. सध्या भारताचे चौदावे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) या पदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

आपल्याला सगळ्यांनाच उत्सुकता असते मोठ्या प्रसिद्ध व्यक्ती महिन्याला किती कमवतात. साधारणपणे अभिनेता किंवा अभिनेत्री किती कमवतात याची माहिती आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून मिळत असते. पण काही देशातील महत्वाच्या पदावर असलेल्या खास व्यक्ती किती कमवतात, त्यांना कर भरावा लागत असेल का, तसेच त्यांना कोणत्या सुविधा मिळतात हे जाणून घेण्याची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच असते. आज आपण भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांना किती पगार (Salary) मिळतो, या पगारावर त्यांना कर (Tax) द्यावा लागतो का, तसेच त्यांना कोणत्या सुविधा मिळतात याची माहिती घेणार आहोत.  

राष्ट्रपतींना किती पगार मिळतो     

राष्ट्रपतींची निवड हि संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांमार्फत (Members of both Houses of Parliament) केली जाते. तसेच राष्ट्रपतींचं वेतन आणि भत्तेही संसदेद्वारे ठरवले जातात. सध्या भारताचे चौदावे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) या पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. राष्ट्रपतींना दरमहा 5 लाख रुपये पगार (Salary) दिला जातो. या वेतनाव्यतिरिक्त अनेक भत्ते आणि काही लाभ त्यांना मिळतात. त्यामध्ये निवास व्यवस्था, वैद्यकीय सुविधा इत्यादींचा समावेश असतो. निवृत्तीनंतरही त्यांना अनेक सेवा-सुविधा मिळतात. भारताच्या राष्ट्रपतींना मिळणारे वेतन हे पेन्शन अधिनियम 1951 अंतर्गत येते. या अधिनियमानुसार राष्ट्रपतींचे वेतन, भत्ते आणि सेवानिवृत्तीनंतर मिळणारे लाभ निश्चित करण्यात आले आहेत. 2017 मध्ये भारत सरकारने भारताच्या राष्ट्रपतींचे वेतन 1.5 लाख रुपये प्रति महिन्यावरून वाढवून 5 लाख रुपये प्रति महिना करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सध्याच्या राष्ट्रपतींना ५ लाख रुपये प्रति महिना इतके वेतन मिळते.

राष्ट्रपतींना कर द्यावा लागतो का 

प्राप्तिकर अधिनियम आणि राष्ट्रपती पेन्शन अधिनियम हे दोन्ही नियम राष्ट्रपतींच्या वेतनात कर सवलत देत नाहीत. त्यामुळेच राष्ट्रपतींना आपल्या उत्पन्नावर प्राप्तिकर भरावा लागतो. 2021 साली झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्याला 5 लाख पगार असल्याचे सांगितले. तसेच आपण दर महिन्याला पावणेतीन लाख रुपये कर भरत असल्याचे जाहीर केले.


राष्ट्रपतींना मिळणाऱ्या सुविधा 

नवी दिल्लीमध्ये असलेलं राष्ट्रपती भवन (Rashtrapati Bhavan) हे भारताच्या राष्ट्रपतींचं अधिकृत निवासस्थान आहे. 2 लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या राष्ट्रपती भवनात 340 खोल्या आहेत. तसेच राष्ट्रपतींना आयुष्यभर मोफत वैद्यकीय सेवा मिळते. तसेच भारताच्या राष्ट्रपतींसाठी कस्टम-बिल्ट ब्लॅक मर्सिडीज बेंझ एस 600 (डब्ल्यू 221) पुलमॅन गार्ड ही सुसज्ज गाडी असते. तर अधिकृत दौऱ्यात राष्ट्रपतींसाठी शस्त्रास्त्रांनी सुसज्ज अशी लिमोझिन हि गाडी असते.

राष्ट्रपतींना निवृत्तीनंतर मिळणाऱ्या सुविधा  

  • राष्ट्रपतींना दरमहा 1.5 लाख रुपये पेन्शन (Pension) दिली जाते. 
  • राष्ट्रपतींच्या जोडीदाराला दरमहा 30 हजार रुपयांची सचिवात्मक मदत मिळते.
  • एक सुसज्ज बंगला
  • दोन लँडलाइन आणि मोबाइल फोन
  • पाच खासगी कर्मचारी, ज्यांचा वार्षिक खर्च 60,000 रुपये दिला जातो.
  • जोडीदारासह रेल्वे किंवा विमानाने विनामूल्य प्रवास.


राष्ट्रपती हे भारताचे पहिले नागरिक असतात. त्यामुळे त्यांची सुरक्षा करणे देशाची पहिली जबाबदारी आहे.

image source - https://bit.ly/3NdMTXv