No Cost EMI Scheme True or False : नो-कॉस्ट इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट (No Cost EMI) ही आता एक लोकप्रिय योजना बनत आहे. कारण आपल्याला कोणत्याही महागड्या वस्तू खरेदी करायच्या असल्यास, आपण त्या आधी खरेदी करुन त्यानंतर आपल्या सोयीनुसार त्याचे पैसे देऊ शकतो. मुख्य म्हणजे अनेक महागड्या वस्तू खरेदी करतांना त्यावर कुठल्याही व्याजाची किंवा अतिरिक्त शुल्क आकारण्याची चिंता नसते.
नो-कॉस्ट EMI म्हणजे काय
जेव्हा तुम्ही खरेदी करण्यासाठी नो-कॉस्ट EMI निवडता, तेव्हा याचा अर्थ तुम्ही त्या उत्पादनासाठी मासिक हप्ते भरणार आहात. परंतु त्यावर कोणतेही व्याज किंवा शुल्क आकारले जाणार नाही, असे व्यावसायिक सांगतात. मात्र खरा तर्क लावल्यास या नो-कॉस्ट ईएमआयचे गणित असे आहे की, तुम्ही घेतलेल्या वस्तुच्या एकुण किमतीच्या जेव्हा काही महिन्याच्या EMI विभागून दिल्या जातात. तेव्हा त्यामध्येच तुमचे व्याज आणि प्रक्रिया शुल्क देखील आधीच समाविष्ट केलेले असते. या नो-कॉस्ट EMI मध्ये जे छूपे शुल्क आकारले जाते, ते ग्राहकाला कळू दिल्या जात नाही.
ज्यावेळी सण-समारंभ, लग्नकार्य सुरु होतात. त्यावेळी या योजनांची मार्केटिंग सर्वाधिक केल्या जाते. म्हणजेच त्याच काळात टी.व्ही., फ्रिज, वॉशिंग-मशीन, मोबाईल फोन यासारख्या अनेक वस्तूंवर वेगवेगळ्या ऑफर दिल्या जातात. मात्र, ज्यावस्तूंवर अधिक ऑफर , सुविधा दिल्या जातात. त्यांची किंमत जास्त असू शकते. मात्र ग्राहकांना त्यामधील छूपी किंमत सांगितल्या जात नाही. अनेक कंपन्या नो-कॉस्ट ईएमआयच्या नावाखाली व्याजासह प्रोसेसिंग फी देखील आकारतात. तसेच नो-कॉस्ट ईएमआयच्या माध्यमातून खरेदी केलेल्या वस्तूंवर डिलिव्हरी चार्जही भरावा लागतो.
वस्तू घेण्यापूर्वी 'हे' तपासा
नो-कॉस्ट EMI स्किम अंतर्गत घेत असाल, तर केवळ व्यावसायिकाच्या किंवा सेल्समनच्या भूलपाथाला बळी न पडता, ई-कॉमर्स साइट्सवर किंवा ऑफलाईन वर त्या वस्तूची किंमत व्यवस्थित चेक करा. त्या वस्तूवर आकारल्या जाणारे एकूण एक चार्जेस चेक करा. त्यानंतर तुम्हाला कळून येईलच की, No Cost EMI मध्ये खरोखरचं तुमचे पैसे वाचत होते, की कंपनी तुम्हाला मुर्ख बनवत होती ते माहिती होईल.