खाणकाम उद्योगातील अग्रगण्य कंपनी वेदांताने मंगळवारी तिसऱ्यांदा प्रत्येक शेअर्समागे 17.50 रुपये लाभांश (Vedanta 3rd Interim Dividend 2022) जाहीर केला. कंपनीने जाहीर केलेल्या या लाभांशामुळे कंपनीला 6,505 कोटी रुपये शेअर्सधारकांवर खर्च करावे लागणार आहेत. 30 नोव्हेंबरपर्यंत भागधारकांना हा लाभांश दिला जाणार आहे.
मायनिंग जाएंट म्हणून ओळख असलेल्या वेदांताने 2022 या आर्थिक वर्षात तिसऱ्यांदा लाभांश जाहीर केला आहे. कंपनीने याबाबत अधिकृतरित्या मंगळवारी (दि.22 नोव्हेंबर) ही माहिती जाहीर केली. प्रत्येकी एका इक्विटी शेअरमागे कंपनी भागधारकाला 17.50 रुपये लाभांश देणार आहे.
वेदांता कंपनीने यापूर्वी भागधारकांना दोनवेळा लाभांश दिला आहे. पहिल्यावेळी कंपनीने 31.5 रुपये आणि दुसऱ्यावेळी 19.50 रुपये असे मिळून कंपनीने प्रति शेअरमागे 51 रुपये लाभांश दिला आहे आणि आता कंपनी प्रत्येक शेअरमागे 17.50 रुपये देणार आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष 2023 मध्ये वेदांता कंपनीला 3.2 बिलिअन डॉलर्सची तरतदू करावी लागणार आहे. कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरने मंगळवारी (दि. 22 नोव्हेंबर) याबाबतचा ठराव पास करून जाहीर (Vedanta Board Meeting) केला.
वेदांता रिसोर्सेसचा वेदांता लिमिटेड कंपनीत 69.7 टक्के हिस्सा!
वेदांता लिमिटेड कंपनी तेल आणि गॅस, जस्त, शिसे, चांदी, अॅल्युमिनिअम, लोखंड, स्टील आणि वीज आदी क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. वेदांताचे मुख्यालय लंडनमध्ये असून वेदांता रिसोर्सेस ही वेदांता लिमिटेड कंपनीची पॅरेन्ट कंपनी आहे आणि यामध्ये कंपनीचा 69.7 टक्के हिस्सा आहे.
दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 61 टक्के घट!
चालू वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजे जुलै-सप्टेंबरमध्ये वेदांताचा नफा 60.8 टक्क्यांनी कमी होऊन 1808 कोटीवर आला होता. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 4,615 कोटी रुपयांचा लाभ झाला होता. 2022 मध्ये जुलै ते सप्टेंबर या कालावधीत खर्चात वाढ होऊन तो 33,221 कोटी एवढा झाला होता. जो मागील वर्षी 23,171 कोटी रुपये होता. दुसऱ्या तिमाहीत उत्पन्नात वाढ झाल्याने कंपनीली 37,351 कोटी रुपयांचा फायदा झाला होता. तर गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीला 31,074 कोटी रुपयांचा फायदा झाला होता.