Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Digital Rupee: बिहारचा फळ विक्रेता मुंबईत डिजिटल रूपी ने करतोय व्यवहार, RBI च्या ट्रायलमध्ये झाली निवड

Digital Rupee

Image Source : www.india.postsen.com

मुंबईतील आरबीआय मुख्यालयाजवळील मिंट रोडवर फळविक्रेता म्हणून व्यवसाय करणाऱ्या लाल साहनी यांचा ई-रुपीचा पायलट प्रोजेक्टमध्ये सहभाग आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) म्हणजेच डिजिटल-रुपी (Digital Rupee) हा प्रकल्प सध्या प्रायोगिक स्वरूपात राबवत आहे. यालाच ई-रुपी (E-Rupee) देखील म्हटले जाते.

काही वर्षांपासून ऑनलाईन पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो आहे. ऑनलाईन पेमेंट (Online Payment) करण्यासाठी वेगवगेळ्या प्रकारचे अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. आर्थिक व्यवहारात होत असलेले हे बदल लक्षात घेता भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) म्हणजेच ई-रुपी हा प्रकल्प सध्या प्रायोगिक स्वरूपात राबवत आहे.      

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये RBI ने किरकोळ बाजारात ई-रुपीचा पायलट प्रोजेक्ट सुरु केला आहे. या प्रकल्पात देशभरातील काही निवडक लोकांचा समावेश केला गेला आहे. या निवडक लोकांमध्ये मुंबईतला एक फळविक्रेता देखील आहे. आरबीआय मुख्यालयाजवळील मिंट रोडवर फळविक्रेता म्हणून व्यवसाय करणाऱ्या या व्यक्तीचे नाव आहे लाल साहनी (Lal Sahani). पंचवीस वर्षांपूर्वी बिहारमधील वैशाली येथून ते रोजगारासाठी मुंबईत आले. त्यांनी आतापर्यंत वेगवेगळे व्यवसाय केले आहेत. सध्या ते फळविक्रेता म्हणून काम करत आहेत. ई-रुपीच्या पायलट प्रोजेक्टसाठी आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला संपर्क केला आणि IDFC फर्स्ट बँकेत (IDFC First Bank) डिजिटल वॉलेटसह (Digital Wallet) स्वतंत्र खाते उघडण्यास मदत केल्याचे लाल साहनी यांनी म्हटले आहे.  45 वर्षीय साहनी यांची देशव्यापी पायलट प्रोजेक्टसाठी निवड झाली होती. त्यांनी सांगितले की ट्रायल सुरू होऊन एक महिना झाला आहे आणि त्यांनी ई-रुपीद्वारे आतापर्यंत  2-3 व्यवहार केले आहेत. हे व्यवहार फक्त 300 रुपयांचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.     

पायलट प्रोजेक्ट कुठे सुरू ?    

ई-रुपीचा पायलट प्रोजेक्ट सध्या दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि भुवनेश्वरमध्ये सुरू आहे. मात्र, येत्या काही दिवसांत त्याचा विस्तार करण्यात येणार आहे. RBI लवकरच अहमदाबाद, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इंदोर, कोची, लखनौ, पटना आणि शिमला येथे चाचणी सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहे. सध्या या चाचणीत ICICI बँक, येस बँक आणि IDFC फर्स्ट बँक यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांना देखील या प्रकल्पात सहभागी करून घेण्याची तयारी सुरू आहे.     

कसा होता फळविक्रेत्याचा अनुभव ?     

साहनी सांगतात की चाचणी टप्प्यात व्यवहारांची संख्या कमी असली तरी रोख आणि UPI व्यतिरिक्त आता दुकानदारांना पेमेंट घेण्याचा दुसरा पर्याय उपलब्ध झाला आहे. ई-रुपी मध्येही काही अडचणी असल्याचे त्यांनी सांगितले. ई-रुपीने  व्यवहार करताना उशीर होत असल्यास किंवा पेमेंट अयशस्वी झाल्यास, ग्राहक पेमेंटच्या इतर डिजिटल पद्धती निवडतात, ज्या सध्या जलद आणि सुलभ आहेत. एका ग्राहकाने मला काही दिवसांपूर्वी 50 रुपयांचे ई-रुपी पेमेंट केले, परंतु काही दिवसांनंतर जेव्हा तो ग्राहक पुन्हा माझ्याकडे आला तेव्हा त्याला पेमेंट करता आले नाही.     

ई-रुपी हे कागदी चलन आणि नाण्यांच्या ठरवून दिलेल्या मुल्यानुसारच चलनात असेल. डिजिटल वॉलेटची सुविधा देणाऱ्या बँका ग्राहकांना डिजिटल टोकन देतील जे चलनी नोटांशी समकक्ष असतील. यामुळे पैसे डिजिटली ट्रान्स्फर करता येणार आहेत.