Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FAQ Digital Rupee : डिजिटल रुपीचा वापर कसा करायचा, जाणून घ्या संपूर्ण माहिती!

What is Digital Rupee

FAQ Digital Rupee : डिजिटल रुपी ही सीबीडीसी म्हणजेच सेंट्रल बॅंक डिजिटल करन्सी. ही करन्सी भारताची केंद्रीय बॅंक म्हणजे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्यावतीने जारी करण्यात आली.

आजपासून (दि.1 नोव्हेंबर) आरबीआयने डिजिटल रुपी (Digital Rupee) व्यवहारात आणले आहेत. डिजिटल रुपी म्हणजे नेमंक काय? तो कसा वापरयाचा? असे बरेच प्रश्न तुम्हाला पडले असतील. डिजिटल रूपीबाबत तुमच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.

डिजिटल रुपी म्हणजे काय?  What is Digital Rupee?

सीबीडीसी म्हणजे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी होय. सीबीडीसी केंद्रीय बँकेद्वारे जारी करण्यात आलेल्या चलनी नोटांचे एक डिजिटल रूप आहे. भारतात रिझर्व्ह बँकेने देऊ केलेले हे चलन – सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (Central Bank Digital Currency) किंवा डिजिटल रुपया (Digital Rupee) म्हणून ओळखले जाईल. या चलनाला अर्थातच रिझर्व्ह बँकेकडून कायदेशीर मान्यता आहे.

डिजिटल रुपी कसे कार्य करेल? (How does Digital Rupee Work)

डिजिटल रुपीमुळे रोख रकमेशिवाय आर्थिक व्यवहार करता येणार आहेत. धनादेश किंवा ऑनलाईन पेमेंट (Online Payment) करताना व्यवहारात बँकेचा सहभाग असतो. पण डिजिटल रुपीमध्ये बँकेचा सहभाग नसेल. देशाच्या अधिकृत करन्सीप्रमाणेच डिजिटल रुपी असणार आहे. डिजिटल रुपीवर आरबीआयचे पूर्णपणे नियंत्रण असणार आहे. ज्याप्रमाणे रोख रक्कम आपण बँकेमधून काढतो किंवा एखाद्या व्यक्तीने आपल्याला रोख रक्कम दिलेली असते. अगदी तसेच डिजिटल रुपी कार्य करणार आहे. थोडक्यात डिजिटल रुपी आपल्याला आरबीआयकडून दिलेला असेल किंवा कोणत्यातरी व्यवहारात कोणीतरी आपल्याला तो दिलेला असेल.

सीबीडीसीचे प्रमुख दोन प्रकार कोणते? ते कोणासाठी उपलब्ध असतील? (Types Of CBDC)

चलनी नोटांचे डिजिटल रूप म्हणजे सीबीडीसी होय. केंद्रीय बँकेद्वारे आपल्या येथे रिझर्व्ह बँकेकडून काही कमर्शिअल बँकांद्वारे डिजिटल रुपी वितरित केले जाणार आहे. डिजिटल रुपी हे देशाचे अधिकृत चलनच असणार आहे. सीबीडीसीचे प्रमुख दोन प्रकार पडतात. डिजिटल रुपी रिटेल (सीबीडीसी-आर/CBDC-R) आणि होलसेल (सीबीडीसी-डब्लू/CBDC/W). सर्वांच्या वापरासाठी सीबीडीसी-आर (CBDC Retail) उपलब्ध असणार आहे. तर काही वित्तीय संस्थांत्मक व्यवहारांमध्ये (Financial Institutional Transactions) होलसेल (सीबीडीसी-डब्लू) वापरता येणार आहे.

डिजिटल रुपयाची वैशिष्ट्ये (Features of Digital Rupee)

चलनी नोटांची छपाई किंमत, व्यवहार खर्च जास्त असतो. त्या तुलनेत डिजिटल रुपयाचा वापर स्वस्त आहे. डिजिटल रुपया मधून सुरक्षित व्यवहार करता येणार आहे. कोणतेही कार्ड, इंटरनेट बँकिंग शिवाय डिजिटल रुपया वापरता येणार आहे. डिजिटल रुपया हा क्यू आर कोड किंवा एसएमएसवर आधारित ई व्हाउचर असणार आहे.

क्रिप्टो चलनापेक्षा डिजिटल रुपया वेगळा कसा? (How Crypto Currency is Different from Digital Rupee)

क्रिप्टो चलनापेक्षा डिजिटल रुपया हा खूप वेगळा आहे. जेथे क्रिप्टो कोणत्याही देशाचे अधिकृत चलन नाही. तेथे डिजिटल रुपया जरी आरबीआय (Reserve Bank of India - RBI)ने आणला असून ते देशाचे अधिकृत चलन असणार आहे. क्रिप्टो ही डिसेंट्रलाइज्ड करन्सी आहे. तिच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. तर डिजिटल रुपी हे पूर्णपणे रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली असणार आहे.