Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

DGCA : प्रदीर्घ प्रतीक्षा करायला लावणाऱ्या एअरलाइन्सची यादी जाहीर

DGCA

Image Source : www.economictimes.indiatimes.com

विमानाने प्रवास करताना जर फ्लाईट्सना उशीर झाला (Flight Delay) तर विमान कंपन्या प्रवाशांना कोणती सुविधा पुरवतात? तसेच विमान कंपन्यांनी प्रवाशांना बोर्डिंग नाकारल्यास काय सुविधा मिळतात ते आज आपण पाहूया.

नागरी विमान वाहतूक नियामक DGCA (Directorate General of Civil Aviation) ने विमान कंपन्यांशी संबंधित डेटा जारी केला आहे. देशांतर्गत विमान वाहतूक 14 टक्क्यांनी वाढून 1.27 कोटी प्रवासी झाली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत इंडिगोचा (Indigo) वाटा सर्वाधिक आहे. हे प्रमाण 54.9 टक्के आहे. मात्र, त्यात घट झाली आहे. बाजारातील हिस्सा 55.7% वरून 54.9% वर आला आहे. याशिवाय एअर इंडिया गेल्या महिन्यात डिनाइड बोर्डिंगमध्ये अव्वल स्थानावर आहे. एअर इंडियाने (Air India) डिसेंबर महिन्यात 328 लोकांना बोर्डिंग नाकारले होते. बुकिंग असूनही स्पाइसजेटने 239, इंडिगोने 170 लोकांना सीट देण्यास नकार दिला.

एअरलाइन्स मार्केट शेअरवर एक नजर

  • इंडिगो- नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये बाजारातील हिस्सा ५५.७% वरून ५४.९% वर आला आहे.
  • स्पाइसजेट - नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये मार्केट शेअर 7.5% वरून 7.6% पर्यंत वाढला आहे.
  • विस्तारा - नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये बाजारातील हिस्सा 9.3% वरून 9.2% वर आला आहे.
  • एअर इंडिया - नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये मार्केट शेअर 9.1% वरून 9.2% पर्यंत वाढला आहे.

बोर्डिंग नाकारले

तिकीट बुक केले...एअरलाइन्सने नकार दिला....अनेक वेळा ओव्हर बुकिंगमुळे कंपन्या प्रवाशांना सीट देण्यास नकार देतात. एअर इंडियाने डिसेंबर महिन्यात 328 लोकांना बोर्डिंग नाकारले होते. बुकिंग असूनही स्पाइसजेटने 239, इंडिगोने 170 लोकांना सीट देण्यास नकार दिला. बोर्डिंग नाकारल्यामुळे, डिसेंबर महिन्यात सर्व विमान कंपन्यांनी प्रवाशांच्या नुकसानभरपाईसाठी 63 लाख रुपये खर्च केले. यामध्ये नवीन तिकिटे, निवास आणि नुकसानीचा समावेश आहे.

कॅन्सलेशन 

स्पाईस जेटची कॅन्सलेशन मध्ये सर्वात वाईट कामगिरी आहे. 5366 प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले. इंडिगोच्या 3500, अलायन्स एअरच्या 2279, एअर इंडियाच्या 2100 प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले.

प्रदीर्घ वाट पाहायला लावणाऱ्या एअरलाइन्स

इंडिगोचे 1,13,000 प्रवासी, एअर इंडियाचे 27000, स्पाइसजेटच्या 40000 हून अधिक प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागला. जर तुमच्या फ्लाइटला एअरलाइन्स कंपनीमुळे 2 तासांपेक्षा जास्त उशीर झाला, तर विमान कंपन्यांनी उशीरा फ्लाइटच्या बदल्यात प्रवाशांना नाश्ता आणि तिकीट द्यावे लागते. सर्व विमान कंपन्यांनी यासाठी एकूण दोन कोटी रुपये खर्च केले.