ज्या वयात लहान मुलं खेळतात,बागडतात,दंगा करतात, मौजमजा करतात, अशाच वयात देवांशी या लहान मुलीने संन्यास घेतला आहे. हे ऐकताना कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण ही घटना खरी आहे. देशातील सर्वात मोठ्या हिरे व्यापाऱ्याची 9 वर्षांची मुलगी सगळी धनसंपत्ती सोडून संन्यासी बनली आहे. केवळ 9 वर्षाच्या मुलीने घेतलेल्या या निर्णयाची सध्या समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा सुरू आहे.
देवांशीचे वडील करोडोंच्या संपत्तीचे धनी आहेत. देवांशीचे वडील धनेश संघवी हे जगातील सर्वात जुन्या हिरे कंपनीचे मालक आहेत. धनेश संघवी हे संघवी अँड सन्स कंपनीचे संस्थापक महेश संघवी यांचे एकुलते एक पुत्र आहेत. त्यांच्या या डायमंड कंपनीच्या शाखा देशात आणि जगात अनेक ठिकाणी आहेत. त्यांच्या हिरे कंपनीची उलाढाल आजघडीला कोट्यवधी रुपयांची आहे.देवांशी ही धनेश संघवी यांची मोठी मुलगी आहे. खरे तर भविष्यात तिला या कोट्याधीश कंपनीची जबाबदारी मिळणार होती. परंतु ही सगळी धनसंपत्ती सोडून ती संन्यासी बनली आहे.
देवांशी सुवर्णपदक विजेती आहे!
देवांशीने धार्मिक शिक्षणात प्रावीण्य मिळवले आहे.जैन धर्मियांच्या धार्मिक शिक्षणावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेत तिने सुवर्णपदक देखील पटकावले आहे. देवांशीला हिंदी, इंग्रजी, संस्कृत, जरवाडी आणि गुजराती भाषा लिहिता वाचता येतात. धार्मिक शिक्षणाव्यतिरिक्त देवांशीला संगीत, भरतनाट्यम आणि योग यांत देखील आवड होती. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, देवांशीने आजपर्यंत कधीही टीव्ही पाहिलेला नाही.
देवांशी हिचा दीक्षाविधी 14 जानेवारीपासूनच सुरू झाला होता. गेल्या बुधवारी 35000 लोकांच्या उपस्थितीत देवांशीने जैन धर्माची दीक्षा घेतली.एखाद्या राजकन्येप्रमाणे जगणारी देवांशी आता पांढऱ्या रंगाचे कपडे घालते, तिचे मुंडन देखील केले गेले आहे.
देवांशीचे वडील धनेश सिंघवी कोण आहेत?
देवांशी ही देशातील सुप्रसिद्ध हिरे व्यापारी धनेश सिंघवी यांची मुलगी आहे. धनेश यांना दोन मुली असून देवांशी ही त्यांची मोठी मुलगी आहे. धनेश हा त्यांचा बुककीपिंग व्यवसाय देखील सांभाळतात. त्यांच्या वडिलांनी 1981 मध्ये संघवी अँड सन्स डायमंड कंपनीची सुरूवात केली होती. इंडिया क्रेडिट रेटिंग एजन्सी ICRA च्या मते, आज या कंपनीचे मूल्य करोडो रुपये आहे. कंपनीचे ऑपरेटिव्ह उत्पन्न 2001 मध्ये 300.1 कोटी आणि वर्ष 2021 मध्ये 304.4 कोटी इतके होते.