Dabur buys stake in Badshah Masala: आजही टीव्हीवर बादशाह मसालेचे(Badshah Masala) गाणे लागले की, आपले कान लगेच टवकारतात. लहानपणापासून आपण याच गाण्याला आणि बादशहाच्या मसाल्यांचा(Badshah Masala) स्वाद घेत मोठे झालो आहोत. डाबर इंडिया लिमिटेड (Dabur India Limited) ने बादशाह मसाला(Badshah Masala) प्रायव्हेट लिमिटेडमधील बहुसंख्य हिस्सा घेण्यासाठी करार केला असून त्यासाठी 587.52 कोटी रुपये खर्च केला आहे. डाबर इंडिया बादशाहमधील 51 टक्के हिस्सा विकत घेत उर्वरित 49 टक्के हिस्सा पाच वर्षांच्या कालावधीत विकत घेण्याची योजना करण्यात आली आहे.
डाबरचा मसाल्यांच्या बाजारपेठेत प्रवेश
बादशाह मसाला (Badshah Masala) प्रायव्हेट लिमिटेडचे मूल्य 1152 कोटी रुपये आहे. हे अधिग्रहण डाबरच्या फूड बिझनेसला तीन वर्षांत 500 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याच्या आणि नवीन श्रेणींमध्ये विस्तार करण्याच्या योजनेच्या अनुषंगाने उपयोगी ठरणार आहे. यामुळे डाबरचा भारतातील 25 हजार कोटी रुपयांच्या ब्रँडेड मसाल्यांच्या बाजारपेठेत प्रवेश होणार आहे.
भागीदारीचा आनंद व्यक्त केला हेमंत झवेरींनी
डाबर इंडिया (Dabur India Limited) चे चेअरमन मोहित बर्मन यांनी सांगितले की, आम्ही आमचा फूड बिझनेस तयार करत असल्याने या संपादनामुळे आमच्या वाढीला गती मिळेल. डाबरचे संचालक पीडी नारंग म्हणाले की, या आर्थिक वर्षात हा व्यवहार पूर्ण होणे अपेक्षित असून यापूर्वी,कंपनीने सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत 4.9 अब्ज रुपये निव्वळ नफा आणि 2.5 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला होता. बादशाह मसालाचे व्यवस्थापकीय संचालक हेमंत झवेरी यांनीं सांगितले की, डाबरसोबत धोरणात्मक भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. डाबरशी हातमिळवणी केल्याने बादशाहची भविष्यातील वाढ मजबूत होईल. हा व्यवहार आम्हाला आमची उत्पादने डाबरच्या मोठ्या पोर्टफोलिओमध्ये जोडून आमच्या वाढीला गती देण्यास मदत करेल.