Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ONDC Network : ग्राहकांना मिळणार मोफत डिलिव्हरीचा फायदा, Paytm वर करा दमदार खरेदी

Paytm

छोट्या व्यापाऱ्यांना त्यांच्या वस्तू कमी परिचालन खर्चात ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात अधिक खर्च करावा लागतो. फ्लिपकार्ट, अमेझॉन आदी कंपन्यांची मक्तेदारी यानिमित्ताने मोडीत निघेल आणि सामान्य दुकानदारांना याचा फायदा होईल असे सरकारचे म्हणणे आहे. हाच विचार लक्षात घेता आता पेटीएमने देखील ONDC Network सोबत करार केलाय.

पेटीएम ई-कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड (पीईपीएल) ने रविवारी 'Paytm to ONDC Network' या अफलातून सेलची घोषणा केली आहे. सध्या सणासुदीच्या निमित्ताने भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवगेळ्या ई-कॉमर्स कंपन्या एकापेक्षा एक भारी ऑफर्स देऊ करत आहे. यात आता पेटीएम देखील मागे नाहीये.

'Paytm to ONDC Network' ही एक विशेष श्रेणी तयार करण्यात आली असून यावरून पेटीएम युजर्स त्यांच्या आवडीच्या वस्तू ऑर्डर करू शकणार आहेत तेही सवलतीच्या दरात. तुम्हांला ठाऊकच असेल की ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (Open Network for Digital Commerce) ही एक ना-नफा ना तोटा या उद्देशाने सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाद्वारे सुरु करण्यात आलेली एक कंपनी आहे. या कंपनीची देखरेख आणि कारभार स्वतः उद्योग मंत्रालय बघते.

छोट्या व्यापाऱ्यांना त्यांच्या वस्तू कमी परिचालन खर्चात ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात अधिक खर्च करावा लागतो. फ्लिपकार्ट, अमेझॉन आदी कंपन्यांची मक्तेदारी यानिमित्ताने मोडीत निघेल आणि सामान्य दुकानदारांना याचा फायदा होईल असे सरकारचे म्हणणे आहे. हाच विचार लक्षात घेता आता पेटीएमने देखील ONDC Network सोबत करार केलाय.

200 हून अधिक ब्रँड

देशभरातील छोट्या मोठ्या कंपन्यांनी पेटीएमवर आपली उत्पादने लिस्ट केली आहेत. जवळपास 200 हून अधिक ब्रँड पेटीएमवर उपलब्ध असून त्यावर ग्राहकांना मोठी सवलत दिली जाते आहे. ONDC वरून फूड ऑर्डर केल्यास ग्राहकांना ते मोफत डिलिव्हर करण्याची देखील सोय करण्यात आली आहे. परंतु ग्राहकांनी यासाठी किमान 150 रुपयांची ऑर्डर करणे गरजेचे आहे.

याशिवाय किराणा माल, होम अँड किचन एसेन्शियल्स,इलेक्ट्रॉनिक्स, फॅशनसंबंधीच्या वस्तू देखील ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. 250 रुपयांच्या खरेदीवर ग्राहकांना तब्बल 125 रुपयांची सूट दिली जाणार आहे. याशिवाय कंपनी 1000 रुपये आणि त्याहून अधिक किंमतीच्या इलेक्ट्रॉनिक्सवर 10 टक्के सूट देत आहे.
आहे की नाही फायद्याची डील? तेव्हा तुमचे पेटीएम खाते उघडा आणि 'Paytm to ONDC Network' सेक्शनमध्ये जाऊन डील्स चेक करा आणि खरेदीला लागा.

कधीपर्यंत करता येईल खरेदी?

ही ऑफर येत्या 31 ऑक्टोबरपर्यंतच वैध असल्याचे पेटीएमकडून सांगण्यात आले आहे. लिस्टिंग केलेली उत्पादने शिल्लक असेपर्यंतच त्याची विक्री केली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीच्या वस्तू लवकरात लवकर खरेदी केली पाहिजेत.