Cryptocurrency : क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी वाईट बातमी असून, यामध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना 30 टक्के कर भरून पुन्हा नव्याने 28 टक्के वस्तू आणि सेवा कर (GST) भरावा लागू शकतो. जीएसटी कौन्सिलच्या (GST Council) पुढील बैठकीत यावर निर्णय घेतला जाऊ शकतो.
अर्थसंकल्पात 30 टक्के कर लावण्याची घोषणा
2022 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रिप्टोकरन्सीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर 30 टक्के कर लावण्याबाबत घोषणा केली होती. त्यानंतर आता सरकार क्रिप्टोवर 28 जीएसटी (GST) लावण्याचा विचार करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जीएसटी कौन्सिलच्या पुढील बैठकीत क्रिप्टोच्या व्यवहारांवर 28 टक्के कर लावला जाऊ शकतो.
Another shocker for #cryptocurrency community in India in the works after 30% income tax: Reports#GST #GSTonCrypto #Cryptocrash#cryptotrading https://t.co/6uFaUkPUw3
— Financial Express (@FinancialXpress) May 9, 2022
सरकार क्रिप्टोचे वर्गीकरण करण्याच्या तयारीत
सरकार या क्रिप्टोकरन्सीचे लॉटरी, कॅसिनो, रेस कोर्स आणि जुगार अशापद्धतीने वर्गीकरण करण्याच्या तयारीत आहे. क्रिप्टो या कॅटेगरीत गेल्यास त्यावर 28 टक्के जीएसटी लागू शकतो. तसेच व्हर्च्युअल डिजिटल मालमत्तेवर (Virtual Digital Assets) कर आकारण्यासाठी इन्कम टॅक्स कायद्यात 115 BBH हे नवीन कलम जोडण्यात आले आहे.
1 टक्का टीडीएसची टांगती तलवार
क्रिप्टोवर कर लागू केला म्हणजे, क्रिप्टो देशात कायदेशीर होईल, असे नाही, असेही अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात म्हटले होते. त्यामुळे आता क्रिप्टो 28 टक्के जीएसटी व्यतिरिक्त 30 टक्के वेगळा टॅक्स लागू शकतो. याशिवाय, निश्चित मर्यादेपेक्षा जास्त व्यवहारांवर 1 टक्का टीडीएस (TDS) कापण्याचा सरकारचा विचार आहे. एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला क्रिप्टो गिफ्ट केल्यास त्यावरही कर आकारला जाईल.
क्रिप्टोवर सरकार वेगवेगळ्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात कर लावण्याचा विचार करत असल्याने या जोखीमयुक्त डिजिटल चलनातून परताव्यापेक्षा करांचाच अधिक भरणा होण्याची शक्यता आहे.