Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cryptocurrency Price Today: आजचा Cryptocurrency दर? क्रिप्टोबाजार थंड का?

Cryptocurrency Price Today

Christmas Spirits Fail To Revive Crypto Market: क्रिप्टोबाजार डिसेंबरच्या अखेरीस झेप घेईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र प्रत्यक्षात क्रिप्टोबाजार थंड आहे, यामागील कारणे काय ती तज्ज्ञांकडून जाणून घ्या, पुढील बातमीतून, यासह आजचे प्रमुख क्रिप्टो नाण्यांचे दर समजून घ्या.

December 26, Cryptocurrency price: नाताळ (Christmas) सणाचा उत्साहदेखील क्रिप्टो नाण्यांसाठी पोषक ठरू शकलेला नाही. बिटकॉईन, इथरियम कोणत्याच नाण्यनी विशेष कामगिरी केलेली नाही. सणाच्या काळात क्रिप्टोच्या किंमती मोठी झेप घेऊ शकतील अशी आशा तज्ज्ञांनी दाखवली होती, मात्र ती आशाही आता मावळली आहे. केवळ ग्राफ या नाण्याने मागील चोवीस तासांत 5.70 टक्के वाढ दर्शवली आहे. जागतिक क्रिप्टो मार्केट कॅप 812.09 बिलियन युएस डॉलरवर होते. मागील चोवीस तासांत 0.09 टक्क्यांची घसरण झाल्याचे नोंदवण्यात आले आहे.

आजच्या क्रिप्टोकरन्सींच्या किंमती Cryptocurrency Prices Today -

  • बिटकॉईन (Bitcoin): 26 डिसेंबर, सकाळी 10 वाजता बिटकॉईनचा दर 16 हजार 905.05 युएस डॉलर होता. मागील चोवीस तासात नाण्याच्या किंमतीत 0.40 टक्क्यांची वाढ झाल्याचे कॉईन मार्केट कॅपमध्ये (CoinMarketCap) दर्शवले आहे. भारतीय क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज प्लॅटफॉर्म वझीरएक्सनुसार (WazirX), आज बिटकॉईनचा दर 14.44 लाख एवढा आहे.
  • इथरियम (Ethereum): सकाळी 10 वाजता या नाण्याचा दर 1 हजार 222.0 युएस डॉलर एवढा होता. या नाण्याच्या दरात  
    मागील चोवीस तासात 0.03 टक्क्यांची वाढ झाली आहे. वझीरएक्सनुसार (WazirX), आज या नाण्याचा भारतीय दर 1.04 लाख एवढा आहे.
  • डॉजकॉईन (Dogecoin): मागील चोवीस तासात या नाण्याच्या दरात  1.41 टक्क्यांची घट झाली आहे. सकाळी 10 वाजता हे नाणे 0.07617 युएस ड़लरवर ट्रेड करत होते. वझीरएक्सनुसार (WazirX), भारतातील डोजकॉईनची किंमत 6.68 रुपये आहे.
  • लाइटकॉईन (Litecoin): या नाण्याचा मागील चोवीस तासात भाव वधारला आहे, 4.83 टक्क्यांनी दर वाढला असून याची किंमत 69.02 युएस डॉलर एवढी झाली आहे. तर याची भारतात किंमत 5 हजार 752 रुपये एवढी आहे.
  • रिपल (Ripple): या नाण्याची किंमत सकाळी 10 वाजता 0.3499 युएस डॉलर होती. तर मागील चोवीस तासात या नाण्याची किंमत 0.13 टक्क्यांनी वाढली आहे. वझीरएक्सनुसार (WazirX), भारतात या नाण्याची किंमत 29.87 रुपये एवढी आहे.
  • सोलाना (Solana): या नाण्याच्या किंमतीत मागील चोवीस तासांत 0.56 टक्क्यांनी घसरण झाली असून, याची किंमत 11.40 युएस डॉलर एवढी आहे. तर याची भारतीय किंमत 1 हजार 25 रुपये एवढी आहे.

क्रिप्टो बाजार थंडावण्यामागचे कारण काय? why is crypto volume not gaining?

सण, सुट्ट्या, उत्साह असूनही क्रिप्टो बाजार थंड आहे. नुकतेच युएसएमध्ये उघडकीस आलेल्या क्रिप्टो घोटाळ्यांनी बाजाराला हादरवून सोडले आहे. यामुळे गुंचवणुकदारांनीही क्रिप्टोकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. गेल्या एक - दोन दिवसात बिटकॉईन (Bitcoin) आणि इथरियम (Ethereum) च्या दरात झालेली किरकोळ वाढ क्रिप्टो बाजाराला आशेचा किरण देऊ शकलेले नाहीत, असे युनोकॉईन क्रिप्टोकरन्सीचे को-फाऊंडर आणि सीईओ साथ्विक विश्वनाथ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. तर, सध्या चीनमध्ये होत असलेला करोनाचा उद्रेक पाहता, गुंतवणूकदार गुंवणूक करण्यात हात आखुडता घेत असल्यामुळे क्रिप्टो बाजारात सध्या उलाढाल होत नाही आहे, असे बाययुकॉईनचे सीईओ शिवम ठकराळ यांनी म्हटले आहे.