Crypto Market Slump: क्रिप्टो नाण्यांमधील सर्वात विश्वासार्ह नाणे बिटकॉईन (Bitcoin) आणि इथरियम (Ethereum) या दोघांचा दर घसरला असून, एकूणच बाजारात घसरण दिसून आली आहे. मात्र पुन्हा एकदा द टेरा क्लासिक (The Terra Classic) नाण्याच्या दरात तासांमध्ये 4 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर द टोनकॉईनच्या किंमतीत (The Toncoin) आजच्या दिवसभरातील सर्वात मोठी 10 टक्क्यांची घट झाली आहे. जागतिक क्रिप्टो मार्केट कॅप 801.95 बिलियन युएस डॉलरवर होते. मागील चोवीस तासांत 1.33 टक्क्यांची घसरण झाल्याचे नोंदवण्यात आले आहे.
आज बुधवार दिनांक 28 डिसेंबर रोजी भारतीय आणि जागतिक क्रिप्टो बाजारात लाल रंगाचे वर्चस्व दिसून आले, अर्थात नाण्यांच्या किंमतीत घट होताना दिसत आहे. सध्या जागतिक मंदी सदृश्य परिस्थिती, अस्थिर राजकीय स्थिती तसेच पुन:श्च होत असलेला करोनाचा उद्रेक यामुळे क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक कमी होत आहे. त्यात गेल्या काही काळापासून नाण्यांचा दर घसरत असल्यामुळेही इच्छुक गुंतवणुकदार मागे वळले आहेत, असे क्रिप्टो सल्लागार संदीप कशाळकर यांनी महामनीला सांगितले.
आजच्या क्रिप्टोकरन्सींच्या किंमती Cryptocurrency Prices Today -
- बिटकॉईन (Bitcoin): क्रिप्टोमधल्या या महत्त्वाच्या नाण्याची किंमत 28 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता 16 हजार 670.11 युएस डॉलर एवढी किंमत होती. मागील चोवीस तासात या नाण्याच्या किंमतीत 1.32 टक्के घसरण झाली आहे. भारतीय क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज प्लॅटफॉर्म वझीरएक्सनुसार (WazirX), आज बिटकॉईनचा दर 14.33 लाख एवढा आहे.
- इथरियम (Ethereum): या विश्वासार्ह क्रिप्टो नाण्याच्या किंमतीत मागील चोवीस तासांमध्ये 2.12 टक्क्यांनी घसरण झाली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून सतत काही अंशांनी वाढत असलेली या नाण्याची किंमत आज घसरली आहे. या नाण्याची किंमत आज सकाळी 10 वाजता 1 हजार 198 युएस डॉलर किंमतीवर ट्रेड करत होती. वझीरएक्सनुसार (WazirX), आज या नाण्याचा भारतीय दर 1.03 लाख एवढा आहे.
- डॉजकॉईन (Dogecoin): या नाण्याची किंमत 0.07166 युएस डॉलरवर सकाळी 10 वाजता ट्रेड करत होती. या नाण्याचा दर मागील चोवीस तासात 4.52 टक्क्यांनी घसरला आहे. वझीरएक्सनुसार (WazirX), भारतातील डोजकॉईनची किंमत 6.28 रुपये आहे.
- लाइटकॉईन (Litecoin): मागील चोवीस तासांमध्ये या नाण्याच्या दरात 2.76 टक्क्यांनी घट झाली आहे. काल या नाण्याच्या दरात वाढ झाल्यावर, गुंतवणुकदारांनी लगेचच नाणी विकली ज्यामुळे पुन्हा दर खाली घसरला आहे. तर या नाण्याची किंमत 68.48 युएस डॉलर होती. भारतात या नाण्याची किंमत 5 हजार 850 रुपये आहे.
- रिपल (Ripple): या नाण्याची किंमत सकाळी 10 वाजता 0.3626 युएस डॉलर होती. तर मागील चोवीस तासात या नाण्याची किंमत 0.57 क्क्यांनी वाढली आहे. वझीरएक्सनुसार (WazirX), भारतात या नाण्याची किंमत 3122 रुपये एवढी आहे.
- सोलाना (Solana): या नाण्याच्या किंमतीत मागील चोवीस तासांत 5.17 टक्क्यांची घसरण झाली असून, याची किंमत 10.57 युएस डॉलर एवढी आहे. तर याची भारतीय किंमत 955.08 रुपये एवढी आहे.