Cryptocurrency Prices Update: बिटकॉइन (BTC), जगातील सर्वात जुनी क्रिप्टोकरन्सी, मंद आणि स्थिर घट होत आहे कारण मंगळवारी सकाळी नाणे 22 हजार युएस डॉलर्सच्या आत ट्रेड करत होते. दुसरीकडे, इथरियम (ETH), गेल्या काही दिवसांमध्ये 1 हजार 600 च्या घरात होते. इतर लोकप्रिय अल्टकॉईनचे डोजेकॉईन (altcoins Dogecoin: DOGE), रिपल (Ripple: XRP), लाइटकॉईन (Litecoin: LTC) आणि सोलानाला (SOL) गेल्या काही दिवसांपासून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. सिंग्युलॅरिटीनेट (AGIX: SingularityNET) टोकन सलग दुसऱ्या दिवशी 40 टक्क्यांहून अधिक वाढ होत अव्वल स्थान पटकावले आहे. लेखनाच्या वेळी, जागतिक क्रिप्टोमार्केट कॅप 1.06 ट्रिलियन युएस डॉलर होते, मागील 24 तासांमध्ये 0.01 टक्क्यांचे नुकसान नोंदवले आहे.
आजच्या क्रिप्टोकरन्सींच्या किंमती Cryptocurrency Prices Today
- बिटकॉईनची आजची किंमत (Bitcoin price today): कॉईन मार्केटकॅपनुसार (CoinMarketCap), बिटकॉइनची किंमत 22 हजार 892.54 युएस डॉलरवर होती, मागील 24 तासांमध्ये 0.13 टक्के तोटा नोंदवला. भारतीय विनिमय वझीरएक्सनुसार (WazirX), बिटकॉईनची किंमत 19.58 लाख रुपये होती.
- इथरियम आजची किंमत (Ethereum price today): इथरियम कॉईनची किंमत 1 हजार 632.83 युएस डॉलरवर सकाळी 10 वाजता ट्रेड करत होती, लेखनाच्या वेळी चोवीस तासांमध्ये नाण्याचा दर 0.32 टक्क्यांनी वाढला आहे. वझीरएक्सनुसार (WazirX), भारतात इथरियमची किंमत 1.37 लाख रुपये असल्याचे नोंदवण्यात आले आहे.
- डॉजकॉईन आजची किंमत (Dogecoin price today): डॉजकॉईनने मागील चोवीस तासांमध्ये 0.89 टक्क्यांचे नुकसान नोंदवले आहे. कॉईनमार्केट कॅपच्या (CoinMarketCap) डेटानुसार, सध्या किंमत 0.09083 युएस डॉलर आहे. वझीरएक्सनुसार (WazirX), भारतातील डॉजकॉईनची किंमत 7.89 रुपये आहे.
- लाइटकॉईन आजची किंमत (Litecoin price today): लॉइटकॉईनच्या दर मागील चोवीस तासांमध्ये 3.40
Litecoin ने 24-तास 3.40 टक्के वाढ पाहिली. लेखनाच्या वेळी, ते $99.36 वर व्यापार करत होते. भारतात LTC किंमत 8,488 रुपये होती. - रिपलकॉईनची आजची किंमत (Ripple price today): रिपलकॉईनची किंमत 0.39 वर उभी राहिली, 24-तास 1.11 टक्क्यांनी घसरली. WazirX नुसार, Ripple किंमत 33.40 रुपये होती.
- सोलाना आजची किंमत (Solana price today): सोलानाची किंमत 7 फेब्रुवारी मंगळवारी सकाळी 10 वाजता 23.10 युएस डॉलरवर होती, चोवीस तासांमध्ये 1.33 टक्के तोटा. वझीरएक्सनुसार (WazirX), भारतातील सोलानाची किंमत 2 हजार 60 रुपये होती.
बिटकॉइनचा व्यापार मागील 24 तासांमध्ये 22 हजार 800 आणि 23 हजारच्या दरम्यान ट्रेड करत आहे. घसरण असूनही, बिटकॉईन गेल्या काही आठवड्यांपासून व्यापार करत असलेल्या श्रेणीमध्येच राहिला आणि पुन्हा एकदा उच्चांकी दर गाठेल, अशी खात्री आहे, असे मुद्रेक्सचे कोफाऊंडर एड्युल पटेल यांनी माध्यमांना सांगितले.