Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Crypto Scam: हॅकर्सने वर्षभरात चोरले, क्रिप्टो गुंतवणुकदारांचे 4.3 अब्ज युएस डॉलर्स

Hackers Steal 4.3 Billion US Dollars

Crypto Scam: क्रिप्टोच्या नावाखाली नागरिकांना फसवले, क्रिप्टो कंपनीत झाला घोटाळा, क्रिप्टो अकाऊंट हॅक केले अशा अनेक बातम्या गेल्या दोन वर्षात आपल्या कानावर सातत्याने येत आहेत. क्रिप्टो जसजसे प्रसिद्ध होत आहे, तसे त्यात घोटाळे वाढत आहेत. 2022 वर्षात क्रिप्टो टोनवर सायबर हल्ले करून हॅकर्सनी 4.3 अब्ज युएस डॉलर्स चोरले, यामुळे गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

Crypto Scam: हॅकर्स आणि स्कॅमर्स हे डिजिटल जगातील सर्वात मोठी डोकेदुखी बनले आहेत. जगातील सर्वात प्रसिद्ध डिजिटल चलन 'क्रिप्टोकरन्सी' देखील यापासून अस्पर्श राहिलेले नाही. या सायबर गुन्हेगारांमुळे दररोज गुंतवणूकदारांचे हजारो डॉलर्सचे नुकसान होत आहे आणि ही ऑनलाइन फसवणूक बदलत्या जगानुसार अधिक वाढत आहे. 2022 मध्ये, स्कॅमर आणि हॅकर्समुळे गुंतवणूकदारांनी 4.3 अब्ज युएस डॉलर गमावले आहेत. 2021 च्या तुलनेत हॅकर्सद्वारे 37 जास्त रक्कम चोरली गेली आहे. हॅकर्स आणि घोटाळेबाजांना निरपराध गुंतवणूकदारांना विविध मार्गांचा अवलंब करून लुटत आहेत.

आतापर्यंत ही फसवणूक बनावट कॉल, मेसेज किंवा हॅकिंगमुळे होत होती, मात्र आता या सायबर फ्रॉड्सने लुटण्याचा ट्रेंड आहे. हॅकर्समध्ये फसवणुकीचे विविध ट्रेंड वेळोवेळी दिसून येत असतात. सध्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांची फसवणूक सुरू केली आहे. हॅकर्स आता या प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्यांना बनावट प्रकल्प आणि फसव्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी फसवत आहेत. अलीकडे, रॉबिनहूड, रिपल आणि बिनन्स अशा घोटाळ्यांना सामोरे आले होते, ज्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले होते.

रॉबिनहूड प्लॅटफॉर्मचे ट्विटर हॅक केले (Robinhood Platform's Twitter Hacked)

रॉबिनहूड ही एक लोकप्रिय ऑनलाइन क्रिप्टो आणि स्टॉक ब्रोकरेज फर्म आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांचा विश्वास त्यावर कायम आहे. पण गेल्या आठवड्यात हॅकर्सनी प्लॅटफॉर्मचे ट्विटर हँडल हॅक करून बनावट क्रिप्टोकरन्सीची जाहिरात करून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला. मात्र, ही पोस्टही नंतर हटवली गेली होती. रॉबिनहूड त्याचे नवीन टोकन बायनॅन्स (Binance) स्मार्ट चेनमध्ये लाँच करत आहे, असे या पोस्टमध्ये म्हटले होते. भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजता लाइव्ह असू आणि तुम्ही ते 0.0005 युएस डॉलरपासून खरेदी करू शकता. या पोस्टमध्ये फेक सेंट्रलाइज्ड एक्सचेंज पॅनकेकस्वॅपवर बनावट टोकन खरेदी करण्यासाठी लिंक दिली होती. हाच संदेश रॉबिनहूडच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला गेला. या प्लॅटफॉर्मवर रॉबिनहूडचे एकूण 1.6 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. बीएससी स्कॅनने अहवाल दिला की या वेळी स्कॅमर्सनी 26.95 BNB टोकन्ससह सुमारे 8 हजार 200 युएस डॉलर फसवणूक केली गेली. हा सर्व प्रकार रॉबिनहूडचे ट्विटर हॅक होऊन त्यांची इतर माहिती हाती लागल्यामुळे झाले होते, ज्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले.

क्लोन वेबसाईटद्वारे केली फसवणूक (Fraud through clone websites)

हॅकर्सनी बायनॅन्स (Binance) आणि रिपल (Ripple) या क्रिप्टो टोकनच्या वेबसाइट्स सारख्या वेबसाइट्स म्हणजे क्लोन वेबसाईट्स तयार केल्या. त्यानंतर त्यांनी 12 टक्के आणि 27 टक्क्यांपर्यंत पर्यंत परतावा देण्याचे आश्वासन देणाऱ्या बोगस एक्सआरपी (XRP) स्टॅकिंग स्कीमसह रिपल (Ripple) गुंतवणूकदारांना लक्ष्य करण्यासाठी या वेबसाइट्सचा वापर केला.
या बनावट योजना पहिल्या 10 हजार गुंतवणूकदारांसाठी ऑफर मर्यादित करतात आणि अशी मर्यादित उपलब्धता आणि आकर्षक बक्षिसे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. शिवाय, वेबसाइट्स वास्तविक डीलच्या अगदी जवळ होत्या. त्यांच्याकडे समान लेआउट आणि फॉन्ट होते आणि रिपल आणि बिनन्सच्या वास्तविक ब्लॉगचे दुवे देखील होते. काही लोक या बनावट वेबसाइटवर त्यांची क्रिप्टो सुरक्षा आणि कोल्ड स्टोरेज वॉलेट वापरण्यास सक्षम होते. याव्यतिरिक्त, बायनॅन्स (Binance) मध्ये डेफी एक्सआरपी (DeFi XRP) स्टेकिंग वैशिष्ट्य देखील आहे, जे बायनॅन्स अर्न (Binance Earn) प्रोग्रामचा भाग आहे. अशी समानता कोणालाही गोंधळात टाकू शकते.

कोरियन, चायनीज हॅकर्सच्या टोळींनी 2022 वर्षात सुमारे सहा वेळा विविध क्रिप्टो कोटनवर सायबर हल्ले केले. ज्यामुळे अगणित गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान झाले होते. 2021 च्या तुलनेत 200 वर्षात हॅकर्सद्वारे क्रिप्टो गुंतवणुकदारांचे 37 टक्क्यांनी जास्त पैसे चोरले आहेत.  4.3 अब्ज युएस डॉलर गुंतवणुकदारांचे चोरले गेले, ही खूप मोठी बाब आहे. यामुळे क्रिप्टो टोकनच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहते.

अशा घोटाळ्यांपासून सुरक्षित कसे राहावे? (How to stay safe from such scams?)

  • ऑफर असलेल्या वेबसाइटची व्यवस्थित तपासणी करावी. वेबसाईटवरील आबाऊट, काँटॅक्ट, अटी-शर्ती सर्व नीट वाचावे. 
  • कोणत्याही आर्थिक योजना किंवा प्रकल्पाचा प्रचार करणाऱ्यांचे, अधिकृत सोशल मीडिया हँडल तपासावे.
  • वेबसाइटच्या स्पेलिंगकडे देखील, युआरएल, ईमेल आयडी यांकडे बारकाईने लक्ष द्यावे काहीवेळा, स्पेलिंगमधील एखादा वर्ड बदललेला असतो, जो लक्षात येत नाही आणि आपण त्यांना अधिकृत समजण्याची चूक करतो.