Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Petrol Diesel Price: कच्च्या तेलाच्या किमतीत घट, अनेक राज्यांमध्ये पेट्रोल झाले स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमत

Petrol Diesel Prices

आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किमती किंचित प्रमाणात खाली आल्या आहेत. मार्केटमध्ये क्रूड ऑईलच्या एका बॅरेलची किंमत 87.62 डॉलर एवढी झाली. त्यामुळे देशातील तेल कंपन्यांनी सुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती काही प्रमाणात कमी केल्या आहेत.

Petrol Diesel Prices : आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत आज (दि. 19 नोव्हेंबर) घसरण होत असल्याचे दिसून आले. कच्च्या तेलाच्या किमतीत 2.16 डॉलर (2.41 टक्के) घसरण होऊन प्रति बॅरेलची किंमत 87.62 डॉलरवर ट्रेडिंग करत होती. तर तिकडे डब्ल्यूटीआय (West Texas Intermediate) ऑईल 1.56 डॉलरने (1.91 टक्के) खाली आल्याने प्रति बॅरेलची किंमत 80.08 डॉलरने विक्री होत होती. त्यामुळे देशातील सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. काही राज्यांनीही आपल्या किमतीत बदल केले आहेत.

महाराष्ट्रात पेट्रोलची किंमत 0.41 रुपयांनी घसरून 106.21 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 0.40 रुपयांनी कमी होऊन 92.73 रुपये झाले. तर राजस्थानमध्ये पेट्रोल 0.68 रुपयांनी आणि डिझेल 0.61 रुपयांनी कमी झाल्याने त्याच्या किमती अनुक्रमे 108.20 आणि 93.47 रुपये प्रति लीटर झाल्या आहेत. तर हिमाचल प्रदेशमध्ये पेट्रोल 0.35 रुपये आणि डिझेल 0.31 रुपयांनी महागले. त्यामुळे हिमाचल प्रदेशमध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत 95.93 रुपये आणि 82.15 रुपये झाली. काही राज्यांमध्ये इंधनाच्या किमती कमी झाल्या आहेत; तर काही राज्यांमध्ये वाढल्या आहेत. पण देशातील 4 महत्त्वाच्या शहरामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये काही खास बदल झाल्याचे दिसून येत नाही.

देशातील महत्त्वाच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

शहर

पेट्रोलचे दर

डिझेलचे दर

मुंबई

106.31

94.27

दिल्ली

96.72

89.62

कोलकाता

106.03

92.76

चेन्नई

102.63

94.24

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर

शहर

पेट्रोलचे दर

डिझेलचे दर

पुणे

105.84

92.36

नागपूर

106.04

92.59

कोल्हापूर

106.47

93.01

औरंगाबाद

108

95.96

दररोज सकाळी 6 वाजता जाहीर होतात नवीन दर!

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात आणि नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये एक्साईज ड्युटी, डिलर्सचे कमीशन, व्हॅट आणि इतर टॅक्सेस जोडल्यानंतर त्याच्या मूळ किमतीपेक्षा त्याची किंमत अधिक होते. त्यामुळे सर्वसामान्यांना जास्तीचे पैसे देऊन पेट्रोल-डिझेल विकत घ्यावे लागते.

असे जाणून घ्या इंधनाचे नवीन दर!

SMS द्वारे कोणत्याही शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेता येतात. इंडियन ऑईलच्या कस्टमर केअरला RSP आणि शहराचा पिन क्रमांक लिहून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवून नवीन किमती जाणून घेऊ शकता. बीपीसीएलच्या किमतीसाठी RST आणि शहराचा पिन क्रमांक 9223112222 या क्रमांकावर पाठवून तर एचपीसीएलसाठी HPPrice आणि तुमच्या शहराचा पिन क्रमांक 9222201122 या क्रमांकावर पाठवून नवीन दर जाणून घेऊ शकता.