Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Crop insurance : शेतकऱ्यांना दिलासा! पंतप्रधान पीक विमा योजनेचा अर्ज करण्यासाठी 3 दिवसांची मुदत वाढ

Crop insurance : शेतकऱ्यांना दिलासा! पंतप्रधान पीक विमा योजनेचा अर्ज करण्यासाठी 3 दिवसांची मुदत वाढ

तांत्रिक अडथळ्यामुळे अनेक शेतकरी पीक विमा योजनेसाठी मुदतीमध्ये अर्ज करण्यास असमर्थ ठरले आहेत. दरम्यान शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून पीक विमा योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे. राज्य शासनाकडून ही पीक विमा योजना एक रुपयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास संपूर्ण हंगाम वाया जातो. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांचे अशा प्रकारचे आर्थिक नुकसान झाल्यास त्याला नुकसान भरपाई मिळावी यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना (PMFBY) सुरु केली आहे. तर महाराष्ट्र सरकारने या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये विमा उपलब्ध करून दिला आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मूदत 31 जुलै पर्यंत होती. मात्र या मुदतीमध्ये आणखी तीन दिवस वाढ करण्यात आली आहे.

3 ऑगस्टपर्यंत मुदत वाढ-

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना पीक विमा (Crop Insurnace) योजनेचा लाभार्थी होण्यासाठी 31 जुलैही ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत होती. मात्र, प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास अनेकांना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे अनेक शेतकरी या योजनेसाठी अर्ज करण्यास असमर्थ ठरले होते. दरम्यान शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून पीक विमा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत शेतकऱ्यांनी अद्यापही  पीक विम्यासाठी ऑनलाईन अर्ज केला नसेल तर आता त्यांना अर्ज दाखल करता येणार आहे.

राज्य सरकारकडून एक रुपयात विमा

पंतप्रधान पीक विमा योजनेच्या ऑनलाईन अर्जाची मुदत वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या खरीप हंगामासाठी दिला जाणारा पीक विमा हा अवघ्या एक रुपयात दिला जाणार आहे. शेतकऱ्यांना फक्त एक रुपया विम्याची रक्कम अदा करायची असून बाकीची रक्कम राज्य सरकार भरणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या योजनेला चांगला प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत जवळपास 1.5 कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले आहेत. तसेच अद्यापही कोणी अर्ज करायचे राहिले असल्यास वाढलेल्या मुदतीत तातडीने विमा अर्ज दाखल करावे असे आवाहन राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

कसा करायचा अर्ज-

ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही पीक विमा योजनेसाठी अर्ज दाखल केला नाही. त्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmfby.gov.in/ वर जाऊन आपला अर्ज दाखल करावा. या वेबसाइटवर फार्मर कॉर्नर (Farmer Corner)वर या सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला तुमची नोंदणी करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा विक विमा अर्ज दाखल करता येणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीक विमा दाखल करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 3 ऑगस्टच्या आत हा विमा अर्ज दाखल करायचा आहे.