• 26 Mar, 2023 14:50

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कोट्यवधीची कंपनी पण, CEO चा पगार फक्त 15 हजार; कमी सॅलरी मागचं कारण कुणाल शाह यांनी केलं उघड

CRED CEO

क्रेड या फायनान्शिअल सर्व्हिसेस क्षेत्रातील स्टार्टअप कंपनीचे CEO कुणाल शाह यांनी त्यांच्या पगाराबाबत खुलासा केला आहे. त्यावरुन सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. दर महिन्याला फक्त 15 हजार रुपये पगार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. या मागे त्यांनी जे कारण सांगितलं त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली.

CRED CEO Kunal Shah salary: स्टार्टअप कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांकडून कोट्यवधींची गुंतवणूक होते. या कंपन्यांचे CEO किंवा संस्थापक कोट्यवधींचे पगार दरवर्षी घेत असतात. कंपनी तोट्यात असो की फायद्यात, ते स्वत: भरमसाठ पगार घेतात. 'गो मॅकॅनिक' कंपनी दिवाळखोरीत निघण्यामागे कंपनीच्या संस्थापकांचा कोट्यवधींचा पगार हे एक कारण असल्याचे बोलले जाते. दरम्यान, क्रेड या फायनान्शिअल सर्व्हिसेस क्षेत्रातील स्टार्टअप कंपनीचे CEO कुणाल शाह यांनी त्यांच्या पगाराबाबत खुलासा केला आहे. त्यावरुन सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

CRED CEO Kunal Shah यांनी नुकतेच सोशल मीडियावर त्यांचा दरमहा पगार शेअर केला. दर महिन्याला फक्त 15 हजार रुपये पगार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण, फ्रेशर्सलाही 15 हजार रुपयांपेक्षा जास्त सॅलरी मिळते. सोशल मीडियावर अनेकांनी कुणाल शाह यांना एवढा कमी पगार का घेता? असे विचारले असता त्यांनी याला इन्स्टाग्रामवर उत्तर दिले.

कुणाल शाह यांनी काय उत्तर दिलं (Kunal shah CRED CEO)

"जोपर्यंत क्रेड कंपनी नफा मिळवत नाही, तोपर्यंत मी जास्त पगार घेऊ नये असे मला वाटते. क्रेडमध्ये माझा पगार 15 हजार रुपये आहे. याआधी मी माझी फ्रिचार्ज ही कंपनी विकली असून त्या पैशातून मी माझे खर्च भागवू शकतो" असे कुणाल शाह यांनी उत्तर दिले. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका इन्स्टाग्राम युझरने म्हटले आहे की, “असे काही CEO आहेत, जे कोट्यवधींमध्ये पगार घेतात. तर एकीकडे कुणाल शाह आहेत”. सोबतच या युझरने त्यांच्या स्टोरीचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे.

"क्रेड कंपनी अद्यापही तोट्यात का आहे? असे काही युझर्सनी त्यांना विचारले. त्यावरही त्यांनी उत्तर दिले. "टेक कंपन्या मोठ्या प्रमाणात भांडवल डिस्ट्रिब्युशन आणि ग्राहकांना आकर्षित करण्यामध्ये खर्च करतात. त्यानंतर नफा कमावतात, असे शाह म्हणाले.

कुणाल शाह यांनी पगाराबाबत खुलासा (CRED CEO Kunal Shah salary) केल्याची चर्चा ट्विटरवरही झाली. मात्र, काही ट्विटर युझर्सला त्यांची ही बाब अजिबात आवडली नाही. CEO नं कमी पगार घेणं हे अगदी सर्वसामान्य असल्याचं काही युझर्सनी म्हटलं. तर एका युझरने म्हटलं आहे की, " काही संस्थापक म्हणतात की, मी फक्त 1 डॉलर पगार घेतो, लोक या गोष्टीला मानतातही. संस्थापकाला कंपनीच्या इक्विटीतून एका चांगल्या पगाराच्या शंभरपट रक्कम मिळत असते. इक्विटीवर पगारापेक्षा कमी कर द्यावा लागतो. त्यामुळे एखाद्या सीईओने असं म्हणणं विचित्र वाटतं, असं एका ट्विटर युझरने म्हटलं आहे. अनेक युझर्सने पगारावर जास्त कर द्यावा लागतो, त्यामुळे CEO पगार कमी घेतात, असं म्हटले आहे.

क्रेड कंपनीला आर्थिक वर्ष 2022 मध्ये 1279 कोटींपेक्षा जास्त तोटा झाला. या काळात कंपनीचा महसूल 95 कोटींवरुन वाढून 422 झाला तरी कंपनी तोट्यातच आहे. कंपनीचा एकूण खर्च उत्पन्नापेक्षा जास्त आहे. 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये कंपनीला दुप्पट तोटा झाला. कुणाल शाह यांनी फ्रिचार्ज कंपनी विकून क्रेड ही नवी कंपनी सुरू केली आहे.