Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Aero-India 2023: वेगाचा थरार अनुभवा! आशिया खंडातील सर्वात मोठ्या 'एरो इंडिया शो' ची बंगळुरुत जय्यत तयारी

Aero-India 2023

बंगळुरात आशिया खंडातील सर्वात मोठा 'एरो इंडिया शो; पुढील महिन्यात रंगणार आहे. (Aero-India 2023 in Bangalore) दर्शकांना फायटर विमानांचा थरार अनुभवता येणार आहे. बंगळुरुतील हवाई दलाच्या येलहंका विमानतळावर या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे.

बंगळुरात आशिया खंडातील सर्वात मोठा 'एरो इंडिया शो; पुढील महिन्यात रंगणार आहे. (Aero-India 2023 in bangalore) दर्शकांना फायटर विमानांचा थरार अनुभवता येणार आहे. बंगळुरुतील हवाई दलाच्या येलहंका विमानतळावर या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तयारीचा आढावा घेतला आहे. Aero-India 2023 शोचे हे चौदावे वर्ष आहे.

13 फेब्रुवारीला सुरू होणार कार्यक्रम( Aero India show start date)

फेब्रुवारी महिन्यात 13 ते 17 तारखेदरम्यान हा एरो शो भरणार आहे. 35 हजार स्केअर मीटर परिसरात हा शो आणि एक्झिबिशन भरणार आहे. आतापर्यंत 731 पार्टिसिपेंट्नी सहभाग नोंदवला आहे. विमान निर्मिती कंपन्या, ड्रोन, एअर टेक्नॉलॉजी क्षेत्रातील कंपन्यांचा यामध्ये सहभाग आहे. या कार्यक्रमादरम्यान स्टार्टअप कंपन्यासांठी इव्हेंट आणि अनेक करारांवर सह्या करण्यात येणार आहेत.

पाच दिवस चालणार एअर शो (Aero show event)

भारतीय हवाई दलाद्वारे पाच दिवस एअर शोचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भारतीय तसेच परदेशी फायटर विमाने हवाई कौशल्य दाखवतील. रशिया, फ्रान्स, अमेरिका आणि युरोपातील देशांची लढाऊ विमाने हवाई कौशल्य दाखवतील. विमान निर्मिती कंपन्यांना आपली अत्याधुनिक टेक्नॉलॉजी जगापुढे सादर करण्याची संधी या कार्यक्रमातून मिळते. संरक्षण आणि विमान निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या शोचे आयोजन करण्यात येते.

1996 साली सुरुवात (Aero show started back in 1996)

याआधी 2021 साली एरो शोचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कोरोना साथीच्या प्रसारामुळे तीन दिवसांतच कार्यक्रम आटोपण्यात आला होता. यावेळी पाच दिवस कार्यक्रम चालणार आहे. हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेड द्वारा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. एरो इंडिया शोची सुरुवात 1996 सालापासून सुरू करण्यात आली आहे. दर दोन वर्षांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.