देशांतर्गत कंपनी Compaq ने स्मार्टवॉच बाजारात प्रवेश केला आहे. कंपनी यापूर्वीपासून स्मार्ट टीव्हीची सेवा देत आहे. आता या प्रॉडक्टमध्ये कंपनीचा प्रवेश झाला आहे. Amazon India वरून Compaq QWatch ची विक्री सुरू झाली आहे. कंपनीने कॉम्पॅक क्यूवॉच घड्याळांच्या तीन सीरिज सादर केल्या आहेत ज्यात एक्स-ब्रीड, डायमेंशन आणि बॅलन्स यांचा समावेश आहे. यापैकी कॉम्पॅक क्यूवॉच एक्स-ब्रीड मालिका प्रीमियम वॉच आहे, तर डायमेन्शन मालिका तरुणांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने आहे आणि बॅलन्स सीरिज सर्वांसाठी आहे.
कॉम्पॅक क्यूवॉचेस मालिकेतील ही घड्याळे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यांना एचडी डिस्प्ले प्रदान केले गेले आहेत. Compaq QWatch सीरिजच्या घड्याळाच्या परफॉर्मन्स विषयी बोलायचे तर अधिक चांगला रंग, उच्च ब्राइटनेसचा दावा करण्यात आला आहे. डिस्प्लेची शैली वक्र आहे. कॉम्पॅक क्यूवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग, मेटल बॉडी, 100+ वॉच फेस, वायरलेस चार्जिंग, व्हॉइस असिस्टंट आणि इन्स्टंट मेसेजिंग नोटिफिकेशन यांसारखी फीचर्स आहेत.
या घड्याळातून फोनवर प्ले होणारा मीडिया देखील नियंत्रित करता येऊ शकणार आहे. कंपनीकडून सर्व घड्याळांसाठी फर्मवेअर अपडेट्सचे आश्वासन दिले गेले आहे. Compaq QWatches 9H हार्ड ग्लाससह येतात जे स्क्रॅचप्रूफ असल्याचा दावा केला जातो. हे घड्याळ ब्लड ऑक्सिजन ट्रॅकर, हार्ट रेट मॉनिटरिंग, स्लीप मॉनिटरिंग आणि 120+ स्पोर्ट्स मोडसह येते. कंपनीने कॉम्पॅक क्यूवॉच सीरीजच्या कोणत्याही घड्याळाच्या किंमतीबद्दल माहिती दिलेली नाही.