क्रिप्टो एक्सचेंज कॉईनबेस (COIN) कंपनी सुमारे 950 कर्मचार्यांना कमी करणार असल्याची चर्चा आहे. याची अंमलबजावणी दुसऱ्या तिमाहीच्या अखेरपर्यंत केली जाऊ शकते. कंपनीने कर्मचारी कपातीसाठी काढलेला हा आकडा Coinbase कंपनीच्या एकूण कर्मचार्यांच्या सुमारे 20 टक्के इतका आहे.
कंपनीने वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार कंपनीत एकूण 4,700च्या आसपास कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीने केलेल्या नियोजनानुसार, कंपनीला 149 मिलियन ते 163 मिलियन डॉलर्सपर्यंत खर्च येऊ शकतो. त्यातील 58 मिलियन ते 68 मिलियन डॉलर्स ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होणारी रक्कम आहे.
Table of contents [Show]
कॉईनबेसची जपानमधील बहुतेक ऑपरेशन्स बंद!
अमेरिकेतील क्रिप्टोकरन्सनी एक्सचेंज Coinbase Global Inc. कंपनीने आंतरराष्ट्रीय पातळीवर डिजिटल क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर जपानमधील सेवा बंद करण्याची भूमिका घेतली आहे. कॉईनबेसचे सॅन-फ्रान्सिसको येथे मुख्यालय आहे. इथल्या सुमारे 20 टक्के कर्मचाऱ्यांना कंपनीने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच भाग म्हणून कंपनीने जपानमधील बहुतांश ऑपरेशन्स बंद करण्याचा निर्णय घेतला. कॉईनबेसने यापूर्वी Mitsubishi UFJ Financial Group Inc. कंपनीसोबत 2021 मध्ये जपानमध्ये क्रिप्ट एक्सचेंज लॉन्च केले होते.
महत्त्वाच्या क्रिप्टोकरन्सीच्या आजच्या किमती
बिटकॉईन (Bitcoin)
क्रिप्टोमधल्या या महत्त्वाच्या कॉईनची किंमत 11 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता 17,441.29 युएस डॉलर एवढी होती. मागील चोवीस तासात या कॉईनच्या किमतीत 0.84 टक्क्यांची वाढ झाली. भारतीय चलनात बिटकॉईनची सध्याची किंमत 14,25,029.26 रुपये आहे.
इथेरियम (Ethereum)
इथेरियमची किंमत 1334.13 डॉलर्स असून त्यामध्ये 0.17 टक्क्यांची वाढ झाली. वझीरएक्सनुसार (WazirX), आज या कॉईनची भारतीय चलनात 1.08 लाख इतकी किंमत आहे.
डॉजकॉईन (Dogecoin)
डॉजकॉईनची किंमत 0.0770 युएस डॉलरवर सकाळी ट्रेड करत होती. याची मागील चोवीस तासात 0.73 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वझीरएक्सनुसार (WazirX), भारतीय चलनात डॉजकॉईनची किंमत 6.29 रुपये आहे.
लाईटकॉईन (Litecoin)
मागील चोवीस तासात लाईटकॉनचे मूल्य 2.34 टक्क्यांनी वाढले आहे. तर याची किंमत 83.49 युएस डॉलर होती. ज्याचे भारतीय चलनात मूल्य 6,813 रुपये आहे.
सोलाना (Solana)
सोलाना क्रिप्टोच्या किमतीत मागील चोवीस तासात 0.39 टक्क्यांची घसरण झाली असून याची किंमत 16.09 युएस डॉलर एवढी आहे. तर याची भारतीय चलनातील किंमत 1312.51 रुपये एवढी आहे.