Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Adani Group Crisis: अदानी समुहाच्या हातून कोळसा प्रकल्पही निसटला, मुदत संपल्याने करार अखेर रद्द

Gautam Adani

Image Source : www.economictimes.indiatimes.com

Adani vs Hindenburg संघर्षांतर अदानी ग्रुपला अनेक प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. आता समूहाच्या हातून कोळसा प्रकल्पही निसटला आहे. मुदत संपल्याने करार रद्द करण्यात आला आहे.

अदानी पॉवरने मध्य भारतात असणारा कोळसा प्रकल्प ताब्यात घेण्याची योजना रद्द केली आहे. याबाबात समूहाने तशी माहिती शेअर बाजाराला दिली आहे. ऑगस्ट 2022 मध्ये समूहाकडून यासाठी सहमती दर्शवण्यात आली होती. अदानी पॉवरकडून 70.2 अब्ज रुपये  मूल्यावर डीबी पॉवरचे नियंत्रण घेण्यास सहमती दर्शवण्यात आली होती. कालांतराने   सरकारच्या यासंबंधित नियामक संस्थेने या संपादनाला मान्यता दिली होती. पण हिंडनबर्ग अहवालानंतर अदानी समूहासाठी बाजारातील परिस्थिति प्रतिकूल असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर अदानी समूहाने या प्रकल्पाचा विषय सोडून दिला आहे. 

15 फेब्रुवारीची होती डेडलाइन 

डीबी पॉवरचा हा प्रकल्प प्रक्रिया अदानी पॉवर कंपनीने 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु यासाठी  अदानी समूह असमर्थ ठरला आहे. त्यामुळे दोन्ही कंपन्यांनी हा व्यवहार रद्द करण्याचे मान्य केले आणि तशी माहिती मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारालाही कळवण्यात आलेली आहे. डीबी पॉवर ही कंपनी  छत्तीसगड राज्यात 1.2 गिगावॅट कोळसा ऊर्जा प्रकल्प चालवते. हा प्रकल्प खरेदी करण्यासाठी अदानी समूहाने करार केला होता. 

ऑगस्ट 2022 मध्ये याविषयी अदानी समूहाकडून सहमती दर्शवण्यात आली होती. छत्तीसगढ़मधील  जंजगीर-चांपा जिल्हयामध्ये  डीबी पावर संचालित हा प्रोजेक्ट  अदानी पॉवर 7,017 कोटी  रुपये या मूल्यावर  खरेदी करणार असा  व्यवहार ठरला. अदानी पॉवर  कंपनीने ही माहिती ऑगस्ट महिन्यात  शेअर बाजारात दिली आहे. डीबी पॉवरवर  5 हजार 500 कोटी रुपये कर्ज आहे. वर्ष 2015 पासून या पद्धतीने  600-600 मेगावाट चे  दोन युनिट  चालत आहेत. ही कोळसा  पुरवठ्यासाठी कोल इंडिया लिमिटेडची सहयोगी आहे. तीन ऑक्टोबर 2022 अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाली.

टाटा पॉवरलाही होता या प्रकल्पात इंटरेस्ट 

या संपादनासह अदानी पॉवर छत्तीसगडमध्ये औष्णिक ऊर्जा क्षेत्राचा विस्तार करेल. अदानी पॉवर ऊर्जा क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. छत्तीसगडमध्ये आणखी दोन ऊर्जा प्रकल्पांचे काम सुरू आहे. यासोबतच येथे कोळसा खाण घेण्याचीही तयारी आहे. अशा प्रकारचे चित्र निर्माण झाले होते. सध्या उपलब्धतेनुसार डीबी पॉवरमधून तेलंगणा किंवा राजस्थानला वीज पुरवठा केला जातो.सुमारे पाच वर्षांपूर्वी टाटा पॉवरलाही डीपी प्रकल्पामध्ये इंटरेस्ट होता.  डील फायनल झाली मात्र काही ना काही कारणाने प्रकल्प  लांबणीवर पडला.

आता अदानी समूहाच्या हातून हा प्रकल्प निसटला आहे. मुदत संपल्याने हा प्रकल्प रद्द करावा लागला आहे. हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहासमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाल्याचे चित्र आहे. अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये प्रचंड घसरण झाली आहे.  अदानी इंटरप्रायजेसने फॉलो ऑन पब्लिक ऑफरसाठी प्रयत्न केले होते.  या फॉलो ऑन पब्लिक ऑफरमधून कंपनीने 20,000 कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा निश्चय केला होता.  नोव्हेंबर, 2022 मध्ये अदानी इंटरप्रायजेसच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या बैठकीत एफपीओच्या माध्यमातून 20,000 कोटी रुपये उभारण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वी अशाप्रकारे एफपीओच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात कोणत्याही कंपनीने निधी उभारलेला नाही. यापूर्वी यस बॅंकेने  2020 मध्ये फॉलो-ऑन पब्लिक ऑफरद्वारे 15,000 कोटी रुपयांचा निधी उभा केला होता आणि हा आकडा आतापर्यंतचा सर्वांत मोठा होता. पण अलीकडेच  अदानी समुहाने अदानी इंटरप्रायजेसच्या माध्यमातून 20 हजार कोटी रुपयांचा एफपीओ (Follow-On Public Offer-FPO) आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र दरम्यान हिंडनबर्ग अहवाल जाहीर झाला. आणि यंतर अदानी समूहासाठी बाजारातील परिस्थिती प्रतिकूल ठरताना दिसत आहे. अखेर या सर्व पार्श्वभूमीवर हा FPO रद्द करावा लागला होता. यानंतर विविध प्रकारे आर्थिक आव्हाने अदानी समूहासमोर वाढताना दिसत आहेत. आता छत्तीसगडमधील हा महत्वाचा प्रकल्पही अदानी ग्रुपच्या हातातून निसटला आहे.