फ्रेंच कार निर्मिती कंपनी सिट्रॉइनने गाड्यांच्या किंमतीत वाढ केली आहे. C5 Aircross आणि C3 या दोन गाड्यांच्या किंमती कंपनीने वाढवल्या आहेत. यातील C5 Aircross या कारची किंमत 50 हजार रुपये तर C3 कारची किंमत 27 हजार 500 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. 1 जानेवारीपासून ही दरवाढ लागू झाली आहे. सिट्रॉइन ही कंपनी भारतीय बाजारात नव्याने आली असून कंपनीच्या कार्स भारतीय ग्राहकांच्या पसंतीत पडत आहेत.
www.cardekho.com
2022 मध्ये सिट्रॉइन एअरक्रॉस या कारची विक्री जास्त झाली. सिंगल टॉप व्हेरियंटमध्ये ही कार बाजारामध्ये उपलब्ध आहे. दरवाढ झाल्यानंतर Citroen C5 ची भारतातील एक्स शोरुम किंमत 37.17 लाख रुपये झाली आहे. किंमत वाढीबरोबरच कंपनीने गाडीच्या फिचर्समध्येदेखील वाढ केली आहे.
काय आहेत नवीन फिचर्स
C5 एअरक्रॉस गाडीच्या डिझाइनला आता फ्रेश लूक देण्यात आला आहे. न्यू हेडलाइट्स, ट्विन डीआरएल्स दोन्ही बाजूंनी, नवीन एलॉय व्हिल्स, बॉडी क्लॅडिंग ही फिचर्स देण्यात आले आहे. तर गाडीच्या आतील इंटिरियरमध्येही बदल करण्यात आले आहे. दहा इंच टचस्क्रीन इन्फोटेंनमेंट सेट, अतिरिक्त सीट कुशन कुलिंग फंक्शनसह देण्यात आले आहे. सिट्रॉइन C3 पेट्रोल श्रेणीतील गाडीची किंमत 27 हजार 500 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. तर टर्बो पेट्रोल व्हेरियंट कारची किंमत 20 हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे.
www.autocarindia.com
सिट्रॉइन कंपनी भारतीय बाजारपेठेमध्ये 2021 साली दाखल झाली. भारतीय उद्योगसमुह सी. के बिर्लासोबत कंपनीने भागीदारी केली आहे. तामिळनाडूतील सी. के बिर्ला कंपनीच्या निर्मिती प्रकल्पामध्ये सिट्रॉइन कारची निर्मिती केली.