Tax Heaven Country In The World : जगातील अनेक देशांमध्ये कर उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. सरकार जनतेकडून दोन प्रकारे कर वसूल करते. एक प्रत्यक्ष कर आणि दुसरा अप्रत्यक्ष असते. सरकार जनतेकडून वसूल करणाऱ्या करातून विकासाची कामे करतात. रस्ते, धरण बांधणे, घरकुल योजना राबविणे, इत्यादी विकासाची कामे मिळणाऱ्या करामधून केली जातात. मात्र आजही असे अनेक देश आहेत, जिथे लोकांना एक पैसाही कर भरावा लागत नाही. असे असूनही या देशातील लोकांना सरकारकडून चांगल्या सुविधा मिळतात. हे देश देखील वेगाने प्रगती करत आहे.
भारत, अमेरिका आणि ब्रिटनसह अनेक देशांमध्ये लोकांना कर भरावा लागतो. परंतु, असे अनेक देश आहेत, जिथल्या लोकांना एक रुपयाही कर भरावा लागत नाही. ज्या ठिकाणी नोकरी करताता किंवा व्यवसाय करतात त्याचे संपूर्ण उत्पन्न त्यांना मिळते. जाणून घेऊया असे कोणते देश आहेत, जिथे कर भरावा लागत नाही.
Table of contents [Show]
द बहामास
द बहामास या देशाला पर्यटकांचे नंदनवन म्हटले जाते. पर्यटकांसाठी हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. द बहामास हा देश पश्चिम गोलार्धात येतो. या देशातील खास गोष्ट म्हणजे, येथे राहणाऱ्या नागरिकांना आयकर भरावा लागत नाही. येथील सरकार केवळ व्हॅट आणि मुद्रांक शुल्का सारखे शुल्क आकारते.
यूएई
संयुक्त अरब अमिराती हा आखाती प्रदेशातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक देश आहे. तेल आणि पर्यटनामुळे यूएईची अर्थव्यवस्था खूप मजबूत आहे. त्यामुळे येथील लोकांना आयकरातून सवलत देण्यात आली आहे.
बहारीन
आखाती देश बहारीनमध्ये नागरिकांना त्यांच्या कमाईवर कोणत्याही प्रकारचा कर भरण्याची गरज नाही आणि याठिकाणी सरकार जनतेकडून कोणताही कर वसूल करत नाही.
ओमान
बहरीन आणि कुवेत व्यतिरिक्त आखाती देश ओमानचाही कर न भरावा लागणाऱ्या देशांच्या यादीत समावेश आहे. ओमान येथे अतिशय मजबूत असे तेल आणि वायू क्षेत्र असल्याने, येथील नागरिकांना कर भरावा लागत नाही.
पनामा
पनामा या मध्य अमेरिकन देशात नागरिकांना कोणताही कर भरावा लागत नाही. या देशात समुद्रकिनारे आणि कॅसिनोची मोठी साखळी आहे. जेथे नागरिकांना भांडवली नफ्यावरही कर भरावा लागत नाही.
कतार
ऑईल क्षेत्रात अतिशय मजबूत पकड असलेल्या कतार या देशात देखील इथल्या नागरिकांना कर भरावा लागत नाही. हा देश अतिशय छोटा असला तरी, येथील नागरिक प्रचंड श्रीमंत आहे.
जॉर्डन, त्रिनिदाद आणि टोबॅगो
जॉर्डनमध्ये कर स्लॅब 30 टक्के आहे. त्रिनिदाद आणि टोबैगो मध्ये नागरिकांवर केवळ 30 टक्के कर आकारला जातो आणि मलेशियामध्ये 28 टक्के कर आकारला जातो. तर ब्राझीलमध्ये 27.5 टक्के कर लावला जातो.
मेक्सिको आणि माल्टा
मेक्सिको आणि माल्टा या दोन्ही देशात नागरिकांना जास्तीत जास्त 35 टक्के कर द्यावा लागतो.