Indian employees fired from Chinese app TikTok: शॉर्ट व्हिडिओ बनवणारे ऍप जगभरात टिकटॉक फार कमी वेळात खूप प्रसिद्ध झाले. टिकटॉकवर लहान खेड्यापासून मोठ्या शहरांपर्यंत लोक व्हिडिओ बनवत होते आणि इतरांचे व्हिडिओ पाहून मनोरंजन करत होते. टिकटॉकने अनेक अनोळखी लोकांनाही स्टार बनवले,हे सत्य नाकारता येणार नाही. पण दोन वर्षांपूर्वी 2020 मध्ये भारत सरकारने टिकटॉकवर बंदी घातली. त्यानंतर टिकटॉक सारखे अनेक शॉट व्हिडिओ बनवणारे ऍप्स बाजारात आले, परंतु ते अद्याप टिकटॉकसारखी लोकप्रियता मिळवू शकलेले नाहीत. टिकटॉकवर बंदी घातल्याने टिकटॉक वापरणारे लोकही नाराज होते. आता टिकटॉकबद्दल जी नवीन गोष्ट समोर आली आहे ती भारतीयांसाठी धक्कादायक आहे. खरं तर, चिनी शॉर्ट व्हिडिओ मेकिंग ऍप टिकटॉकने त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या सर्व भारतीयांच्या नोकऱ्या संपुष्टात आणल्या आहेत. कंपनीने सर्व भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
28 फेब्रुवारीला शेवटचा कामाचा दिवस! (February 28 is the last working day)
मिळालेल्या माहितीनुसार, चिनी शॉर्ट व्हिडिओ बनवणारे ऍप, टिकटॉकने भारतातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी काम करण्याची शेवटची तारीख निश्चित केली आहे. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, टिकटॉकमध्ये काम करणाऱ्या भारतीयांसाठी 28 फेब्रुवारी हा शेवटचा कामाचा दिवस म्हणून निश्चित करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतात टिकटॉक बंद झाल्यानंतरही या कंपनीत सुमारे 40 भारतीय काम करत होते. आता या सर्वांना कामावरून काढले जाणार आहे. भारताचा शेजारी देश, बांगलादेशमध्ये टिकटॉक वापरणारे लोक मोठ्या प्रमाणात आहेत. तेथे देखील बंगाली भाषेचा प्रभाव आहे. त्यामुळे बंगाली भाषा जाणणारे अनेक भारतीय कर्मचारी टिकटॉकच्या बांगलादेश येथील कंपनीसाठी काम करत होते. कामावरून काढून टाकलेल्या लोकांमध्ये बंगाली भाषेवर काम करणारे लोक अधिक असल्याचे बोलले जात आहे.
TikTok reportedly fired as many as 40 employees on February 6, telling them February 28 would be their last working day.
— The Tech Portal (@techportalntw) February 11, 2023
To get more such updates, follow @techportalntw#TikTok #layoffs #layoffs2023 #layoff #jobs #chinese #India #breakingnews #TikTokIndia pic.twitter.com/e71O3dg6LD
सुरक्षेच्या कारणास्तव घेतला गेला निर्णय (The decision was taken for security reasons)
इकॉनॉमिक टाईम्सच्या (Economic Times) अहवालानुसार, जून 2020 मध्ये, भारतातील बंदी घातलेल्या ByteDance-मालकीच्या प्लॅटफॉर्मने आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितले होते की राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना नऊ महिन्यांचा नोटिस कालावधी दिला जाईल. मात्र, बहुतांश कर्मचाऱ्यांना केवळ तीन महिन्यांचे नोटीस पिरियडचे पैसे देण्यात आल्याचे समोर आले आहे. जून 2020 मध्ये सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकसह अन्य 59 चीनी ऍप्सवर बंदी घातली होती. तेव्हापासून भारतात WeChat, Shareit, Helo, Likee, UC News, Bigo Live, UC Browser आणि इतर अनेकांसह 300 हून अधिक चिनी ऍप्सवर बंदी घालण्यात आली आहे.
केंद्राने गेल्या आठवड्यात 230 हून अधिक ऍप्स ब्लॉक केले होते, ज्यात 138 बेटिंग आणि सुमारे 94 लोन ऍप्सचा समावेश होता, ज्यातील बहुतांश ऍप्स हे चिनी होते. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला (MeitY) नुकतेच गृहमंत्रालयाने थर्ड पार्टी लिंकद्वारे ऑपरेट करणाऱ्या ऍप्सवर बंदी घालण्यास सांगितले होते. हे सर्व ऍप्स IT कायद्याच्या कलम 69 चे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले होते आणि त्यामध्ये भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला धोका आहे असे जाणवले होते, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
अमेरिकेतही टिकटॉकवर बंदी घालण्याची तयारी (America too Preparing to ban TikTok)
दुसरीकडे , US सिनेटर मायकेल बेनेट यांनी ऍपलचे सीईओ टिम कुक आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी अस्वीकार्य धोका असल्याचे सांगत, टिकटॉकला त्यांच्या ऍप स्टोअरमधून तात्काळ काढून टाकण्याची विनंती केली आहे. अमेरिका चायनीज शॉर्ट व्हिडीओ मेकिंग ऍप TikTok वर देशव्यापी बंदी घालण्याची योजना आखत आहे आणि हाऊस फॉरेन अफेअर्स कमिटी (House Foreign Affairs Committee) पुढील महिन्यात टिकटॉक हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पूर्णपणे ब्लॉक करण्याच्या विधेयकावर मतदान करणार आहे अशी माहिती समोर आली आहे.