Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

RTO challan Payment: तुमच्या गाडीवर कुठले चलन तर नाही ना? ऑनलाईन चेक करा आणि ऑनलाईनच भरा

RTO challan Payment

खरे तर गाडीचा वापर करणाऱ्या आपण सर्वानीच दर महिन्याला आपण कुठली वाहतुकीचे नियम प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तोडले तर नाही ना याची खातरजमा केली पाहिजे. पूर्वी, तुमच्या वाहनावरील दंड तपासण्यासाठी वाहतूक पोलिस स्टेशन किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (RTO) भेट द्यावी लागत असे. परंतु डिजिटल युगा आपल्या कार किंवा बाईकवर असलेला दंड ऑनलाइन तपासणे शक्य झाले आहे.

कधी तर गाडी चालवताना पोलीस आपल्याला पकडतात, त्यांनतर आपल्या गाडीच्या नंबर प्लेटची माहिती घेत ते आतापर्यंत आपण किती वेळा वाहतुकीचे नियम मोडले आहेत याची कुंडलीच काढतात आणि आपल्याला गेल्या वर्षां-दोन वर्षातील जमा झालेल्या दंडाची रक्कम सांगितली जाते. साहजिकच ही रक्कम फार मोठी असते. परंतु आपल्यासमोर दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नसतो.

खरे तर गाडीचा वापर करणाऱ्या आपण सर्वानीच दर महिन्याला आपण कुठली वाहतुकीचे नियम प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तोडले तर नाही ना याची खातरजमा केली पाहिजे. पूर्वी, तुमच्या वाहनावरील दंड तपासण्यासाठी वाहतूक पोलिस स्टेशन किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (RTO) भेट द्यावी लागत असे. परंतु डिजिटल युगा आपल्या कार किंवा बाईकवर असलेला दंड ऑनलाइन तपासणे शक्य झाले आहे.

मोबाईल ऍप्लिकेशन्स (Mobile Application)

mParivahan हे सरकारने बनवलेले मोबाइल अॅप्लिकेशन आहे.तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करू शकता. याद्वारे तुम्हाला तुमच्या गाडीवर आकारलेल्या दंडाविषयी तसेच सरकारी योजना आणि वाहतुकीबाबत असलेल्या नियमांचे अपडेट्स मिळतील.

परिवहन विभागाची वेबसाइट

देशभरातील सर्वच राज्ये आपल्या परिवहन विभागाची स्वतंत्र वेबसाइट चालवतात. तसेच तुमच्या वाहनावरील दंड तपासण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन सुविधा देखील उपलब्ध करून देतात. तसेच भारत सरकारची परिवहन सेवा वेबसाइट देखील याकामी उपयोगी पडेल. https://echallan.parivahan.gov.in या बेवसाईटवर तुम्हाला तुमच्या वाहनाचा नोंदणी क्रमांक आणि वेबसाइटवर दिलेला कॅप्चा कोड टाकावा लागेल. एकदा तुम्ही तपशील सबमिट केल्यानंतर, तुमच्या वाहनावर काही दंड आकारण्यात आला आहे की नाही हे तुम्ही पाहू शकाल.

ऑनलाईन चलन तपासण्यासाठी  आणि ऑनलाईन दंडाचा भरणा करण्यासाठी खालील स्टेप्सचे अनुसरण करा.

स्टेप 1: सरकारच्या अधिकृत परिवहन विभागाच्या वेबसाइटला भेट द्या https://echallan.parivahan.gov.in/index/accused-challan

स्टेप  2: तुमच्या वाहनाचा नोंदणी क्रमांक एंटर करा

या स्टेपमध्ये, तुम्हाला तुमच्या वाहनाचा नोंदणी क्रमांक टाकावा लागेल. तुम्ही योग्य नोंदणी क्रमांक समाविष्ट केल्याची खात्री करून घ्या. कारण कुठलाही एखादा चुकीचा क्रमांक जर तुम्ही टाकत असाल तर तुम्हाला तुमच्या वाहनाची माहिती मिळू शकणार नाही.

स्टेप 3: कॅप्चा कोड प्रविष्ट करा
तुम्हाला वेबसाइटवर दर्शवत असलेला कॅप्चा कोड प्रविष्ट करणे आवश्यक आहे. कॅप्चा कोड हे काही अक्षरे आणि संख्या मिळून तयार केलेला असतो. कॅप्चा कोडसाठी दिलेल्या जागेत कोड टाईप करा.

स्टेप 4: परिणाम तपासा
सगळी माहिती टाईप केल्यानंतर ‘Get Details’ वर क्लिक करा. त्यानंतर  बेवसाईटवर तुमच्या वाहनावर लावलेल्या दंडाचे परिणाम दाखवले जातील. तसेच तुम्ही कोणते वाहतुकीचे नियम मोडले, त्याची तारीख, ठिकाण आणि फोटो तसेच दंडाची रक्कम आदी तपशीलांचा समावेश असेल.

स्टेप 5: दंड भरा
जर तुमच्या वाहनावर दंड आकारला गेला असेल, तर लवकरात लवकर दंड भरायला हवा. दंडाची रक्कम वाढल्यास आणि वेळेत न भरल्यास परिवहन कार्यालय तुमच्यावर कारवाई देखील करू शकते हे लक्षात ठेवा. वेबसाइटवर ऑनलाइन दंड भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे.तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा UPI च्या मदतीने ऑनलाइन पेमेंट करू शकता. ऑनलाइन पेमेंट उपलब्ध नसल्यास, पेमेंट करण्यासाठी तुम्हाला ट्रॅफिक पोलीस स्टेशन किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) ला भेट द्यावी लागेल.

चला तर मग, वाट कसली बघताय? लगेचच तुमच्या गाडीसंबंधीची माहिती, दंड व इतर माहिती जाणून घ्या आणि वेळीच दंडाची रक्कम भरून नियमानुसार गाडी चालवा आणि स्वतःची काळजी घ्या.