कर्ज म्हणजे कोणतीही वस्तू ठराविक वेळेआधी मिळवण्यासाठी केली जाणारी आर्थिक तरतूद होय. मात्र वेळे आधी मिळवलेल्या वस्तूची किंमत त्यानंतर कर्जासह चुकवावी लागते. कर्जाच्या अनेक प्रकारांपैकी वैयक्तिक कर्ज हे सर्वात जास्त व्याजदर असलेले कर्ज आहे. आज ते सहज उपलब्ध होते. मात्र कुठल्याही प्रकारचे कर्ज घेण्यापूर्वी तुम्ही काही गोष्टी तपासून पाहणे गरजेचे ठरते.
Table of contents [Show]
कर्जाची रक्कम (Loan Amount)
कुठलेही कर्ज घेण्याआधी आपला दैनंदिन खर्च किती? आपल्या इतर आर्थिक गरजा कोणत्या? अत्यावश्यक गरजा कोणत्या? हे लक्षात घेणे आवश्यक आहे. हा अंदाज 100% बरोबर येणे अपेक्षित नसले तरी आपल्या खर्चांचा ताळमेळ नक्की लागतो. हे करणे फार गरजेचे आहे. प्रत्येक गरजा या केवळ बँकेच्या रकमेतूनच भागवण्याची इच्छा न ठेवता त्यासाठी आणखी काही मार्ग आहेत का? हे तपासून बघा. कमीत कमी कर्ज काढण्याचा विचार करा. कारण कर्ज जेवढे कमी असेल, तेवढ्या लवकर तुमची त्यातून लवकर सुटका होईल.
व्याजदर तपासा (Check Interest Rates)
प्रथमच कर्ज घेणाऱ्या लोकांना व्याजदर किती असू शकतो? याचा अंदाज येत नाही. अशावेळी कर्ज देण्यास प्रथमच होकार देणाऱ्या बँकेवरच डोळे बंद करुन विश्वास न ठेवता, आणखी इतरत्र बँकांचे व्याजदर काय आहेत? हे तपासून पाहायला हवे. कारण व्याजदरावरच तुमचे कर्ज किती कालावधीसाठी असणार आहे, दर महिन्याला किती रुपयांचा हप्ता तुम्हाला भरायचा आहे? यावरच तुमचे आर्थिक नियोजन आणि चिंतामुक्त जीवन अवलंबून असते.
परफेड कधी (Repayment)
कर्जाची परतफेड करतांना तुम्ही मूळ रक्कम आणि व्याजाची रक्कम यामधून कुठली रक्कम सगळ्यात आधी भरु शकता. तसेच या चक्रव्यूहातून तुम्ही कधी बाहेर पडणार आहात, याचा विचार करा. कर्ज असले की ते कधी परतफेड करायचे, याचा एक वेगळाच मासिक ताण घेऊन आपण जगत असतो. तेव्हा कर्जाच्या ताणातून आपण लवकरात लवकर कसे बाहेर पडू? याचा विचार आधीच करणे गरजेचे आहे.
महिन्याला किती EMI (How Much EMI)
तुम्हाला दर महिन्याला इन्कम स्वरुपात मिळणारी रक्कम आणि कर्जाच्याद्वारे निघून जाणारी रक्कम यांचा मेळ साधणे आवश्यक आहे. तेव्हा थोडा वेळ घेऊन आणि विचार करुनच किती कर्ज घ्यायचं हे ठरवा.
'या' ही गोष्टींचा विचार करा (Things To Remember)
- कर्ज घेतल्यानंतर ते बँकेच्या पध्दतीनेच पूर्ण करावं, अशी बँकांची इच्छा असते. मात्र कर्जाची मुदतपूर्व परतफेड केल्यास, तुमच्यासाठी कधीही उत्तम ठरेल.
- कर्ज देणाऱ्या बँकेची परिस्थिती काय आहे? ते तपासून घ्या.
- तात्काळ कर्जाची गरज भासल्यास, जितक्या कमी वेळेत कर्जाची रक्कम आपल्या खात्यात जमा करेल, अशी बँक बघा.