Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Education Loan After 12th: बारावी नंतर शैक्षणिक कर्ज मिळवायचंय? जाणून घ्या कर्ज मिळवण्यासाठी काय तयारी करावी?

Education Loan After 12th

आजच्या स्पर्धेच्या युगात आपण सगळ्यांनीच शिक्षणाचे महत्व जाणले आहे, तेव्हा आपल्या मुलाबाळांनी उच्च शिक्षण घ्यावं, चांगल्या पगाराची नोकरी मिळवावी अथवा उद्योग सुरु करावा यासाठी पालक आवश्यक त्या सगळ्या गोष्टी करायला तयार असतात. या लेखात, आपण जाणून घेऊयात की शैक्षणिक कर्जाची निवड करण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते आणि भारतात कोणकोणत्या विविध अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक कर्ज दिले जाते.

नुकतेच बारावीचे निकाल लागले आहेत. उच्च शिक्षणासाठी घेण्यासाठी अनेक विद्यार्थी सध्या वेगवेगळे पर्याय शोधत असतील. देशात आणि परदेशात शिक्षणाच्या संधी शोधताना त्यासाठी आवश्यक असलेला खर्च आपल्याला विचारात घ्यावाच लागतो. कारण सगळी सोंग करता येतात, पैशाच सोंग मात्र करता येत नाही, हे आपल्या सगळ्यांना माहितीये. पैशाअभावी शिक्षण मध्यांतरी सोडणारे बरेच लोक आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसतील. खरे तर उच्च शिक्षण एखाद्या विद्यार्थ्याच्या करिअरला आकार देण्यासाठी आणि वैयक्तिक विकासाच्या संधी निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते.

आजच्या स्पर्धेच्या युगात आपण सगळ्यांनीच शिक्षणाचे महत्व जाणले आहे, तेव्हा आपल्या मुलाबाळांनी उच्च शिक्षण घ्यावं, चांगल्या पगाराची नोकरी मिळवावी अथवा उद्योग सुरु करावा यासाठी पालक आवश्यक त्या सगळ्या गोष्टी करायला तयार असतात. परंतु, अनेक विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांसाठी शिक्षणासाठीचा खर्च एक महत्त्वपूर्ण अडथळा ठरू शकतो. या आर्थिक अडथळ्यावर मात करण्यासाठी, 12 वी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळवण्यासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध आहे. देशभरातील विविध बँका वेगवगेळ्या व्याजदरात विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज देत असतात.

या लेखात, आपण जाणून घेऊयात की शैक्षणिक कर्जाची निवड करण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते आणि भारतात कोणकोणत्या विविध अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक कर्ज दिले जाते.

शैक्षणिक कर्ज म्हणजे काय ?

अगोदर शैक्षणिक कर्ज म्हणजे काय हे समजून घ्या. शैक्षणिक कर्ज मिळवण्यासाठी जे विद्यार्थी आणि त्यांचे पालक प्रयत्न करत आहेत त्यांनी आधी शैक्षणिक कर्ज कुणाला आणि कोणत्या गोष्टींसाठी दिले जाते हे समजून घ्यायला हवे. शैक्षणिक कर्जे हे बँका आणि वित्तीय संस्थांद्वारे उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना दिलेली एक आर्थिक मदत आहे. या आर्थिक मदतीची परतफेड आपल्याला करायची असते हे लक्षात असू द्या.

शैक्षणिक कर्जात ट्यूशन फी, राहण्याची व्यवस्था (वसतिगृह आदी), पुस्तके आणि इतर शैक्षणिक खर्च यासारख्या खर्चाचा समावेश असतो. कर्ज देऊन नफा कमावणे हा बँकांचा व्यवसाय आहे, त्यामुळे वेगवगेळ्या बँका कर्जदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे व्याजदर ऑफर करतात, तसेच परतफेडीचे लवचिक पर्याय आणि विद्यार्थ्याचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर कर्जाच्या परतफेडीसाठी वाढीव कालावधी देखील दिला जातो. त्यामुळे जर तुम्ही शैक्षणिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आपल्याला सोयीस्कर असेल, फायदेशीर असेल असा पर्याय देणाऱ्या बँकाच निवडा. विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाच्या संधी मिळाव्या यासाठी काही बँका व्याजदरात 0.50% ते 1% पर्यंत सवलत दिली जाते.

शैक्षणिक कर्ज घेण्यासाठीचे पात्रता निकष

शैक्षणिक कर्जासाठी पात्र होण्यासाठी, बँकाचे काही विशिष्ट निकष आहेत जे अर्जदारांनी पूर्ण केले पाहिजेत. हे निकष बँक किंवा वित्तीय संस्थेनुसार थोडेफार बदलू शकतात अवलंबून थोडेसे बदलू शकतात, परंतु सामान्यत: खालील गोष्टींचा समावेश होतो:
अ. केवळ भारतीय नागरिक असलेल्या विद्यार्थ्यालाच शैक्षणिक कर्ज दिले जाते. 
ब. भारतात किंवा परदेशातील मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला असेल तरच शैक्षणिक कर्ज मिळते. 
क. विद्यार्थ्याचे चांगले शैक्षणिक रेकॉर्ड हे देखील बँका प्रामुख्याने बघतात. 
ड. विद्यार्थ्याचे वय सामान्यत: 16 ते 35 वर्षे दरम्यान असावे.
ई. सह-अर्जदार, जसे की पालक, जे शैक्षणिक कर्जासाठी हमीदार म्हणूनही भूमिका निभावू शकतात.
फ. ज्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी लोन घेऊ इच्छितात त्यासाठी प्रवेश घेतल्याचा पुरावा, ओळखीचा पुरावा, रहिवासी असल्याचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा आणि इतर आवश्यक शैक्षणिक नोंदी बँकांकडून तपासल्या जातात. 

bank-2.jpg

विविध अभ्यासक्रमांसाठी दिले जाते शैक्षणिक कर्ज

12वी इयत्ता पूर्ण केल्यानंतर, विद्यार्थ्यांकडे त्यांच्या आवडी, करिअरच्या संधी आणि शैक्षणिक समज यांच्या आधारावर अभ्यासक्रम निवडण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. बारावी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रातील वेगवेगळ्या कोर्ससाठी प्रवेश घेता येतो. शाखेनिहाय काही कोर्सची शैक्षणिक शुल्क बदलते हे लक्षात घ्या.

काही लोकप्रिय कोर्सेसचे ऑप्शन खाली देतो आहोत. या सर्वच अभ्यासक्रमांसाठी बँका शैक्षणिक कर्ज प्रदान करतात.

अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान (Engineering and Technology)

B.Tech, B.E. सारखे अभ्यासक्रम विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. दरवर्षी लाखो विद्यार्थी या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेत असतात. कॉम्प्युटर, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल आदी विषयांचे स्पेशलायझेशन या अभ्यासक्रमात निवडता येतात.या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवण्यासाठी सरकारी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

मेडिसिन आणि हेल्थ सायन्सेस (Medicine and Health Science)

 MBBS, BDS (डेंटीस्ट), B.Pharm (फार्मसी), आणि नर्सिंग, फिजिओथेरपी यांसारखे विविध अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची मोठी पसंती असते. आरोग्यसेवा क्षेत्रात काम करण्याची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे लोकप्रिय अभ्यासक्रम आहेत.या अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक शुल्क देखील इतर अभ्यासक्रमांच्या तुलनेत अधिक असते. त्यामुळे या क्षेत्रातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षणिक कर्ज घेत असतात. या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवण्यासाठी देखील सरकारी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

व्यवसाय आणि व्यवस्थापन (Business and Administration)

बीबीए (बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन), बी.कॉम (बॅचलर ऑफ कॉमर्स), आणि एमबीए (मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन) हे सगळे अभ्यासक्रम व्यवस्थापन, वित्त किंवा उद्योजकतेकडे कल असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम पर्याय म्हणून समोर आले आहेत. गेल्या काही वर्षांपासून या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवेश घेत आहेत.

मानवविद्या आणि सामाजिक विज्ञान (Humanities and Social Science) 

BA (बॅचलर ऑफ आर्ट्स), B.Sc (विज्ञान पदवी), आणि मानसशास्त्र (Psychology), समाजशास्त्र (Sociology), साहित्य (Literature) आणि पत्रकारिता (Journalism) मधील अभ्यासक्रम शिक्षणक्षेत्र, मीडिया, संशोधन क्षेत्र यासारख्या क्षेत्रात करिअरच्या संधी देतात.

डिझाईन आणि ललित कला (Design and Fine Arts)

फॅशन डिझाईन, इंटिरियर डिझाइन, व्हिज्युअल आर्ट्स आणि ॲनिमेशनमधील अभ्यासक्रम सर्जनशील अभिव्यक्तीसाठी आणि डिझाइन उद्योगातील करिअरसाठी वेगवगेळ्या संधी निर्माण करून देते. या अभ्यासक्रमांसाठी वेगवेगळ्या संस्थेच्या वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा देखील असतात.

कायदेविषयक अभ्यास (Law Studies)

कायदेशीर क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी एलएलबी (बॅचलर ऑफ लॉ) हा पर्याय उत्तम मानला जातो. या अभ्यासक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी देखील सरकारी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

इतर व्यावसायिक अभ्यासक्रम

वर उल्लेख केलेल्या अभ्यासक्रमा व्यतिरिक्त, आर्किटेक्चर (B.Arch), हॉटेल मॅनेजमेंट (Hotel Managemnet), एव्हिएशन (Aviation), पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशन (Journalsim and Mass Communication) यासारखे अभ्यासक्रम विशेष करिअरचे मार्ग उपलब्ध करून देतात.

अर्ज प्रक्रिया कशी कराल?

शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करण्यासाठी, खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करणे गरजेचे आहे. या स्टेप्स वेगवगेळ्या बँकांसाठी वेगवेगळ्या असू शकतात हे लक्षात असू द्या.

शैक्षणिक कर्जासाठी बँकेची निवड

व्याजदर, परतफेडीचे नियम व अटी आणि कर्ज वैशिष्ट्यांची तुलना करण्यासाठी विविध बँका आणि वित्तीय संस्था ऑनलाईन इंटरनेटवर एक्सप्लोर करा. तुमची कर्जाची आवश्यकता आणि सोय बघून बँकेची निवड करा. एकदा की शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी बँक शॉर्टलिस्ट झाली की त्यांनतर आवश्यक त्या कागदपत्रांची जुळवणी करण्यासाठी तयारीला लागा.

कागदपत्रे तयार ठेवा

ज्या अभ्यासक्रमासाठी तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे, त्या महाविद्यालयातील प्रवेशाचा पुरावा, शैक्षणिक नोंदी म्हणजेच तुमची सर्व शैक्षणिक कागदपत्रे, ओळखीचा पुरावा, पत्ता पुरावा, उत्पन्नाचा पुरावा आणि सह-अर्जदाराचे बँक स्टेटमेंट यासह आवश्यक कागदपत्रे जमा करा.

कर्जासाठी अर्ज

शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी जी बँक शॉर्टलिस्ट केली आहे त्या बँकेच्या जवळच्या शाखेला भेट द्या. बँकेतील अधिकाऱ्यांशी सविस्तर बोला, काही शंका असल्यास त्याचे आधीच निरसन करून घ्या. बँकेचा कर्जासाठी असलेला अर्ज विचारपूर्वक भरा. सध्या बँकेच्या वेबसाइटद्वारे शैक्षणिक कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. शक्यतो ऑनलाइन अर्ज करणे टाळलेले बरे, ऑनलाइन माहिती भरताना, कागदपत्रे जोडताना काही चूक झाल्यास ती सुधारण्यासाठी तुमचा फुकटचा वेळ जाऊ शकतो.

लोन सेक्युरिटी म्हणून अर्जदार आणि सह-अर्जदार त्यांच्या मालकीचे घर किंवा फ्लॅट, FD – मुदत ठेव, शेती आदी मालमत्ता दाखवू शकतात.

कर्ज मंजूरी

शैक्षणिक कर्जासाठी विद्यार्थ्याचे पालक हे सह-अर्जदार असतात. पालकांची आर्थिक स्थिरता, विद्यार्थ्याचे शैक्षणिक रेकॉर्ड आदी विषयांचा विचार करून बँक तुमच्या शैक्षणिक कर्जाच्या अर्जाचे मूल्यांकन करते. विद्यार्थ्याला ज्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळाला आहे त्या शैक्षणिक संस्थेत देखील बँक कर्मचारी तपासणी करू शकतात. यासाठी शिक्षणसंस्थेची माहिती अर्जात व्यवस्थित भरा. बँकेच्या तपासणीत तुम्ही उत्तीर्ण ठरलात तर तुम्हांला कर्ज मंजुरी दिली जाते आणि परतफेडीचे नियम देखील समजावून सांगितले जातात.