Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Popular AI Softwares: हे 5 AI टूल्स तुमचं काम सोपं करू शकतात, जाणून घ्या सबस्क्रिप्शन रेट्स…

AI Tools

Artificial Intelligence: युट्युबवर असे किती तरी कंटेंट क्रियेटर आहेत जे वेगेवेगळ्या एआय टूलचा वापर करून व्हिडियो बनवत आहेत आणि महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत. तसेच वेबसाईटवर देखील विविध लेख प्रकाशित करून कंटेंट रायटर्स देखील घरबसल्या पैसे कमवत आहेत.चला तर जाणून घेऊयात, अशी काही एआय सॉफ्टवेअर जी जगभरात मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत.

आजकाल ज्या गतीने महागाई वाढते आहे, घरखर्च वाढतो आहे, त्या गतीने लोकांचे पगार मात्र वाढत नाहीयेत. अशा या महागाईच्या काळात नोकरीशिवाय इतरही पैसे कमविण्याचे मार्ग आपण शोधले पाहिजेत. तुम्ही देखील अशाच काही गोष्टींसाठी हातपाय मारत असाल तर हा लेख तुम्ही वाचलाच पाहिजे!

आज आपण जरा टेक्नोलॉजीबद्दल बोलणार आहोत. सध्या जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टीफिशियल इंटेलिजंसबद्दल खूप सारी चर्चा सुरु आहे. त्याचे उपयोग, दुरुपयोग याबद्दल चर्चा तर होत राहील, परंतु त्याचा व्यवस्थित आणि विचारपूर्वक वापर करून तुम्ही पैसे देखील कमवू शकता. आज युट्युबवर असे किती तरी कंटेंट क्रियेटर आहेत जे वेगेवेगळ्या एआय टूलचा वापर करून व्हिडियो बनवत आहेत आणि महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत. तसेच वेबसाईटवर देखील विविध लेख प्रकाशित करून कंटेंट रायटर्स देखील घरबसल्या पैसे कमवत आहेत.

चला तर जाणून घेऊयात, अशी काही एआय सॉफ्टवेअर जी जगभरात मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत.

Hostinger आणि Wix 

जर तुम्हांला वेबसाईट बनवता येत नसेल, त्यासाठी आवश्यक असलेलं कोडिंग देखील तुम्हांला येत नसेल तर चिंता करायची गरज नाही. एआयने तुमचं हे काम देखील सोपं केलं आहे. Hostinger AI किंवा WIX.com च्या मदतीने तुम्ही घरबसल्या तुमची स्वतःची, तुम्हांला हवी तशी वेबसाईट तयार करू शकता.
Hostinger च्या मदतीने 3000 रुपयात तुम्हाला वर्षभरासाठी होस्टिंग सर्विस, डोमेन नेम आणि वेबसाईट बिल्डर देखील मिळेल. तर केवळ 2000 रुपयात WIX.com वर देखील तुम्हाला या सर्व सुविधा मिळू शकतील.

चॅट जीपीटी (Chat GPT) 

युट्युब चॅनेल आणि वेबसाईट बनवल्यानंतर तिथे कंटेंट नको का अपलोड करायला? त्यासाठी तुम्ही चॅट जीपीटीची मदत घेऊ शकता. आता चॅट जीपीटी कसे वापराल? अगोदर गुगल ट्रेंडवर जाऊन सध्या जगभरात आणि भारतात काय सुरु आहे, कसली चर्चा लोक करत आहेत याचा अंदाज घ्या. त्यांनतर चॅट जीपीटीला सदर विषयाबद्दल माहिती विचारा. ही माहिती घेऊन तुम्ही एखादा लेख, स्क्रिप्ट तयार करू शकता.

सध्या ऑनलाईन चॅट जीपीटीचे एक फ्री वर्जन उपलब्ध आहे. त्यातील माहिती खूप सविस्तर नाही. त्याच्या देखील काही मर्यादा आहेत. परंतु चॅट जीपीटीचे प्रीमियम वर्जन देखील उपलब्ध आहे, महिन्याला 1500 रुपये भरून तुम्ही हे प्रीमियम वर्जन वापरू शकता.

ग्रामरली  (Grammarly) 

आता चॅट जीपीटीच्या मदतीने लिहिलेला लेख किंवा स्क्रिप्ट व्याकरणाच्या दृष्टीने योग्य आहे किंवा नाही (इंग्रजी भाषेत असेल तर)  हे तपासायला हवे. यासाठी तुमचा लेख ग्रामरलीवर टाका, अगदी कमी वेळात तुम्हाला त्याचे व्याकरण तपासून आणि त्यात सुधारणा करून मिळेल.

सध्या ऑनलाईन ग्रामरलीचे एक फ्री वर्जन उपलब्ध आहे. परंतु त्याच्या काही मर्यादा आहेत, ग्रामरलीचे प्रीमियम वर्जन देखील उपलब्ध आहे, महिन्याला 1000 रुपये भरून तुम्ही हे प्रीमियम वर्जन वापरू शकता.

ai-internal-image-4.jpg

स्पीचेलो (Speechelo)

तुमच्याकडे आता एक मस्त आर्टिकल तयार आहे, ज्यात शुध्दलेखनाच्या, व्याकरणाच्या चुका तुम्ही दुरुस्त केल्या आहेत. हे आर्टिकल किंवा स्क्रिप्ट तुम्ही speechelo या AI टूलवर टाकू शकता. येथे तुम्हांला हव्या त्या व्यक्तीचा आवाज, हवी ती भाषा, शैली निवडता येईल. हे सॉफ्टवेअर तुम्हाला एकदाच 3000 रुपये देऊन आयुष्यभरासाठी वापरता येईल.तुम्ही वापरत असलेल्या विडिओ एडिटर मध्ये एआयने दिलेला आवाज वापरून व्हिडियो बनवू शकता आणि युट्युबवर टाकू शकता.

सिंथेशिया.आयओ (Synthesia.io)

जर तुम्हाला विडिओ एडिटिंगच्या भानगडीत पडायचं नसेल तर त्यावर देखील आपल्याकडे एक उपाय उपलब्ध आहे.Synthesia.io वर तुम्ही तुमची स्क्रिप्ट टाकू शकता आणि त्याद्वारे केवळ एआय आवाजच नाही तर व्हिडियोसाठी बोलणारा निवेदक किंवा निवेदिका देखील तुम्हांला उपलब्ध होईल. Synthesia.io चे सबस्क्रिप्शन 1500 रुपये प्रति महिना खरेदी करता येणार आहे.

वरील एआय टूलच्या मदतीने तुम्ही अगदी कमी वेळात एक चांगली स्क्रिप्ट लिहू शकता, तिचे व्याकरण तपासू शकता, त्यावर एआयचा आवाज, व्हिडियो वापरू शकता आणि तुमची कमाई करू शकता. परंतु एक लक्षात ठेवा, एआयचा वापर करताना पूर्णपणे एआयवर निर्भर राहू नका. एआयने दिलेल्या माहितीची उलटतपासणी देखील करा, म्हणजे संभाव्य अडचणी टळू शकतील. 

(या लेखासाठी सारंग भोसले यांचे सहकार्य लाभले आहे)