Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

नोकियाचा स्वस्त आणि मस्त फोन; 4 हजारापेक्षा कमी किंमत, 1 महिन्याचा बॅटरी बॅकअप

Nokia 8210 4G Phone

नोकिया कंपनीने Nokia 8210 4G हा नवीन फीचर फोन लॉन्च केला आहे; या फोनची किंमत 4 हजार रूपयांपेक्षा कमी असून तो दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

नोकिया कंपनीने बऱ्याच दिवसांनंतर भारतात 4G अॅक्सेस असलेला Nokia 8210 4G नवीन फिचर फोन लॉन्च केला. Nokia 8210 4G हा फोन लाल आणि निळा अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. तसेच यामध्ये दोन सिम कार्ड वापरण्याची सोय देण्यात आली आहे. हा फोन Series 30+ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते. यामध्ये 3.8 इंचाचा QVGA डिस्प्ले देण्यात आला आहे. Nokia 8210 4G मध्ये ब्ल्यूटूथ V5 सपोर्ट करते. तसेच यामध्ये नोकियाचा फेमस स्नेक गेम (Snake Game) सुद्ध देण्यात आला आहे. चला तर याची आणखी काही फीचर्स जाणून घेऊया.

Nokia 8210 4G फोनची किंमत

नोकियाचा हा Nokia 8210 4G नवीन फीचर फोन फक्त 3,999 रूपयांना मिळणार आहे. यामध्ये कंपनीने जाणीवपूर्वक फक्त दोन रंग दिले आहेत. पूर्वी नोकियाचे जे फोन खूप ट्रेंडिंगमध्ये होते. ते डार्क ब्ल्यू आणि रेड शेड कलर असे दोन रंग देण्यात आले. Nokia 8210 4G हा फोन नोकियाच्या अधिकृत वेबसाईटवर आणि अॅमेझॉनच्या वेबसाईटवरून विकत घेता येऊ शकेल. या फोनसोबत कंपनी एक वर्षाची रिप्लेसमेंट वॉरंटीसुद्धा देत आहे.

Nokia 8210 4G फोनचे फीचर्स

नोकियाच्या या फोनमध्ये डबल सिमकार्डसोबत 3.8 इंचाचा QVGA डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन 128 एमबी रॅमसह 48 एमबीची स्टोरेज क्षमता देण्यात आली आहे. स्टोरेज क्षमता मायक्रे एसडी कार्डसह 32 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. तसेच यामध्ये Unisoc T107 प्रोसेसर देण्यात आला आहे आणि हा फोन Series 30+ ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करत आहे. Nokia 8210 4G मध्ये 0.3 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

27 दिवसांचा बॅटरी बॅकअप!

Nokia 8210 4G मध्ये 1450mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, हा फोन एकदा चार्ज केला की, याच्या बॅटरीचा बॅकअप 27 दिवस स्टॅण्डबाय मिळतो. कनेक्टीव्हिटीबाबत सांगायचं झालं तर यामध्ये एफएम रेडिओ, MP3 प्लेअर, 3.5mm हेडफोन जॅक आणि मायक्रो युएसबी सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये नोकियाचे फेमस गेम Snake, Tetris, BlackJack सोबत एलईडी टॉर्च देण्यात आली आहे. या फोनचे वजन 107 ग्रॅम आहे.

https://tinyurl.com/2fa9eh3s