पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध सुविधा दिल्या जातात. या सुविधांचा लाभ घेण्यासाठी ओटीपी (One time password), फिंगरप्रिंट (Fingerprint) अशा काही आवश्यक गोष्टींची पूर्तता करावी लागत होती. आता यात बदल करण्यात आला आहे. या योजनेत नोंदणी असलेल्या कोणत्याही शेतकऱ्याला आता ओटीपी किंवा फिंगरप्रिंट लागणार नसून फेस ऑथेंटिकेशन स्कॅन (Face authentication scan) करून शेतकरी हे काम पूर्ण करू शकणार आहेत. याचसंदर्भात केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पीएम किसानच्या मोबाइल अॅपवर फेस ऑथेंटिकेशनची ही सुविधा सुरू केली आहे.
Table of contents [Show]
'तंत्रज्ञानाच्या वापरानं सुलभता'
तंत्रज्ञानाचा वापर करून या योजनेची अंमलबजावणी अधिक सुलभ करण्यात आली आहे, असं कृषी मंत्री म्हणाले, सरकारी निवेदनात म्हटलं आहे, की पीएम-किसान मोबाइल अॅपद्वारे, सर्वच ठिकाणचे शेतकरी ओटीपी किंवा फिंगरप्रिंटशिवाय केवळ त्यांचा चेहरा स्कॅन करून ई-केवायसी पूर्ण करू शकणार आहेत.
पात्र शेतकऱ्यांना दिली जाते मदत
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2,000 रुपयांची आर्थिक मदत वर्षातून 3 वेळा किंवा दर 4 महिन्यांनी म्हणजे वार्षिक 6000 रुपये हप्त्यांमध्ये दिली जाते. ही योजना फेब्रुवारी 2019मध्ये सुरू करण्यात आली होती. मात्र डिसेंबर 2018पासून लागू केली. या अंतर्गत 8.1 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पीएम-किसानचा 13वा हप्ता अदा करण्यात आला आहे.
आज कृषि भवन नई दिल्ली में आयोजित एक कार्यक्रम में फेस ऑथेंटिकेशन फीचर वाले पीएम-किसान मोबाइल ऐप को लॉन्च किया...#PMKisan #eKYC #PMKisanApp @AgriGoI pic.twitter.com/ePNS8EU1B3
— Narendra Singh Tomar (@nstomar) June 22, 2023
कसं डाउनलोड करणार अॅप?
हे नवं मोबाइल अॅप वापरण्यास अतिशय सोपं आहे. ते गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. या अॅपद्वारे शेतकऱ्यांना योजना आणि पीएम-किसान खात्यांशी संबंधित महत्त्वाची माहितीदेखील मिळते. 'नो यूझर स्टेटस मॉड्यूल'चा वापर करून शेतकरी जमीन पेरणीची स्थिती, बँक खातं-आधार लिंकिंग आणि ई-केवायसीची स्थिती जाणून घेऊ शकतात.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक भागीदार
राज्य, केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीनं लाभार्थ्यांसाठी आधारशी जोडलेली बँक खाती त्यांच्या दारात उघडण्यासाठी कृषी मंत्रालयानं इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्येदेखील (आयपीपीबी) सहभाग घेतला आहे, असं निवेदनात म्हटलं आहे.
चेक करा स्टेटस
- पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जावं.
- होमपेजच्या उजव्या बाजूला Farmers corner या पर्यायावर क्लिक करावं.
- Beneficiary status यावर क्लिक करा.
- नवीन पेज उघडण्यासाठी Registration number किंवा Mobile no. पर्याय निवडावा.
- Captcha code टाकावा आणि जनरेट OTP वर क्लिक करावं.
- यानंतर तुमचं Status कळेल.
- तुमचं eKYC केले नसेल तर सिस्टम तुम्हाला तुमचे KYC अपडेट करण्यास सांगू शकते.