महाराष्ट्रात मासेमारीच्या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबाचा आकडा मोठा आहे. प्रामुख्याने कोकण किनारपट्टी भागात राहणारे नागरिक मासेमारीचा व्यवसाय करताना पाहायला मिळतात. मात्र, गेल्याकाही वर्षात मासे कमी मिळत असल्याचे मच्छिमार सांगतात. याशिवाय, मासेमारीसाठी आधुनिक पद्धत वापरली जात असल्याचे देखील पाहायला मिळते. या लेखातून मच्छिमार महिन्याला किती कमाई करतात व त्यांच्या उत्पन्नावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? ते जाणून घेऊयात.
मच्छिमारांच्या उत्पन्नावर परिणाम करणार घटक
माशांचे प्रकार | मच्छिमारांची महिन्याला किती कमाई होऊ शकते, यामध्ये माशांच्या प्रकाराची महत्त्वाची भूमिका असते. बांगडा, पापलेट, सुरमई, रावस, मोरी, बोंबील सारख्या माशांच्या प्रजाती गोड्या पाण्यात व समुद्री पट्यात आढळतात. मात्र, सर्वच माशांच्या प्रजातीला समान भाव मिळत नाही. |
स्थान | स्थानानुसार देखील मच्छिमारांचे उत्पन्नात फरक पाहायला मिळतो. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीच्या भागात मासेमारीचा व्यवसाय प्रमुख आहे. मात्र, या भागात मिळणारे मासे सर्वत्र मिळतीलच असे नाही. याशिवाय, सरकारी नियम, बाजारभाव याचाही उत्पन्नावर परिणाम होतो. |
बोट | अनेक मच्छिमारांकडे स्वतःच्या बोटी असतात. त्यामुळे ते जवळपास 10 ते 15 दिवस समुद्रात राहून मासेमारी करतात. मात्र, सर्वच मच्छिमारांकडे स्वतःच्या बोटी नसतात. अशावेळी मासेमारीसाठी बोट भाड्याने घ्यावी लागते. याशिवाय, बोटीसाठी लागणारे डिझेल व इतर भांडवली खर्च देखील असतो. |
हंगामानुसार बदल | सर्वच हंगामात मासेमारी करणे शक्य नसते. तसेच, प्रत्येक वेळी तेवढेच मासे मिळतील असे नाही. प्रामुख्याने हिवाळा व उन्हाळ्यात मासेमारी केली जाते. तर पावसाळ्याच्या सुरुवातीच्या महिन्यात मासेमारी बंद असते. या काळात समुद्रात जाणे धोक्याचे असल्याने मासेमारी शक्य होत नाही. त्यामुळे या महिन्यांमध्ये मच्छिमारांचे उत्पन्न देखील कमी असते. |
मासेमारीचे आधुनिकीकरण
मासेमारी देखील आधुनिक झाल्याचे दिसून येत आहे. परंतु, याचा उलट परिणाम व्यवसायावरही होत आहे. मासे पडकण्यासाठी वेगळ्या प्रकारचे जाळे, बोटी व इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. याचा परिणाम समुद्रातील नैसर्गिक साधनसंपत्तीवरही होतो. या आधुनिक पद्धतीच्या मदतीने कमी वेळेत जास्त मासे पकडण्यास मदत होते.
मच्छिमार महिन्याला कमाई करतात?
सर्वच भागामध्ये मच्छिमारांचे उत्पन्न सारखे नाही. महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकण किनारपट्टी भागात राहणाऱ्या हजारो कुटुंबांना या व्यवसायातून रोजगार मिळत आहे. मात्र, सरकारने ठराविक भागांमध्ये मासेमारी करण्यासाठी लादलेले निर्बंध, ठराविक माशांच्या प्रजातींच्या मासेमारीवर घातलेली बंदी याचाही उत्पन्नावर परिणाम होतो.
छोट्या स्तरावर मासेमारी करणारे मच्छिमार हे महिन्याला 2 ते 3 वेळा समुद्रात जातात. याद्वारे त्यांची महिन्याला सरासरी 15 ते 20 हजार रुपयांची कमाई होते. तर मोठ्या स्तरावर मासेमारी करणाऱ्यांच्या कमाईचा आकडा हा 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत देखील आहे.