Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

GST collection : केंद्र सरकारची मोठी कमाई, मे महिन्यातलं जीएसटी संकलन दीड लाख कोटींच्या पुढे!

GST collection : केंद्र सरकारची मोठी कमाई, मे महिन्यातलं जीएसटी संकलन दीड लाख कोटींच्या पुढे!

GST collection : जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून केंद्र सरकारनं चांगलीच कमाई केलीय. मे महिन्यातली आकडेवारी समोर आलीय. या एका महिन्याच्या कालावधीत सरकारला दीड लाख कोटींहूनही अधिकचा महसूल मिळालाय.

देशभरात एकच कर (Tax) लागू करण्याच्या हेतूने केंद्र सरकारनं जीएसटी (Goods and service tax) लागू केला. त्याला अनेकांचा विरोध आहे. मात्र या विरोधाला न जुमानता केंद्र सरकार जीएसटी वसूल करत असते. आता याच जीएसटीच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत चांगलाच पैसा जमा होऊ लागलाय. दर महिन्याच्या जीएसटीचे आकडे समोर येत असतात. त्यात त्या महिन्यतला उच्चांकच असतो. आता मे महिन्यातली आकडेवारी समोर आलीय. या एका महिन्यातलं जीएसटी महसूल संकलन 1,57,090 कोटी रुपये झाल्याचं अर्थमंत्रालयानं सांगितलंय. जीएसटीच्या महसूल संकलनात एका वर्षाच्या कालावधीत जवळपास 12 टक्क्यांनी वाढ झालीय.

एप्रिलमध्ये झालं होतं सर्वात मोठं जीएसटी संकलन

देशातलं आतापर्यंतचं सर्वात मोठं जीएसटी संकलन एप्रिलमध्ये झालं. त्या एका महिन्यात तब्बल 1.87 लाख कोटी रुपयांची कमाई केंद्र सरकारनं केली. दुसरीकडे सरकारसाठी एक सकारात्मब बाब म्हणजे मे हा सलग 14वा महिना आहे, जेव्हा जीएसटीचं संकलन 1.4 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेलंय. त्यामुळे जीएसटी संकलनाच्या बाबतीत आतापर्यंत चांगले आकडे मिळत असल्यानं हे वर्ष जीएसटीसाठी चांगलं जात असल्याचं दिसतंय. मे महिन्यातला आकडा दीड लाख कोटींच्या पुढे जाणं ही देखील एक चांगली बाब असल्याचं दिसून येतंय. जीएसटी लागू झाल्यापासून दीड लाख कोटींहून अधिक संकलन झाल्याची ही पाचवी वेळ आहे.  

एकूण महसुलात 28,411 कोटी सीजीएसटी

मे 2023 या महिन्यात एकूण महसुलात 28,411 कोटी रुपये सीजीएसटी म्हणून सरकारला मिळाले. मागच्या महिन्यात 35,828 कोटी रुपयांचा एसजीएसटी जमा झाला. आयजीएसटी महसूल 81,363 कोटी रुपये होता. ही 41,772 कोटी रुपयांच्या वस्तूंच्या आयातीवरच्या संकलनासह असलेली आकडेवारी आहे. या व्यतिरिक्त 11,489 कोटी रुपयांचा उपकर जमा झाला. यामध्ये वस्तूंच्या आयातीवरचा 1,057 कोटी रुपयांच्या संकलनाचादेखील समावेश आहे.

केंद्राने 65 हजार कोटी रुपये सेटल केले

केंद्र सरकारनं सीजीएसटीमध्ये 35,369 कोटी रुपये आणि आयजीएसटीमध्ये 29,769 कोटी रुपये तडजोड केले आहेत. म्हणजे एकूण 65,138 कोटी रुपयांची तडजोड झालीय. अर्थ मंत्रालयानं यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक काढलंय. नियमित सेटलमेंटनंतर केंद्र आणि राज्यांच्या सीजीएसटीसाठी मे महिन्यात एकूण महसूल 63,780 कोटी रुपये इतका होता. एसजीएसटीसाठी 65,597 कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याचं सरकारनं सांगितलंय.

आयातीसह देशांतर्गत व्यवहारातून उत्पन्न

मागच्या महिन्यात वस्तूंच्या आयातीवरची कमाई 12 टक्क्यांनी जास्त राहिलीय. या सेवांच्या आयातीव्यतिरिक्त देशांतर्गत व्यवहारातूनही सरकारला मोठा महसूल मिळतो. याचं प्रमाण 11 टक्क्यांपर्यंत वाढलंय. मागच्या वर्षीची याचदरम्यानची आकडेवारी आणि यावर्षीची आकडेवारी यांची तुलनात्मक माहिती सरकारनं दिली. दरम्यान, विविध प्रकारचे 32 कर काढून एकच कर लागू करण्यात आला. जीएसचीचेही विविध प्रकार आहेत. सीजीएसटी, एसजीएसटी, आयजीएसटी, यूटीजीएसटी. हाच जीएसटी आता सरकारला चांगली कमाई करून देतोय. 1 जुलै 2017पासून सुरू झालेल्या जीएसटीनं आतापर्यंत प्रतिवर्षी चांगली कामगिरी केल्याचं दिसतंय.