GST on Gangajal: नरेंद्र मोदी सरकारने गंगाजलावर आणि हिंदुंच्या पुजेच्या साहित्यावर 18 टक्के जीएसटी लावणार. त्यामुळे गंगाजल आणि एकूणच हिंदुंचे धार्मिक साहित्य महागणार यावर सोशल मिडियामधून गोंधळ उडाला होता. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही याबाबत ट्विट करत मोदी सरकार गंगाजलावर 18 टक्के जीएसटी लावण्याचा विचार करत असल्याचे म्हटले होते.
सोशल मिडियावर याबाबत झालेल्या चर्चेमुळे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (CBIC) याबाबत स्पष्टीकरण देत गंगाजलला जीएसटीमधून सूट देण्यात आल्याचे सांगितले आहे. तसेच पूजा साहित्यावरही जीएसटी आकारला जाणार नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, पुजेच्या साहित्यावर आणि गंगाजलावर जीएसटी लावण्याबाबत 2017 मध्ये झालेल्या दोन बैठकांमध्ये यावर चर्चा करण्यात आली होती. पण त्यानंतर पूजेचे साहित्य जीएसटी कक्षेबाहेर ठेवण्यात आल्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
हिंदु धर्माच गंगाजलाला खूप मोठे स्थान आहे. बहुतांश प्रत्येक धार्मिक कार्यात गंगाजल शिंपडून शुभकार्यास सुरूवात केली जाते. त्यामुळे या पवित्र गंगाजलावर 18 टक्के जीएसटी लावल्यावर ते महागणार, अशा प्रतिक्रिया समाजमाध्यमात उमटू लागल्या होत्या. त्यात लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी हिंदी भाषेतून ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली होती. या टिकेविरोधात केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (CBIC) स्पष्टीकरण देत पूजा साहित्य जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.