Cars Discontinued In 2022: भारतात वाहन खरेदीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत एकापेक्षा एक नवीन गाडया येत आहेत. मात्र काही अशा ही काही गाडया आहेत, ज्या भारतीय बाजारपेठेतून ग्राहकांना कायमच्या अलविदा करणार आहेत. या कोणत्या गाड्या आहेत, हे थोडक्यात पाहूयात.
Table of contents [Show]
फोक्सवॅगन पोलो (Volkswagen Polo)
भारतीय बाजारपेठेत फोक्सवॅगन पोलोने ऑटो एक्सपो ही गाडी 2010 मध्ये लॉन्च केली. या कंपनीने आतापर्यंत प्रीमियम हॅचबॅक पोलोच्या 2.5 लाखांहून अधिक युनिट्सची भारतात विक्री केली आहे. मात्र आता या गाडयांचे उत्पादन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.
टोयोटा अर्बन क्रूझर (Toyota Urban Cruiser)
टोयोटाची अर्बन क्रूझर ही कार 6 ट्रिममध्ये बाजारात उपलब्ध होती. टोयोटाची अर्बन क्रूझर एसयूव्ही बंद केली आहे. ही कार मारुती सुझुकीच्या जुन्या विटारा ब्रेझाची रिबॅज केलेलं व्हर्जन होती.
महिंद्रा अल्तुरास जी 4 (Mahindra Alturas G 4)
महिद्रांची ही कार आतापर्यंतची सर्वात महागडी होती. भारतीय बाजारपेठेत महिंद्राने SUV Alturas G4 चे उत्पादन पूर्णपणे बंद केले आहे. कंपनीने आपल्या वेबसाइटवरून वाहन डी-लिस्ट केले असून एसयूव्हीसाठी बुकिंग होल्डवर ठेवले आहे.
ह्युंदाई एलांट्रा (Hyundai Alturas)
ह्युंदाई एलांट्रा या गाडीची किंमत साधारण 15.9 लाख रूपये होती. ही Elantra ही Hyundai ची प्रीमियम सेडान होती. यामध्ये 2.0-लीटर पेट्रोल इंजिन आहे. ही गाडी आता ग्राहकांना खरेदी करता येणार नाही. या गाडीचे उत्पादन कंपनीने पूर्णपण बंद केले आहे.
फोक्सवॅगन व्हेंटो (Volkswagen Vento)
पोलो हॅचबॅकसोबतच फोक्सवॅगनने व्हेंटो सेडान ही भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी बंद करण्यात आली आहे. याची रिप्लेसमेंट म्हणून कंपनीने भारतीय बाजारपेठेत Virtus ही गाडी लॉन्च केली आहे. ज्याची किंमत खूप जास्त आहे.