• 09 Feb, 2023 09:11

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Debit Card Charges: कॅनरा बँकेने वाढवले, डेबिट कार्डच्या वापरावरील शुल्क!

Canara Bank hikes debit card service charges

Canara Bank Debit Card Service Charges: नवीन बदलांनुसार, कॅनरा बँकेने डेबिट कार्ड वापरावरील वार्षिक शुल्कासह अनेक प्रकारच्या शुल्कांचे दर वाढवले आहेत. नेमक्या कोणत्या सेवांवर किती पैसे भरावे लागणार ते या बातमीतून समजून घ्या.

Canara Bank hikes debit card service charges: डेबिट कार्ड वापरणे, बदलणे आणि एसएमएस अलर्टसाठीचे शुल्क सुधारित करण्यात आले आहे. कॅनरा बँकेने या सेवांच्या शुल्कात बदल केला आहे. बदललेले दर 13 फेब्रुवारी 2023 पासून लागू होतील. बँकेने कार्ड बदलण्यासाठी फी दुप्पट केली आहे. तर, व्यवसाय श्रेणीचे डेबिट कार्ड बदलण्यासाठी बँक 300 रुपये शुल्क आकारेल.

कॅनरा बँक डेबिट कार्ड वार्षिक शुल्क (Debit Card Annual Fee)

कॅनरा बँकेने त्यांच्या सेवांसाठी शुल्क दरांमध्ये बदल केले आहेत. नवीन बदलांनुसार, कॅनरा बँकेने डेबिट कार्ड वापरावरील वार्षिक शुल्कात वाढ केली आहे. बँक आपले क्लासिक कार्ड वापरण्यासाठी आतापर्यंत 150 रुपये आकारत होती, ती वाढवून 200 रुपये करण्यात आली आहे. तसेच प्लॅटिनम कार्डचे शुल्क 250 रुपयांवरून 500 रुपये करण्यात आले आहे. तर, बिझनेस कार्डसाठी वार्षिक शुल्क 300 वरून 500 रुपये करण्यात आले आहे.

डेबिट कार्ड बदलण्यासाठी 150 रुपये (150 rupees to change debit card)

कॅनरा बँकेच्या म्हणण्यानुसार डेबिट कार्ड बदलण्यासाठीही शुल्क लागू करण्यात आले आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, 13 फेब्रुवारीपासून ग्राहकांना क्लासिक किंवा मानक श्रेणीतील डेबिट कार्ड बदलण्यासाठी 150 रुपये द्यावे लागतील. यापूर्वी यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. बँकेने प्लॅटिनम, बिझनेस आणि सिलेक्ट श्रेण्यांसाठी डेबिट कार्ड बदलण्याची फी 50 रुपयांवरून 150 रुपये केली आहे.

कार्ड निष्क्रियीकरण आणि संदेश सूचनांवर शुल्क (Charges on message notifications)

कॅनरा बँकेचे डेबिट कार्ड निष्क्रिय करण्यासाठी देखील शुल्क भरावे लागेल. बँकेने 300 रुपयांचे हे शुल्क लागू केले आहे जे फक्त बिझनेस डेबिट कार्डवर लागू होईल. कार्ड्सची उर्वरित श्रेणी निष्क्रिय करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. बँकेने एसएमएस अलर्टवर 15 रुपये शुल्क ठेवले आहे.

कॅनरा बँकेच्या या सेवांवर शुल्क बदलले (Charges for these services have changed)

कॅनरा बँकेने डिसेंबर महिन्यातही 9 सेवांचे सेवा शुल्क बदलण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर बँकेने चेक रिटर्न, ईसीएस डेबिट रिटर्न चार्जेस, सरासरी किमान शिल्लक (AMB: Average Minimum Balance), सरासरी मासिक किमान शिल्लक राखणे, लेजर फोलिओ, इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग सेवा, ऑनलाइन निधी हस्तांतरण, एटीएम व्यवहारांसह 9 सेवांसाठी लागू शुल्क अधिसूचित केले. बदलले या सर्व सेवा फेब्रुवारी 2023 पासून लागू होणार आहेत.