Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Loan to Farmers : कर्जाची परतफेड न केलेले शेतकरी पुन्हा कर्ज घेऊ शकतात का?

Loan to Farmers

कर्जाचे शेतकऱ्यांवर ओझे होते. ज्याची परतफेड करणे प्रत्येक शेतकऱ्याला जमेलच असे नाही. अनेकवेळा शेतकऱ्याला सुरक्षितता म्हणून ठेवलेली जमीन विकावी लागते. त्यामुळे थकबाकीदार घोषित झाल्यानंतरही बँका किंवा अन्य फायनान्शिअल संस्थांकडून कर्ज घेता येईल का? (Can defaulting farmers take loans again?) असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो.

देशातील लाखो शेतकऱ्यांकडे सहकारी आणि राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज थकीत आहे. अनेक वेळा कर्ज फेडता न आल्याने शेतकऱ्यांना थकबाकीदार म्हणूनही घोषित केले जाते, त्यानंतर पुढील कर्ज घेण्याचा मार्ग बंद होतो. साहजिकच कर्ज (Loan) घेताना कायदेशीर करार केला जातो, परंतु अनेकवेळा शेतकरी पीक खराब होणे, हवामान किंवा इतर कारणांमुळे कर्जाचे हप्ते भरण्यास विसरतात. अनेक वेळा बँका शेतकऱ्यांना फोन करून कर्ज फेडण्याची आठवण करून देतात, पण एक-दोनदा संधी मिळाल्यावर बँका त्यांच्या अटी व शर्तीनुसार कर्जामध्ये विलंब शुल्क, दंड, कायदेशीर खर्च यांसारखे खर्च जोडतात. ज्यामुळे कर्जाची रक्कम वाढते.

या कर्जाचे शेतकऱ्यांवर ओझे होते. ज्याची परतफेड करणे प्रत्येक शेतकऱ्याला जमेलच असे नाही. अनेकवेळा शेतकऱ्याला सुरक्षितता म्हणून ठेवलेली जमीन विकावी लागते. त्यामुळे थकबाकीदार घोषित झाल्यानंतरही बँका किंवा अन्य फायनान्शिअल संस्थांकडून कर्ज घेता येईल का? (Can defaulting farmers take loans again?) असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो.

थकबाकीदार शेतकरी कोण?

जेव्हा शेतकरी जुन्या कर्जाचे व्याजाचे हप्ते किंवा ईएमआय वेळेवर भरू शकत नाहीत, तेव्हा बँका आणि वित्तीय संस्था शेतकऱ्यांना थकबाकीदार म्हणून घोषित करतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज घेण्यास अडचणी येऊ शकतात, कारण प्रत्येक बँक जुने रेकॉर्ड पाहूनच नवीन कर्ज देते. अशा स्थितीत शेतकऱ्याच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न निर्माण होतो. जेव्हा कर्ज देणाऱ्या बँका आणि रिकव्हरी एजंटांकडून कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी कॉल येतात तेव्हा खरी चिंता निर्माण होते. अनेक वेळा शेतकऱ्यांना दुसरी संधी देखील दिली जाते, ज्यामध्ये शेतकरी कर्जाची रक्कम विलंब शुल्कासह जमा करून त्यांचा क्रेडिट स्टेटस सुधारू शकतात.

शेतकरी कोणते कर्ज घेऊ शकतात?

शेतकऱ्यांना शेतीपासून वैयक्तिक गरजेसाठी अनेक प्रकारची कर्ज मिळतात. यामध्ये किसान क्रेडिट कार्ड, ट्रॅक्टर कर्ज, नवीन ट्रॅक्टर कर्ज, वैयक्तिक कर्ज, तारण कर्ज, गोल्ड लोन इत्यादींचा समावेश आहे. अनेक वेळा शेतकऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी जमीन किंवा वाहनावर कर्ज दिले जाते.

थकबाकीदार शेतकरी पुन्हा कर्ज घेऊ शकतात का?

तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही शेतकरी किंवा इतर व्यावसायिकांना कर्ज देण्यासाठी सिबील (CIBIL Score) स्कोर किंवा क्रेडिट स्थिती तपासली जाते. जर शेतकऱ्याने जुने कर्ज उशिरा जरी भरले असेल तर तो पुन्हा कर्जासाठी पात्र असेल. अशा परिस्थितीत कर्ज मिळवण्यासाठी सिबील स्कोअर 750 पेक्षा जास्त असणे अनिवार्य आहे. भारतात अशा अनेक फायनान्शिअल संस्था आहेत ज्या 300 हून अधिक सिबील स्कोअर असलेल्या अर्जदारांना कर्ज देण्यास तयार आहेत, परंतु त्यांचे व्याजदर खूपच जास्त असतात.

या अटींवर कर्ज मिळते

अनेक खासगी बँका आणि कंपन्यांनी थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज देण्याचा मार्ग मोकळा केला आहे. शेतकर्‍याला जामीन किंवा हमी द्यावी लागेल अशी अट असते. अनेक राज्य सरकारे कर्जमाफी किंवा व्याजमाफी सारख्या योजना देखील आणतात. आता रोख रकमेऐवजी शेतकऱ्यांना बियाणे, खते, यंत्रे कर्जावर खरेदी करण्याची सुविधाही दिली जात आहे.

डिसक्लेमर : या वेबसाईटवरील मजकुरात कोणताही आर्थिक किंवा व्यावसायिक सल्ला दिलेला नाही. मात्र लोकांना आर्थिक घडामोडींशी संबंधित शैक्षणिक मार्गदर्शन करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. आर्थिक किंवा व्यवसायिक विषयांशी संबंधित सल्ला हवा असल्यास आपण नोंदणीकृत वित्त सल्लागाराची मदत घ्यावी.