जेव्हा आपण पॉलिसीमध्ये गुंतवणूक (Insurance Policy) करतो तेव्हा आपल्याला एखाद्याला नॉमिनी बनवावे लागते. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला विम्याच्या रकमेचा लाभ मिळतो. जरी, पॉलिसीधारकाने नॉमिनी करणे आवश्यक आहे, परंतु नेहमी एकच नॉमिनी ठेवण्याचा कोणताही नियम नाही. कोणाला हवे असल्यास, तो त्याच्या विमा पॉलिसीसाठी केलेला नॉमिनी देखील बदलू शकतो. तुम्ही एलआयसीची कोणतीही पॉलिसी (LIC's policy) खरेदी केली असेल आणि तुम्हाला नॉमिनी बदलायचा असेल तर तुम्ही तो सहज बदलू शकता. तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला नॉमिनी बनवू शकता. कोणत्याही पॉलिसीमध्ये नॉमिनी कसा बदलायचा? ते पाहूया.
नॉमिनी म्हणून कोणाला नियुक्त करु शकतो?
नॉमिनीची नियुक्ती केवळ पॉलिसीधारकाद्वारे केली जाते. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्याला सर्व फायद्यांचा हक्क आहे. म्हणूनच ज्याला तुम्हाला पॉलिसीचा लाभ द्यायचा आहे त्याला तुम्ही नॉमिनी करा. बहुतेक लोक त्यांच्या जोडीदाराला, मुलांना किंवा पालकांना नॉमिनी म्हणून नियुक्त करतात. पॉलिसी करतानाच नॉमिनी दिला पाहिजे. मात्र, पॉलिसीधारकाची इच्छा असल्यास, त्याची नियुक्ती नंतर देखील केली जाऊ शकते.
नॉमिनी बदलण्याची प्रक्रिया जाणून घ्या
पॉलिसीधारक विमा पॉलिसीच्या मुदतीदरम्यान कधीही नॉमिनी बदलू शकतो. नॉमिनी बदलण्यासाठी विद्यमान नॉमिनी व्यक्तीला सूचित करणे आवश्यक नाही. तुम्ही सध्याच्या नॉमिनीला न कळवता इतर कुणालाही नॉमिनी करु शकता. यासाठी पॉलिसीधारकाला एलआयसीच्या फॉर्म 3750 मध्ये नोटीस पाठवावी लागेल. यामध्ये, विमा पॉलिसीचा नॉमिनी म्हणून नियुक्त होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीचे तपशील दिलेले असतात.
या कागदपत्रांची आवश्यकता
विमा पॉलिसीसाठी नॉमिनी बदलण्याची संपूर्ण प्रक्रिया फक्त ऑफलाइन पद्धतीने केली जाते. त्यासाठी ऑनलाइन सुविधा अद्याप उपलब्ध नाही. नॉमिनी बदलताना, तुम्हाला एलआयसीचा फॉर्म 3750, पॉलिसी बॉंड, पॉलिसीधारक आणि नॉमिनी यांच्यातील संबंधाचा पुरावा सादर करावा लागेल. नॉमिनी बदलण्यासाठी, पॉलिसीधारकाला एलआयसीला कळवावे लागेल आणि कागदपत्रे सबमिट करावी लागतील. यानंतर कंपनी पुढील प्रक्रिया पूर्ण करते.