विमा पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी, नूतनीकरण करण्यापूर्वी किंवा पोर्ट करण्याआधी, तुम्हाला अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. ज्यामध्ये विमाकर्ता क्लेमचे सेटलमेंट कसे करतो हे सर्वात महत्त्वाचे आहे. जीवन विमा पॉलिसी (Life Insurance Policy) घेताना, असे बरेच लोक आहेत जे जीवन विमा कंपनीच्या क्लेम सेटलमेंट रेशो किंवा सीएसआर (CSR – Claim Settlement Ratio) बद्दल माहिती घेत नाहीत. मात्र, पॉलिसीधारकांनी हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. यावरून विमा कंपनीने किती टक्के क्लेमचे सेटलमेंट केले आहे हे दिसून येते.
खरेतर, क्लेम सेटलमेंट रेशो किंवा सीएसआर (Claim Settelment Ratio) हे एका आर्थिक वर्षात जीवन विमा कंपनीने निकाली काढलेल्या किंवा भरलेल्या एकूण दाव्यांमधून ओळखले जाते. याची गणना करण्यासाठी, केलेले एकूण दावे निकाली काढलेल्या एकूण दाव्यांनी भागले जातात. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी सामान्य आणि आरोग्य विमा कंपन्यांच्या दाव्यांच्या पेमेंटचे तपशील जारी केले आहेत.
नावी जनरल इन्शुरन्स सेटलमेंटमध्ये आघाडीवर
नावी जनरल इन्शुरन्स (पूर्वीचे डीएचएफएल जनरल इन्शुरन्स) खासगी सामान्य विमा कंपन्यांमध्ये 99.99 टक्के दावे सेटलमेंटसह अव्वल स्थानावर आहे. नावी जनरल इन्शुरन्सने सुरुवातीच्या पहिल्या तीन महिन्यांत निकाली काढलेल्या दाव्यांच्या यादीत अव्वल स्थान मिळवले आहे. यानंतर रिलायन्स जनरल इन्शुरन्सने पहिल्या तीन महिन्यांच्या कालावधीत 98.65 टक्के आणि एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्सने 98.49 टक्के दावे निकाली काढण्यात यश मिळवले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या मागे
पहिल्या तीन महिन्यांच्या कालावधीत खासगी विमा कंपन्यांच्या तुलनेत सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपन्यांचे क्लेम सेटलमेंट रेशो तुलनेने कमी असतो. युनायटेड इंडिया इन्शुरन्स 97.25 टक्के क्लेम सेटलमेंट रेशोसह चार्टमध्ये अव्वल मिळवले आहे. पहिल्या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी न्यू इंडिया अॅश्युरन्सचे क्लेम सेटलमेंट रेशिओ 92.93 टक्के आहे आणि त्यानंतर ओरिएंटल इन्शुरन्स 90.18 टक्के क्लेम सेटलमेंट केले आहेत. स्टँड-अलोन हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांमध्ये, केअर हेल्थ इन्शुरन्सने पहिल्या तीन महिन्यांत 100 टक्के दावे निकाली काढले. आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स, मणिपाल सिग्ना हेल्थ इन्शुरन्स, निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स यासह चार स्वतंत्र आरोग्य विमा कंपन्यांनी देखील आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तीन महिन्यांत 99 टक्क्यांहून अधिक क्लेम सेटलमेंट नोंदवली आहे.
97 टक्क्यांपेक्षा जास्त सीएसआर असलेली कंपनी निवडा
पॉलिसी करण्यापूर्वी, सर्वोत्तम क्लेम सेटलमेंट रेशो असलेली विमा कंपनी निवडा. योग्य विमा कंपनी निवडण्यापूर्वी त्यांचा सीएसआर तपासा. इन्शुरन्स रेग्युलेटर दरवर्षी क्लेम सेटलमेंट रेशो डेटा जारी करतो. क्लेम सेटलमेंट रेशो जितका जास्त असेल तितका कंपनीचा क्लेम रेकॉर्ड चांगला असतो. 97 टक्क्यांहून अधिक क्लेम सेटलमेंट रेशोचा आकडा सुरक्षित मानला जातो. क्लेम सेटलमेंट रेशोद्वारे तुम्ही तुमच्या विमा कंपनीची विश्वासार्हता तपासू शकता.