• 28 Nov, 2022 17:13

Budget Friendly Bike : तुमच्या खिशाला परवडणारी बाईक आजच खरेदी करा!

Budget Friendly Bike 2022

Image Source : www.bikedekho.com

Budget Friendly Bike : बाईक खरेदी करायची आहे; पण बजेट नाही. तर मग आता काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही तुमच्यासाठी काही निवडक बजेट बाईक्स घेऊन आलो आहोत.

Budget Friendly Bike : बाईक खरेदी करायची आहे; पण बजेट नाही. तर मग आता काळजी करण्याचे कारण नाही. अनेक बाईक अशा आहेत. ज्या तुमच्या बजेटमध्ये मिळू शकतात. भारतात अनेक प्रकारच्या बजेट बाईक्स उपलब्ध आहेत. बऱ्याच कंपन्या सर्वसामान्य ग्राहकांच्या बजेटचा विचार करून बाईक लॉन्च करतात.

बजेट-फ्रेंडली ऑटोमोबाईलची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी बजाज, यामाहा आणि होंडा या ऑटोमोबाईल कंपन्या वाजवी किमतीत चांगल्या वैशिष्ट्यांसह नवीन प्रॉडक्ट लाँच करण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतात. भारतातील बहुतेक लोक चांगल्या फीचर्ससह जवळपास 70,000 रुपयांपर्यंतच्या बाईक्सच्या शोधात असतात. अशाच काही निवडक बजेट बाईक्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

हिरो सुपर स्प्लेंडर (Hero Super Splendor)

Hero Super Splendor
Image Source : honda2wheelersindia.com

आरामदायक आणि चांगला अव्हरेज असलेली बाईक शोधत असाल, तर तुमच्यासाठी हिरो सुपर स्प्लेंडर बेस्ट आहे. ही मूळ स्प्लेंडरचे अपग्रेड मॉडेल आहे. 95 किमी प्रतितास वेगाने ही बाइक धावते. याचे वजन 121 किलोग्रॅम आहे. हे 10.6Nm टॉर्क, 10.73hp पॉवर जनरेट करते आणि 125cc ची मोटर आहे. या बाईकचे तीन प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. त्या प्रत्येकाची किमत 60,000 ते 70,000 रूपयांच्या दरम्यान आहे.

बजाज डोमिनार 400 (Bajaj Dominar 400)

Bajaj Dominar 400
Image Source : www.bajajauto.com

ही एक स्पोर्ट्स बाइक आहे ज्यामधील फीचर्स सर्वात चांगले आहे. याच बाइकमध्ये असलेले फीचर इतरही बाइकमध्ये आहे परंतु त्या बाईकच्या तुलनेत ही वाजवी दरात आहे. या बाईकला आधी  CS400 असे नाव होते. नंतर बजाजने त्याचे नाव डोमिनार ठेवले. यात 373cc चे स्ट्रॉंग इंजिन सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. 

बजाज पल्सर 125 निऑन (Bajaj Pulsar 125 Neon)

Bajaj Pulsar 125 Neon
Image Source : www.bajajauto.com

बजाजच्या सर्वच बाइक बजेटमध्ये असतात त्यासोबतच उत्तम फीचर सुद्धा देते. बजाजची ही दुसरी बाईक आहे जी ड्रम-ब्रेक आणि डिस्क-ब्रेक या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. या बाईकची मोटर 125cc आहे, ती 11 Nm टॉर्क, 11.8hp पॉवर आणि 11.5 L पावरची  इंधन टाकी जनरेट करते. या बाईकचे वजन 140 किलोग्रॅम आहे आणि यात 5-स्पीड गिअरबॉक्स आणि डिजिटल ओडोमीटर आहे. या बाइकची किंमत अंदाजे 65,000 रुपयापासून सुरू होते.

होंडा सीबी शाईन (Honda CB Shine)

Honda CB Shine
Image Source : www.carandbike.com

ही बाइक 125cc च्या सिंगल-सिलेंडर मोटरसह 11Nm टॉर्क आणि 10.5hp पॉवर जनरेट करते. साइड काउल, कलरफुल ग्रॅब रेल इत्यादीं वैशिष्ट आहे. उच्च-कार्यक्षमतेची मोटर, कॉम्बी ब्रेक्स, आकर्षक बॉडी ग्राफिक्स आणि सर्वोत्तम ट्रेल लाईट यामुळे या बाईकने बाजारात मजबूत स्थान मिळवले आहे.

बजाज ॲव्हेंजर स्ट्रीट 180 (Bajaj Avenger Street 180)

Bajaj Avenger Street 180
Image Source : www.motoroids.com

ही उत्तम आणि परवडनारी बाइक आहे. यात 180cc आणि 15BHP ची मोटर आहे. त्यासोबतच या बाईकला मागील बाजूस ड्रम-ब्रेकिंग आणि समोर डिस्क-ब्रेकिंग असल्याने चालकाला नियंत्रण करण्यास त्रास जात नाही.  हे मॉडेल बजाज अॅव्हेंजर 150 चे अपग्रेड मॉडेल आहे.

हिरो ग्लॅमर (Hero Glamour)

Hero Glamour
Image Source : www.bikedekho.com

या बाईकमध्ये एक मोठा हेडलाइट काउल, ड्युअल-टोन फ्रंट मडगार्ड आणि बॉडी-कलर रियर-व्ह्यू मिरर आहे. या बाईकची मोटर 124.7cc आहे, जी 55kmpl मायलेज देते. या बाईकचे वजन 129 किलोग्रॅम आहे आणि ती 95 किमी/तास या वेगाने धावू शकते. त्यासोबतच ते 10.3Nm आणि 8.9 hp टॉर्क जनरेट करते.