• 02 Oct, 2022 08:38

Business Opportunity : 25 हजारांत सुरू करा स्वत:चा व्यवसाय आणि लाखो कमवा!

Business Opportunity from KVIC

Business Opportunity : केंद्र सरकारच्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्यावतीने (Khadi and Village Industries Commission-KVIC) स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक योजना राबवल्या जातात आणि यासाठी सरकारकडून मदत सुद्धा दिली जाते.

तुम्हाला जर स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुमच्या फायद्याची माहिती घेऊन आलो आहोत. आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यवसायाबद्दल सांगणार आहोत. तो तुम्ही कमीतकमी भांडवलाने सुरू करू शकता. हा असा एक व्यवसाय आहे; ज्यामुळे लोकांचा सकाळचा पोटभर नाश्ता होतो. त्यातून आपल्या शरीराला आवश्यक असलेली पोषक द्रव्ये मिळतात. होय, बरोबर! ओळखलंत. तर आज आम्ही तुम्हाला पोहे बनवणाऱ्या युनिटबद्दल (Poha Manufacturing Unit) सांगणार आहोत. या व्यवसायाला खूपच मागणी आहे. प्रत्येक घरात वर्षाचे 12 महिने पोहे बनवले जातात. त्यामुळे याची मागणीसुद्धा भरपूर आहे.

पोह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक द्रव्ये आहेत, यात लोह असतं. तसेच हा पदार्थ बनवण्यासाठी आणि पचवण्यासाठी हलका आहे. त्यामुळे डॉक्टरांकडूनही भारतीय नाष्ट्यांमध्ये पोहे खाण्याचा सल्ला आवर्जून दिला जातो. त्यामुळे मार्केटमध्ये वर्षभर पोह्यांना मागणी असते. अशावेळी तुम्ही तुमचा स्वत:चा पोहे बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारचं खादी आणि ग्रामोद्योग आयोग (Khadi and Village Industries Commission-KVIC) मदत करतं.

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाची मदत

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या एका रिपोर्टनुसार, पोहे तयार करण्याचा व्यवसाय अगदी 2.50 लाखांमध्ये सुरू करता येतो. यासाठी 90 टक्क्यांपर्यंत लोन मिळतं. तुम्हाला यासाठी फक्त 25 हजार रुपयांची जुळवाजुळव करावी लागते. 

पोह्यांचा कारखाना उभारण्यासाठी काय लागतं?

Poha Making Unit
पोहे तयार करण्यासाठी लागणारी मशीन.  Image Source : IndiaMart   

पोह्यांचा कारखाना सुरू करण्यासाठी 500 स्क्वेअर फूटची जागा लागते. पोहे बनवण्यासाठी मशीन, भट्टी, पोहे पॅक करण्यासाठी पॅकिंग मशीन आणि इतर लहान-सहान गोष्टींची गरज लागते. या गोष्टींची जुळवाजुळव झाल्यानंतर तुम्ही कमी प्रमाणात व्यवसाय सुरू करू शकता. सुरूवातीला कमी मालाची निर्मिती करून मागणीनुसार हळुहळू उत्पादन वाढवू शकता.

असं लोन मिळेल

KVIC च्या रिपोर्टनुसार, सर्वप्रथम तुम्ही तुमच्या व्यवसायाचा अहवाल तयार करून, ग्रामोद्योग रोजगार योजने अंतर्गत कर्जासाठी अर्ज करा. या योजने अंतर्गत सुमारे 90 टक्क्यांपर्यंत कर्ज दिलं जातं. KVIC कडून प्रत्येक वर्षी ग्रामीण भागातील उद्योगांना चालना देण्यासाठी त्यांना अधिकाधिक कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. तुम्हीसुद्धा याचा लाभ घेऊ शकता.

यातून इतका नफा मिळतो

या व्यवसायाच्या प्रोजेक्ट कॉस्ट व्यतिरिक्त कच्चा माल आणि इतर गोष्टींसाठी किमान 6 लाख रुपये खर्च करावे लागतात. यातून तुम्ही किमान 1 हजार क्विंटल पोहे बनवू शकता. ज्याचा उत्पादन खर्च 8.60 रुपये इतका जातो. जर तुम्ही 1 हजार क्विंटल पोहे सुमारे 10 लाख रुपयांपर्यंत विकू शकता. म्हणजे तुम्हाला यातून 1.40 लाख रुपयांचा नफा होऊ शकतो.