Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Business in India: आता भारतात एका दिवसात व्यवसाय सुरू करणे शक्य!

Business in India

भारतात कामगार कायदे आता अधिक सुलभ होत असून क्लिष्ट कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. तसेच सरकारी पातळीवर आवश्यक असलेल्या सर्व परवानगी, परवाने अतिशय कमी वेळेत उद्योजकांना पुरविण्यासाठी सरकारी यंत्रणा तत्पर असल्याचे उद्योग आणि आंतरिक व्यापार संवर्धन विभागाच्या (Department for Promotion of Industry and Internal Trade) सचिवांनी म्हटले आहे.

आता एका दिवसांत नवा व्यवसाय सुरू करणे सहजशक्य! भारत सरकारच्या उद्योग आणि आंतरिक व्यापार संवर्धन विभागाच्या (Department for Promotion of Industry and Internal Trade) सचिवांनी एक महत्त्वाची बातमी दिली आहे.भारतात कुठलाही नवा व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया सुलभ झाल्यामुळे आता एका दिवसात देशात व्यवसाय सुरू करणे शक्य झाले आहे.

2023 मध्ये जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीत (World Economic Forum)  उद्योग आणि अंतर्गत व्यापार (DPIIT) विभागाचे सचिव अनुराग जैन यांनी ही माहिती दिली. भारतात कामगार कायदे आता अधिक सुलभ होत असून क्लिष्ट कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. तसेच सरकारी पातळीवर आवश्यक असलेल्या सर्व परवानगी, परवाने अतिशय कमी वेळेत उद्योजकांना पुरविण्यासाठी सरकारी यंत्रणा तत्पर असल्याचे जैन यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना जैन म्हणाले की, भारतातील केंद्र सरकारने सर्व कामगार कायदे चार संहितांमध्ये एकत्रित केले गेले आहेत.हे सर्व कायदे संसदेने पारित केले असून सरकार त्यांच्या अंतिम अंमलबजावणीच्या प्रक्रियेत आहे.

WEF च्या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर उद्योग संस्था CII आणि सल्लागार कंपनी EY यांनी आयोजित केलेल्या सत्रात बोलताना जैन पुढे म्हणाले की, केंद्र सरकार सर्व राज्यांची नियोजित कामगार संहितेवर संमती घेत असताना, अनेक राज्यांनी या संहितांशी संबंधित कामगार नियमांचा मसुदा तयार करण्यास सुरुवात केली आहे.

भारतात उद्योगवाढीसाठी अनुकूल वातावरण

भारतात उद्योगधंदे सुरू व्हावेत आणि त्याद्वारे रोजगार निर्मिती व्हावी यासाठी सरकार तत्पर आहे. गुंतवणूकदारांना आवश्यक ती सर्व मदत देण्याच्या सूचना सरकारी यंत्रणांना दिल्या गेल्या असल्याचे जैन म्हणाले.