गुंतवणूकदार पूर्णपणे इक्विटी योजना (Equity scheme) किंवा कर्ज किंवा हायब्रिड निवडू शकतात. इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये जोखीम (Risk) जास्त आहे, मात्र परतावादेखील चांगला आहे. इक्विटी प्रकारामध्ये स्मॉल कॅप फंडाची स्कीम आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत चांगला परतावा मिळाला आहे. गेल्या महिन्यात गुंतवणूकदारांनी स्मॉल कॅप फंडामध्ये मोठी गुंतवणूक केली.
आकडेवारी काय?
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (AMFI) आकडेवारीनुसार, मे 2023मध्ये, स्मॉल कॅप फंडांमध्ये 3,282.50 कोटी रुपयांची गुंतवणूक आली. जर आपण स्मॉल कॅप फंडातल्या टॉप 5 योजना पाहिल्या तर त्यामध्ये चांगला परतावा मिळाल्याचं दिसून आलं आहे. यामध्ये गुंतवणूकदारांनी गेल्या 5 वर्षात 5000 मासिक एसआयपीमधून 7 लाखांचा निधी मिळवला आहे.
1. क्वांट स्मॉल कॅप फंड
क्वांट स्मॉल कॅप फंडाचा एसआयपी परतावा गेल्या 5 वर्षांत सरासरी 18.2 टक्के प्रतिवर्ष आहे. या योजनेत 5000 रुपयांची मासिक गुंतवणूक 5 वर्षांत 7.61 लाख रुपयांपर्यंत जाते. यात किमान गुंतवणूक 5000 रुपये आहे. किमान एसआयपी 1000 रुपये आहे.
2. निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड
निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंडाचा एसआयपी परतावा गेल्या 5 वर्षांत सरासरी 31.86 टक्के प्रतिवर्ष आहे. या योजनेत मासिक 5000 रुपयांची गुंतवणूक 5 वर्षांत 6.54 लाख रुपयांपर्यंत झाली. या योजनेत किमान गुंतवणूक 5000 रुपये आहे. किमान एसआयपी 1000 रुपये आहे.
3. क्वांट इन्फ्रास्ट्रक्चर फंड
क्वांट इन्फ्रास्ट्रक्चर फंडाचा एसआयपी परतावा गेल्या 5 वर्षांत सरासरी 31.25 टक्के प्रतिवर्ष आहे. या योजनेत मासिक 5000 रुपयांची गुंतवणूक 5 वर्षांत 6.45 लाख रुपये झाली. या योजनेत किमान गुंतवणूक 5000 रुपये आहे. किमान एसआयपी 1000 रुपयांची आहे.
4. क्वांट टॅक्स योजना
क्वांट टॅक्स फंडाचा एसआयपी परतावा गेल्या 5 वर्षांत सरासरी 29.8 टक्के प्रतिवर्ष राहिला आहे. या योजनेत मासिक 5000 रुपयांची गुंतवणूक 5 वर्षांत 6.23 लाख रुपये इतकी झाली. या योजनेत किमान गुंतवणूक 500 आहे. किमान एसआयपी 500 रुपये आहे.
5. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल स्मॉल कॅप फंड
आयसीआयसीआय प्रू स्मॉल कॅप फंडाचा (ICICI Pru Smallcap Fund) एसआयपी परतावा गेल्या 5 वर्षात सरासरी 28.9 टक्के प्रतिवर्ष राहिला आहे. या योजनेत मासिक 5000 रुपयांची गुंतवणूक 5 वर्षांत 6.10 लाख रुपये इतकी झाली. या योजनेत किमान गुंतवणूक 5000 रुपये आहे. किमान एसआयपी 100 रुपये आहे.