Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Railway Budget 2023: भारताच्या विकासाचं इंजिन रेल्वे! अर्थसंकल्पात तब्बल 2 लाख 40 हजार कोटींची तरतूद

Railway Budget 2023

केंद्र सरकारने पुढील वर्षासाठी रेल्वेच्या विकासासाठी 2.40 लाख कोटींची घोषणा केली आहे. देशभरात 100 अत्यंत महत्त्वाचे रेल्वे मार्ग याअतंर्गत उभारण्यात येणार आहेत. आर्थिक वर्ष 2014 मध्ये रेल्वे विकासासाठी केलेल्या खर्चापेक्षी ही रक्कम 9 पट जास्त असल्याचे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन लोकसभेमध्ये Budget 2023-24 सादर करत आहेत. या बजेटकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांबाबत महत्त्वाच्या घोषणा त्यांच्याकडून करण्यात येत आहेत. रेल्वे खात्यासाठी बजेटमध्ये तब्बल 2 लाख 40 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे (Railway Budget 2023) कनेक्टिव्हिटीचे अनेक प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. मोदी सरकार 2.0 चे हे शेवटचे पूर्णवेळ बजेट आहे. यानंतर पुढीलवर्षी सार्वत्रिक निवडणुका आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना खूश करण्यासाठी घोषणा होण्याची शक्यता आहे. भारतातील सर्वात मोठ्या मध्यमवर्गाच्या हातात पैसा खेळता राहण्यासाठी सरकार काय उपाययोजना करतात, ते पहावे लागेल.

2.40 लाख कोटी रेल्वे खात्यासाठी तरतूद (Budget allocation for railways)

केंद्र सरकारने पुढील वर्षासाठी रेल्वेच्या विकासासाठी 2.40 लाख कोटींची घोषणा केली आहे. देशभरात 100 अत्यंत महत्त्वाचे रेल्वे मार्ग याअतंर्गत उभारण्यात येणार आहेत. आर्थिक वर्ष 2014 मध्ये रेल्वे विकासासाठी केलेल्या खर्चापेक्षी ही रक्कम 9 पट जास्त असल्याचे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटले आहे.

उद्योगधंद्याचा विकास होत असताना कच्च्या मालाच्या पुरवठ्यासाठी रेल्वेच्या कनेक्टिव्हिटीवर भर देण्यात आला आहे. कोळसा, स्टील, खनिजे, शेतमाल वाहतुकीसाठी देशातील महत्त्वाचे मार्ग निवडून तेथे रेल्वेचे जाळे उभारण्यात येणार आहे. वंदे भारत सारख्या अनेक स्पेशल गाड्याही सुरु करण्यात येणार आहेत. मालवाहतुकीसाठी वॅगन्स आणि प्रवासी डबेही वाढवण्यात येणार आहेत.

2014 च्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 24 हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यामध्ये 2022 साली वाढ करुन 77 हजार कोटी झाली होती. मात्र, 2023-24 आर्थिक वर्षात यामध्ये अचानक मोठी वाढ केली आहे. रेल्वेसाठी बजेटमध्ये मोठी घोषणा झाल्यानंतर रेल्वे कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वधारले आहेत.