येत्या 1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत आर्थिक वर्ष 2023-2024 साठीचा अर्थसंकल्प सादर करतील. केंद्रातील भाजप सरकारसाठी हा सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. त्यामुळे सरकारकडून यंदाचे बजेट म्हणजे समाजातील सर्वच घटकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा असेल, असे बोलले जाते. जाणून घेऊया बजेटबाबत अधिक माहिती.
बजेट कोणत्या तारखेला सादर होईल? (Union Budget 2023 date)
केंद्रीय अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारी 2023 रोजी लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करतील. तत्पूर्वी 31 जानेवारी 2023 पासून संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरु होणार आहे. या दिवशी लोकसभेत आर्थिक पाहणी अहवाल मांडला जाणार आहे.
बजेट 2023 ची वेळ काय असेल? (Union Budget 2023 timing)
1 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्पाच्या वाचनाला सुरुवात करतील. बजेटचे भाषण किमान दिड ते दोन तास चालेल. लोकसभा आणि राज्यसभा या वाहिन्यांवर बजेटचे थेट प्रक्षेपण असेल.
संसदेत बजेट 2023 कोण सादर करणार? Who will present the Union Budget 2023?
अर्थमंत्री निर्मला सितारामन 1 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता सीतारामन अर्थसंकल्पाच्या वाचनाला सुरुवात करतील. अर्थमंत्री म्हणून सीतारामन पाचव्यांदा संसदेत बजेट सादर करणार आहेत. वर्ष 2021 मध्ये सीतारामन यांनी तब्बल 2 तास 40 मिनिटे बजेटचे वाचन केले होते.
बजेट केव्हा तयार केले जाते? (Union Budget preparations)
देशाचे बजेट पूर्ण व्हायला किमान पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागतो. बजेट नियोजन, वेगवेगळ्या मंत्रालय आणि खात्यांच्या अपेक्षा, शिफारसी, त्यांचे प्रश्न यांचा विचार करुन त्यावर बजेटमध्ये तरतूद केली जाते. दरवर्षी साधारणपणे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये बजेटच्या कामाला सुरुवात होते.